Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०३, २०१३

वर्धानदीत डोंगा उलटला,

 चार प्रशासकीय अधिकारी अप्पर जिल्हाधिकार्‍यांसह  जि.प. अध्यक्ष बचावले
तीर्थक्षेत्रवढा जुगाद येथे आला. महाशिवरात्रीला भरणार्‍या यात्रेसाठी तात्पुरता पूल उभारण्याकरिता पाहणीसाठी गेलेली नाव वर्धा नदीत उलटली. सुदैवाने काठापासून जवळच असल्याने व पाणी कमी असल्याने नावेतील जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकारी थोडक्यात बचावले.
वढा जुगाद येथे असलेल्या वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमावर हेमाडपंथी शिवमंदिर आहे. येथे दरवर्षीमहाशिवरात्रीची यात्रा भरते. या यात्रेसाठी चंद्रपूर-यवतमाळसह अनेक ठिकाणांहून भाविक मोठय़ा संख्येने येतात. नदीवर पक्का पूल नसल्याने नदीच्या पात्रात पाणी कमी असेल तिथून नदी पार करतात. त्यामुळे येथे तात्पुरता पूल उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, मुख्य कार्यपालन अधिकार्‍याचा प्रभार असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत डहाळकर, चंद्रपूर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता मुत्यालवार, अभियंता कुकडे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भगत, चंद्रकांत पाटील गोहोकार, प्रमोद शास्त्रकार वाहनाने नदीच्या काठावर पोहचले होते. त्यानंतर पाहणीसाठी डोंग्याने नदीतून जाताना जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी डहाळकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक बोंदरे, गट विकास अधिकारी हरीश माटे, कार्यकारी अभियंता भूषण मून यांची नाव काही अंतरावर अचानक बुडाली. काठापासून काही अंतरावरच नाव उलटल्याने मोठा अपघात टळला. नाव उलटली तिथे छातीपर्यत पाणी होते. सर्वजण एकमेकांचा आधार घेत नावेतून कसेबसे काठावर आले आणि उतरले. हे दृश्य बघून उपस्थितांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.