Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०४, २०१३

महसूल क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा अव्वल

 चंद्रपूर दि.०४ (प्रतिनिधी):
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्हयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर गडचिरोली जिल्हा दुस-या क्रमांकावर आला.  सिटीपीएसच्या मैदानावर रविवारी या स्पर्धेचा थाटात समारोप झाला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय वाघमारे होते.  गडचिरोलीचे जिलहाधिकारी अभिषेक कृष्णा, भंडारा जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रतापसिंह, महसूल उपायुक्त डि.एस.चिलमुलवार, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलिल, उदय चौधरी व निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण बडकेलवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तीन दिवस चालेल्या महसूल क्रीडा स्पर्धेत अनेक खेळ खेळल्या गेले. यात कबड्डी प्रथम गडचिरोली, व्दितीय चंद्रपूर, तृतीय भंडारा, हॉलीबाल प्रथम गडचिरोली, व्दितीय नागपूर, तृतीय चंद्रपूर, क्रिकेट प्रथम गडचिरोली, व्दितीय चंद्रपूर, तृतीय नागपूर, खो-खो प्रथम गडचिरोली, व्दितीय चंद्रपूर, तृतीय गोंदिया, फुटबाल प्रथम नागपूर, व्दितीय आयुक्त कार्यालय नागपूर, तृतीय क्रमांक गडचिरोली  जिल्हयाने पटकावला.
याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी विजय वाघमारे म्हणाले की, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमुळे कर्मचा-यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळाला. तीन दिवस चालेल्या या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या असून खेळ भावणा जोपासल्या गेल्यामुळे या स्पर्धेचा हेतू सफल झाला. विजेत्या संघाचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी गडचिरोली जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व भंडारा जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रतापसिंह यांचेही भाषण झाले.
महिला गटात खो-खो प्रथम चंद्रपूर, व्दितीय वर्धा, तृतीय भंडारा, थ्रोबॉल प्रथम वर्धा, व्दितीय चंद्रपूर व तृतीय स्थांनावर भंडारा जिल्हा आला.  या स्पर्धोच्या निमित्ताने सांस्कृतिक स्पर्धाही घेण्यात आल्या.  या स्पर्धेचे विजेतेपदही चंद्रपूर जिल्हयाने पटकाविले तर गडचिरोली जिल्हयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  या स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे.
समुह गीत- प्रथम नागपूर, व्दितीय वर्धा, समुह नृत्य प्रथम चंद्रपूर, व्दितीय नागपूर, तृतीय भंडारा, नक्कल - प्रथम चंद्रपूर, व्दितीय नागपूर, तृतीय भंडारा, नृत्य प्रथम चंद्रपूर, व्दितीय भंडारा, तृतीय नागपूर, एकांकिका- प्रथम चंद्रपूर, व्दितीय गडचिरोली, तृतीय भंडारा. चंद्रपूर जिल्हयाला सर्वसाधारण विजेतेपद घोषित होताच एकच जल्लोष करण्यात आला.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, तसीलदार गणेश शिंदे, राऊल सारंग व लिपीक अजय मेकलवार यांनी परिश्रम घेतले.
विजेत्या संघास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन पराग लिंगे व विशाखा गुर्जर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी एम.ए.राऊत यांनी मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.