जिल्हा माहिती कार्यालय येथे एमपीएसीचे
अर्ज नव्याने भरण्याची मोफत सुविधा
चंद्रपूर दि.०३- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ७ एप्रिल २०१३ रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पुर्व परिक्षेचा डाटा करप्ट झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षार्थी विद्याथ्र्याकडून ४ एप्रिल पर्यंत नव्याने अर्ज भरुन मागितले असून ऑनलाईन अर्ज मोफत भरुन देण्याची सुविधा जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत बस स्टँड समोर चंद्रपूर येथे उदया सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ३ एप्रिल बुधवार पासून अर्ज भरण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. यासाठी इंटरनेटसह लॅपटॉप ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून ही सेवा विद्याथ्र्यांना मोफत पुरविण्यात येणार आहे.
ज्या विद्याथ्र्यांनी राज्य सेवा पूर्व परिक्षेचा अर्ज भरला आहे अशा विद्याथ्र्यांकडून नव्याने अर्ज मागविले असून यामुळे विद्याथ्र्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र विद्याथ्र्यांनी गोधळून न जाता त्यांचे अर्ज भरण्याची व्यवस्था जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर व लक्ष्य स्पर्धा परिक्षा केंद्र यांच्या वतीने करण्यात आली असून विद्याथ्र्यांनी आपली संपूर्ण कागदपत्रे, छायाचित्र व माहिती घेवून जिल्हा माहिती कार्यालय येथे उपस्थित राहावे. परिक्षार्थींचे अर्ज मोफत भरुन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
७ एप्रिल २०१३ रोजी परिक्षा असल्यामुळे ४ एप्रिल पर्यंतच अर्ज नव्याने भरुन देण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत अर्ज करणा-या विद्याथ्र्यांना ७ एप्रिलच्या राज्य सेवा पूर्व परिक्षेचे प्रवेश पत्र प्राप्त होणार आहे. ही बाब लक्षात घेता ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे त्या विद्याथ्र्यांनी उदया ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय येथे उपस्थित राहावे. या संदर्भात काही अडचण असल्यास लक्ष्य स्पर्धा परिक्षा केंद्राचे डॉ. सचिन मडावी ७३८७७८५३५३ व महेश शेंडे ९८५०५३४३७३ याचेशी या क्रमांकावर संपर्क साधावा.