चंद्रपूर, : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात महिला मेळावे घेण्यात आहेत. qसदेवाही येथे १७ फेब्रुवारीला हा मेळावा होईल.
मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष विद्या चव्हाण, आरोग्य राज्यमंत्री ङ्कौजिया खान, माजी खासदार निवेदिता माने, सूर्यकांता पाटील आदी उपस्थित राहतील. या मेळाव्यात जवळपास १५ हजार महिलांची उपस्थिती असेल, अशी माहिती पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिले.
राष्ट्रवादी महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मुलीचा जन्मदर सुधारणाèया गावांना प्रोत्साहन बक्षीस, व्यसनमुक्ती, महिलांविषयक कायद्यांची माहिती व प्रशिक्षण, सार्वजनिक शौचालये बचतगटांतील महिलांसाठी मोङ्कत प्रशिक्षण व प्रदर्शने आदींचा समावेश आहे, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा जोशी, महादेव पिदुरकर, गजानन पाल, अमित उमरे, अग्रवाल आदींची उपस्थिती होती.