चंद्रपूर : हनुमान मंदीर जटपुरा पंच तेली समाज व महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा, तैलीक महासंघ, संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, संताजी क्रिडा मंडळ, तेली युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी महोत्सवानिमित्त रविवारी शोभायात्रा काढण्यात आली.
स्थानिक हनुमान मंदीर जटपुरा येथून कस्तुरबा मार्ग, गिरणार चौक, पठाणपुरा, गांधी चौकातून परत मंदिरात शोभायात्रा गेली. ता. आठ ते १० ङ्केबु्रवारीदरम्यान तेली महोत्सव सोहळा पार पडला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखीचे पूजन व माल्यार्पण करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी शंकरराव रघाताटे, रतन हजारे, रqवद्र जुमडे, प्रभाकर जुमडे, प्रवीण इटनकर, देवेंद्र बेले, ज्ञानेश्वर महाजन, सूरज चवरे, बबनराव ङ्कंड, अॅड. दत्ता हजारे, शोभाताई भरडकर, नगरसेवक आकाश साखरकर उपस्थित होते. समाधी वॉर्ड, पठाणपूरा वॉर्ड, दादमदल वॉर्ड येथे शोभायात्रेचे स्वागत करीत नास्त्यांचे वाटप करण्यात आले. ही शोभायात्रा येथूून बावीस चौकात आल्यानंतर तेली युवक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य सूर्यकांत खनके, महापौर संगिता अमृतकर, सहाय्यक मोटार वाहन अधिकारी सुजितकुमार बाविस्कर, नगरसेविका अनिता कथडे यांनी संताजींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र खनके, विकास टिपले, शिरीष तपासे, मनोहर बेले, महेश टिपले, अनिल खनके, बाबा घुमडे, रवि टिपले, अजय खनके, अमोल तपासे, अनिल झाडे, रोशन टिपले, रूपक कामडे, मयुर पोटदुखे, मुकेश झाडे, नीलेश तपासे, उमेश तपासे, मिराबाई तपासे, संध्या तपासे, रेखा झाडे, अरूणा तडसे, युगांतरी तपासे, शीला तपासे, शीला बुटले, सुलोचना तपासे यांनी शोभायात्रेत सहभागी बांधवांना बिस्केट आणि पाण्याचे वितरण केले. या शोभायात्रेत शहरातील विविध भागातील तेली समाजबांधवांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र बेले, तर आभार रqवद्र जुमडे यांनी केले.