Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१३

महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प २७५ कोटींचा

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या पहिल्या २७५ कोटी खर्चाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. मार्च महिन्यातील आमसभेत अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून एलबीटी कराची वसुली सुरू आहे. यातून सुमारे ३६ कोटी उत्पन्न मिळेल. शिवाय मालमत्ता आणि इतर स्वरूपाच्या करांतून आस्थापना आणि वेतनाचा खर्च भागविण्यात येईल. पंचशताब्दी निधीतूनही बरीच कामे केली जाणार आहेत. गतवर्षीपर्यंत मनपाचे मालमत्ताकराचे उत्पन्न आठ ते नऊ कोटी होते. चालू आर्थिक वर्षात एकूण १३ कोटींचा महसूल अपेक्षित आहे, तर आगामी आर्थिक वर्षात हा आकडा १७ कोटींपर्यंत जाण्याचा कर विभागाचा दावा आहे. उत्पन्नवाढीसाठी अर्थसंकल्पात अनेक नव्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात घनकचरा निर्माण करणाèया व्यावसायिकांवर वार्षिक पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंत आकारणी केली जाणार आहे. यात ७० हून अधिक प्रकारच्या व्यवसायांचा समावेश आहे. रुग्णालयांवरही करआकारणी करण्यात येणार आहे. वार्षिक नोंदणीसह बेडचार्ज वसूल करण्यात येणार आहे. या दोन्ही उपायांमुळे मनपाला सुमारे तीन कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पाणीकरात जवळपास दुप्पट वाढ सुचविण्यात आली आहे. याशिवाय मोकळे भूखंड आणि गुंठेवारीवरही आकारणी करण्यात येणार आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.