चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे १६ मार्च रोजी जिल्ह्यात येत आहेत. ते मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. याच दिवशी ते गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकार्यांशीही चर्चा करणार आहेत. या दौर्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्ष रिटा गुप्ता, आ. नांदगावकर, शिंदे, प्रविण दरेकर, राम कदम यांची उपस्थिती राहणार आहे. यासंबंधाने काही दिवसांपूर्वीच मनसेचे पूर्वविदर्भ संघटक हेमंत गडकरी यांनी पदाधिकार्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला मनसे जिल्हाध्यक्ष रामेडवार, राजू कुकडे, राहूल बालमलवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, मार्च ०९, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments