चंद्रपूर : येथील एका नामांकित महाविद्यालयात शिकत असलेल्या दोन मुली मागील दोन दिवसांपासून घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. आता मुंबईत राहणाèया एका मित्राकडूनच त्यांचा अपहरण झाल्याचा संशय मुलीचे वडिल अशोक मेश्राम यांनी व्यक्त केला.
येथील ज्युबिली हायस्कूलमध्ये दहावीत शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. घटनेच्या दिवशी ३० जानेवारी रोजी सराव परीक्षा सुरू असल्याने दोघीही भूगोल, अर्थशास्त्र या विषयाचा पेपर देण्यासाठी शाळेत आल्या होत्या. त्यांनी परीक्षासुद्धा दिली. त्यानंतर त्या घरी परतल्या नाही. पालकांनी शोध घेतला. मात्र, दोघींचाही शोध लागला नाही. त्यामुळे दोन्ही मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. दरम्यान, मुलाच्या मित्राने या मुलींना पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अश्विन निरंजन माऊलकर याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. अश्विन हा मूळचा घुग्घूस येथील रहिवासी आहे. सध्या तो मुंबईतील पनवेल येथे राहतो. त्याची मेश्राम यांच्या मुलासोबत मैत्री आहे. तो काही दिवसांपूर्वीच येथे आला होता. त्यानेच मुलींना ङ्कूस लावून पळवून नेल्याचा आरोप मुलींच्या वडिलांनी केला आहे. आहे.