चंद्रपूरः गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्यादोन शालेय विद्यार्थ िनी पोलिसांना सापडल्या आहेत. त्यांना छत्तीसगडमधील बंबलेश्वरीतून ताब्यात घेण्यात आले . मुंबईतील एका मित्रासोबत त्या तेथेआढळल्याचे पोलिसांनी सांगितले . सराव परीक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारीला या दोन मुली घराबाहेरपडल्या . त्यानंतर त्या परतल्याच नाही . त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखलकेली होती . दोन्ही मुली ज्युबली हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकतात . पोलिसांनीप्रकरणाचा छडा लावत त्यांना छत्तीगडमधून ताब्यात घेतले . दोघींना मित्रही अल्पवयीन आहे .पोलिसांनी मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले असून त्यांच्या मित्राची रवानगी बालसुधारगृहातकेली आहे .
येथील ज्युबिली हायस्कूलमध्ये दहावीत शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. घटनेच्या दिवशी ३० जानेवारी रोजी सराव परीक्षा सुरू असल्याने दोघीही भूगोल, अर्थशास्त्र या विषयाचा पेपर देण्यासाठी शाळेत आल्या होत्या. त्यांनी परीक्षासुद्धा दिली. त्यानंतर त्या घरी परतल्या नाही. पालकांनी शोध घेतला. मात्र, दोघींचाही शोध लागला नाही. त्यामुळे दोन्ही मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. दरम्यान, मुलाच्या मित्राने या मुलींना पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे.