दिग्विजय यांनी मारला टोला
चंद्रपूर : नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या होत असलेल्या तुलनेबाबत विचारले असता त्यांनी त्यांनी आपल्या शैलीत मोदींवर शरसंधान केलं. गुजरातच्या बाहेर मोदींना कोण ओळखतं, असा टोमणा मारत त्यांची तुलना करायचीच असेल, तर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत करा, असा टोला काँग्रेसचे महासचिव दिग्विजय qसग यांनी मारला.
चंद्रपूर जिल्हा नगर काँग्रेस कमेटीच्या सभागृह लोकार्पण आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आज चंद्रपुरात आले होते. मागील पाच दिवस त्यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सानिध्यात घालवले. त्यानंतर ते आज जाहीर कार्यक्रमात आले होते. काँग्रेस कार्यकत्र्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी या मेळाव्यात केलं. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपल्या शैलीत मत मांडली. आयपीएल स्पर्धेत पाण्याच्या होणाèया नासाडीवर विचारणा केली असता त्यांनी हे सामने दुष्काळी भागात होत आहेत काय, असा प्रतिप्रश्न करून जिथं ते घेतले जात आहेत, तिथं पाणी मुबलक आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, त्याचवेळी संत आसाराम बापू हे रंगरलिया करीत असल्याची टीकाही केली.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असंही त्यांनी अप्रत्यक्ष सूचित केलं. त्यांच्या नेतृत्वात हरयाणा, महाराष्ट्र, केरळ, आसाम इथल्या निवडणुका qजकल्या आहेत. उत्तरप्रदेशातही मतांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळं ते अपयशी आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे, असं सांगत त्यांनी राहुल गांधींची पाठराखण केली. सीबीआयच्या वापराबद्दलही त्यांनी खंडण केलं. यापूर्वी लोकसभेच्या दोन निवडणुका काँग्रेसनं qजकल्या आहेत. त्या काय सीबीआयच्या भरवशावर qजकल्या काय, असा सवाल त्यांनी केला.
संजय दत्त याची शिक्षा माङ्क व्हावी, या मताचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. सोबतच भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत अमीत शहा यांच्या निवडीवरही त्यांनी जोरदार टीका केली. महामंत्री होण्यासाठी भाजपमध्ये अमीत शहासारखीच पात्रता लागते, हे सिद्ध झाल्याचं ते म्हणाले.