चंद्रपूर : लोकसेवा आणि विकास संस्थेतङ्र्के दरवर्षी दिल्या जाणाèया विविध पुरस्कारांची घोषणा माजी अर्थराज्यमंत्री शांतारामजी पोटदुखे यांनी आज (ता.सहा) केली. यावर्षी डॉ. देवीqसह शेखावत, खासदार मारोतराव कोवासे, उषा तांबे, मनोहर म्हैसाळकर यांना गौरविण्यात येणार आहे.
लोकसेवा आणि विकास संस्थेतङ्र्के दरवर्षी कस्तुरबा गांधी, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार व डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्या नावांनी पुरस्कार दिले जातात. सार्वजनिक जीवनात कार्य करणाèया व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार डॉ. देवीqसह शेखावत, वीर बाबूराव शेडमाके पुरस्कार खासदार मारोतराव कोवासे, कस्तुरबा गांधी पुरस्कार मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना, तर कर्मवीर कन्नमवार पुरस्कार विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे वितरण येत्या १० ङ्केब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय येथे होणार आहे.या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री संजय देवतळे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, शांतारामजी पोटदुखे यांची उपस्थिती राहील.या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित, प्रा. जे. ए. शेख, प्रा. अंजली हस्तक, मदन धनकर,प्रशांत पोटदुखे, रमेश मामीडवार यांनी केले आहे.