इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरेंचे स्पष्टीकरण
चंद्रपूर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बङ्कर झोनला अभयारण्याचा दर्जा देण्यात येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर येत्या १५ ङ्केब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार शोभाताई ङ्कडणवीस यांनी दिला आहे. मात्र, अभयारण्याचा दर्जा देण्याचा कोणताही प्रस्ताव qकवा मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी पत्रपरिषदेत दिले.
ङ्कडणवीस यांनी बंडू धोतरे यांच्या माङ्र्कतीने ताडोबा-अंधारी व्याघ्र
प्रकल्पातील बङ्कर झोनला अभयारण्याचा दर्जा आणि ७९ गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगून ङ्कसवणूक होत असल्याचे म्हटले आहे. याविरुद्ध येत्या १५ ङ्केब्रुवारी रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर बंडू धोतरे यांनी स्पष्टीकरण देताना कोणताही प्रस्ताव qकवा मागणी केलीच नसल्याचे सांगितले. ताडोबाच्या कोअर झोनबाहेरील बङ्कर क्षेत्रामुळे वन्यजीव आणि वनांचे संवर्धन होत आहे.त्यामुळे बङ्करला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे धोतरे म्हणाले. कोणताही आधार नसताना ङ्कडणवीस यांनी विनाकारण नावानिशी बदनामी केल्याचा आरोप ठेवत पुरावे जाहीर करण्याचे आव्हान धोतरेंनी केले. यावेळी पत्रपरिषदेला नितीन बुरडकर, रमेश मुलकलवार, संदीप इंगोले, किशोर वैद्य, अब्दुल जावेद, सुजय अवधरे उपस्थित होते.