छत्तीसगड सीमेवरील जंगलात झालेल्या एका चकमकीत चार माओवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भामरागड तालुक्यातील भटपार येथे ही चकमक घडल्याची माहिती गडचिरोली पोलिस नियंत्रण कक्षाने दिली. पोलिस अधीक्षक सुवेझ हक हे चकमकीच्या ठिकाणी असल्याने त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे चकमकीत नेमके किती माओवादी ठार झालेत , याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. एकूण सात माओवादी ठार झाले असावे , अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सी-६० आणि सुरक्षा दलांच्या तुकड्या गस्त घालत असताना बुधवारी रात्री भटपारच्या जंगलात माओवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. त्यात सुरुवातीला चार माओवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.