चंद्रपूर: एका व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा घालून, तब्बल दीड किलो सोने आणि ४ लाखांची रोकड लंपास केली आहे. माढेळी या छोट्याशा गावात पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. वरोरा तालुक्यात प्रसिद्ध असलेले कापड व्यापारी आणि जिनिंग मिल मालक सुभाष मुथा यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.
मुथा यांच्या घरावर ७ ते ८ जणांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी रखवालदाराला मारहाण आणि पिस्तुलचा धाक दाखवून त्याला बांधलं. त्यानंतर दरोडेखोरांनी घराचे दर्शनी दार तोडून घरात शिरले आणि डल्ला मारला. विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना, मुथा परिवारापैकी कुणीही झोपेतून उठले नाही. दरोडेखोरांनी आरामात आपला कार्यभाग आटोपून पळ काढला. त्यांनी आपल्या सोबत सुमारे दीड किलो सोने, ४ लाख रुपयाची रोकड लंपास केल्याचं, एफ.आय.आर मध्ये नोंदविण्यात आले आहे. रखवालदाराने स्वतःला कसेबसे सोडवून घेत घरमालक मुथा यांना उठविताच हा प्रकार लक्षात आला. पोलिस पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, लुटीतील ऐवज अधिक असल्याची चर्चा आहे. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी कमी रक्कम नोंदविल्याचे बोललं जात आहे. मात्र या धाडसी दरोडा प्रकरणावर भाष्य करण्यास पोलीस व मुथा परिवारातील सदस्य सध्या टाळाटाळ करत आहेत.