मूल, :सिदेवाही तालुक्यातील येरगांव येथील रामदास सातपुते यांच्या मालकीच्या शेतातील
विहिरीत अज्ञात इसमाचे प्रेत सापडले होते. त्याची ओळख पटली असून कैलास इंदरशा
सुरपाम (वय ३०) असे मृतकाचे नाव अहे. प्रेमसंबंधात अडसर ठरल्याने त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला. पोलिसांनी पत्नीसह प्रियकरास अटक केली आहे.
कैलास इंदरशा सुरपाम (वय ३०) याचा २४ ङ्केब्रुवारी रोजी खून करून त्याचे प्रेत पळसगाव लगतच्या शेतातील विहिरीत ङ्केकून दिले. दरम्यान, २६ ङ्केब्रुवारी रोजी पडून असल्याची तक्रार qसदेवाही पोलिसात नोंदवली. त्यानुसार तपास अंमलदार चंद्रशेखर मेश्राम यांनी घटनास्थळी भेट देवून प्रेताची पाहणी केली. तेव्हा प्रेताची अवस्था पाहून त्यांना सदरचा प्रकार खून असल्याची खात्री पटली. त्यांनी सदर घटना ठाणेदार महिपालqसह चांदा यांना सांगितल्यानंतर कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून प्रेताचे शवविच्छेदन करून पुढील तपास सुरू केला. अज्ञात इसमाच्या प्रेताविषयी परिसरात चौकशी सुरू असताना पाच मार्च रोजी चांगुबाई इंदरशा सुरपाम (वय ६२) यांनी मुलगा कैलास २४ ङ्केब्रुवारी पासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. चांगुबाई सुरपाम यांच्या तक्रारीनुसार सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या प्रेतावरील कपडे दाखवून ओळख करून घेतली. तेव्हा सापडलेले प्रेत कैलासचे असल्याची खात्री पटली. प्रेताविषयी ओळख पटवून पोलिसांनी कैलासच्या नातेवाइकाचे बयाण नोंदविल्यानंतर कैलासचा खून झाल्याचे उजेडात आले.