चंद्रपूर पाणी पिण्यासाठी जंगलातून आलेल्या रानगव्यांच्या कळपातील एकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १) सकाळी उघडकीस आली. वनविभागाने मृत रानगव्यास बाहेर काढले. तो चार वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाèयांनी व्यक्त केला आहे.
मूल तालुक्यातील रत्नापूर येथील शेतकरी दयाराम धुर्वे यांच्या शेतातील कटघर विहिरीत वन्यप्राणी पडलेला काही शेतकèयांना दिसून आला. त्यांनी यांसंदर्भात वनविभागाला माहिती दिली. त्यानुसार वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गावकèयांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, तो मृतावस्थेत होता. घटनास्थळावरील मातीवर उमठलेल्या ठशांवरून येथे रानगव्यांचा कळप आल्याचे स्पष्ट झाले. ते पाणी पिण्यासाठी आले. मात्र, कळपातील एकाचा तोल गेल्याने विहिरीत बुडाल्याच्या खुणा घटनास्थळी दिसून आल्या. पशुवैद्यकीय अधिकाèयांनी तपासणी केल्यानंतर त्याला पुरण्यात आले.