अमरावती- तिवसा येथून चांदूर रेल्वेकडे जाणा-या एसटी बसला पेटवून देण्यात आलेल्या दुर्घटनेत एका युवतीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता दोन झाली असून अन्य जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरजना बाजार या गावाजवळ एसटी बसला शुक्रवारी आग लागली होती. त्यात एका युवकाचा बसमध्ये मृत्यू झाला होता. याच युवकाने बसमध्ये पेट्रोल सांडले आणि आग लावली होती. .
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस पेटवणारायुवक तिवसा येथून बसमध्ये चढला होता. त्यानेच बस पेटवून दिली होती. दरम्यान, या घटनेत गंभार जखमी झालेल्या विजयंता चौधरी (वय १७) या युवतीचा शनिवारी मृत्यू झाला.