चंद्रपूर दि.२०- विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून सुरु असलेले माजी खासदार नरेश पुगलीया यांनी उपोषण महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांचे हस्ते निंबू पाणी पिऊन उपोषण सोडले. यावेळी माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नामदेव उसेंडी, महापौर संगीता अमृतकर, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील व मनपा आयुक्त प्रकाश बोखड उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुचनेवरुन आपण आलो असून नरेश पुगलीया यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री चव्हाण यांचे सोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले. ज्या मागण्या आपल्या विभागाशी संबंधीत आहेत. त्या संदर्भात सुध्दा एक बैठक घेण्यात येईल असे थोरात म्हणाले. पुगलीया यांच्या मागण्या जनहिताच्या असून त्या संदर्भात शासन गंभीर असल्याचे रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले. माजी खासदार नरेश पुगलीया यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन बाळासाहेब थोरात यांना दिले. मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेशी करावी व त्या पूर्ण कराव्यात अशी विनंतीही त्यांनी थोरात यांना केली. त्यानंतर बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांचे हस्ते निंबू पाणी घेऊन पुगलीया यांनी आपले सात दिवसाचे उपोषण संपविले.