Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०६, २०१३

प्रहार विद्यार्थी संघटनेचे धरणे

चंद्रपूर- गोंडवाना व रा. तु. म. नागपूर विद्यापिठातील अमाप शुल्क व भोंगळ कारभाराच्या विरोधात दि. ०६ फेब्रु.  रोजी स्थानिक शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय व राजिव गांधी इंजि. कॉलेज व रिसर्च इंस्टीटयुटच्या समोर प्रहार विद्यार्थी संघटने तर्फे धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थी विद्यार्थींनिंनी उसस्फू र्त पणे सहभाग नोंदविला प्रथम सकाळी १०.०० वा. राजिव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज समोर आंदोलनाला सुरूवात करण्यात आली मोठया संख्येने एकत्रित येऊन विद्याथ्र्यांनी अमाप शुल्क व भोंगळ कारभाराच्या विरोधात नारेबाजी केली. यानंतर प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख  यांनी विद्याथ्र्यांना संबोधित केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. किर्तीवर्धन दिक्षित यांनी विद्याथ्र्यांच्या समस्येंचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. येथिल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेट समोर सकाळी १०.०० वा. पासुन विद्याथ्र्यांनी घोषणा बाजी सुरू केली. दुपारी १२.०० वा. देशमुख यांनी शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांना संबोधित करून अन्याय विरूध्द सनदशिर मार्गाने लढण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.