Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

‍ चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
‍ चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

विदर्भातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार...

विदर्भातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार...

                   ८ नोव्हेंबरला वर्षातील शेवटचे ग्रहण 

          

        नुकतेच २५ ओक्टोंबरला खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून ८ नोव्हेम्बर ला पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशात पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ % आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल तर पश्चिम  भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चन्द्रग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ०५.३० वाजता तर मुंबई येथून ०६.०१ वा  चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होईल आणि सर्व ठिकाणी ०७.२६ वा ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७०% टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ % ग्रहण दिसेल.  अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली. #Grahan2021 #Chandragrahan2021 #Lunareclipse2021

       विदर्भातून ग्रहण-  विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातून ५.३० वा चन्द्रोदयातच ग्रहणाला सुरवात होईल.इथे चंद्र ७० % पृथ्वीच्या सावलीने झाकाळला दिसेल.चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता ग्रहण दिसेल.येथे  ६० % भाग ग्रस्तोदित असेल,ग्रहण मध्यकाळ लगेच ०५.३५ वा तर ग्रहण अंत ०७.२६ वाजता होईल.पश्चिमेकडील जिल्ह्यात काही सेकंदाच्या फरकाने उशिरा ग्रहण दिसेल.शेवटी बुलढाना येथे ०५.४५ वाजता ग्रहणाला सुरवात होईल आणि अंत ०७.२६ वाजता होईल.येथे १ तास ४१ मिनिटे ग्रहण दिसेल आणि चंद्र २५ % ग्रस्तोदित असेल.सर्व ठिकाणी चंद्र क्षितिजावर १० डिग्री वर आल्या नंतरच चांगले ग्रहण पाहता येईल.

     ८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया,ऑस्ट्रेलिया ,उत्तर-दक्षिण  अमेरिका,येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही.उर्वरित  देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारताबाहेर ८ तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी ०१.३२ वा छायाकल्प चन्द्रग्रहनाला सुरवात होईल.०२.३९ वा खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल, ०३.४६ वा खग्रास ग्रहणाला सुरवात होईल तर ०५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. ०६.१९ वा खंडग्रास ग्रहण समाप्त तर ०७.२६ वा छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. .ग्रहणाचा छायाकल्प काळ ०२.१४ तास ,खंडग्रास काळ ०२.१५ तास , खग्रास काळ ०१.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ०५.५४ तास असेल.भारतातून चंद्रोदया सोबतच ग्रहण लागलेले असेल.आणि ०७.२६ वा.ग्रहण संपेल.पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व-पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण (ग्रस्तोदित भाग) लहान होत जाईल. 

      सूर्य आणि चंद्र ह्यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते ह्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत (Umbra) पूर्ण चंद्र आल्यास खग्रास,काही भाग आल्यास खंडग्रास (penumbra) तर उप् छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प (Antumbra) चंद्रग्रहण होते.दरवर्षी दोन तरी चन्द्रग्रहणे होतात.२०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार आहेत त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण,५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण,१४/१०/२३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८,२९,/ऑक्टो २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहनांचा समावेश आहे.पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात.ग्रहणे हा केवळ उन्ह-सावल्यांचा खेळ असून त्याबधल  अंधश्रद्धा मानने अगदी चुकीचे आणि अवैज्ञानिक आहे.सर्व नागरिक आणि विध्यार्थ्यांनी ग्रहनांचा वैद्न्यानिक दृष्ट्‍या अभ्यास केला पाहिजे.चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही.पूर्व दिशेला क्षितिज दिसेल अश्या मैदानांत किंवा घराच्या सुरक्षित छतावर जावून साध्या डोळ्याने किंवा लहान द्वीनेत्री/बायनोकुलरने ग्रहण पहावे. 

    भारतातील ग्रहण वेळा -भारतात अरुणाचल प्रदेशातून ०४.२३ वा जवळ जवळ खग्रास स्थितीतच चंद्रोदय होईल आणि ३ तास ग्रहण दिसेल, कोलकाता येथून ०४.५२ वा.२.३४ तास दिसेल,पटना येथून ०५.०० वा २.२५ तास दिसेल,वाराणसी येथून ०५.०९ वा.०२.१६ तास दिसेल,लखनऊ येथे ०५.१५ वा २.१० तास दिसेल,दिल्ली येथे ०५.३१ वा. १.५८ तास दिसेल,बिकानेर येथे ०५.५७ वा १.४१ तास दिसेल तर भूज येथून ०६.१० वाजता आणि सर्वाधिक कमी काळ (१.१८ तास) ग्रहण दिसेल.

  महाराष्ट्रातील ग्रहनाच्या वेळा- ह्या खालील वेळा चंद्रोदयाच्या आहेत,ग्रहण क्षितिजावर चंद्र आल्यानंतर दिसेल. गडचिरोली येथून ग्रहणाला ०५.२९ वा सुरवात होईल आणि ०७.२६ वा ग्रहण संपेल, येथे सर्वाधिक १ तास ५६ मिनिटे ग्रहण दिसेल आणि ग्रस्तोदित चंद्र ७०% दिसेल.चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता, नागपूर येथे ०५.३२ वाजता ,यवतमाळ येथे ०५.३७ वा., अकोला येथे ०५.४१ वा ,जळगाव येथे ०५.४६ वा., औरंगाबाद येथे ०५.५० वा ,नाशिक येथे ०५.५५ वा.,पुणे येथे ०५.५७ वा .,मुंबई येथे ग्रहण ०६.०१ वाजता सुरु होऊन ०७.२६ वा ग्रहण संपेल.समुद्र किनारी भागात महाराष्ट्रात सर्वात कमी काळ म्हणजे १ तास २५ मिनिटेच ग्रहण दिसेल.( खालील कोष्टकात महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील ग्रहनांचा काळ-वेळ दर्शविला आहे,एकाच कोष्टकात असलेल्या अनेक शहरांत अक्षांस/रेखांका नुसार दोन/तीन सेकंदाचा फरक राहील ह्याची नोंद घ्यावी. ह्या शहराच्या जवळील सर्व तालुका आणि ग्रामीण भागात ह्याच वेळा असतील  )

६/११/२०२२                                               

                                               प्रा सुरेश चोपणे 

                                       खगोल अभ्यासक , अध्यक्ष- स्काय वाच ग्रुप 

                                   फोन-९८२२३६४४७३ , smchopane@gmail.com

                 

खालील पानावर तक्ता दिला आहे -------

                  कुठे ,केव्हा ,किती काल ग्रहण दिसेल 

    शहर 

ग्रहण सुरवात 

ग्रहण मध्य- 

अंत - टक्के  

एकूण काळ

गडचिरोली

गोंदिया,भंडारा   

०५.२९ 

०५.३३ 

०७.२६ वां       (७०%)  

१.५६ तास 

चंद्रपूर ,नागपूर 

०५.३२ 

०५.३४ 

-,-    ६०%

१.५४ तास

वर्धा,यवतमाळ 

०५.३७ 

०५.३९ 

--    ५५ % 

१.४९ तास 

अमरावती,अकोला,

नांदेड,परभणी 

०५.३८ 

०५.४० 

--    ५०%

१.४८ तास 

जळगाव,औरंगाबाद 

बीड  

०५.५० 

०५.५७ 

-- २५ % 

१.३६ तास 

सोलापूर 

०५.५८ 

०६.००

-- २० %  

१.२८ तास 

धुळे,मालेगाव

अहमदनगर 

०५.५३ 

०५.५७ 

-- १७ %

१.३३ तास 

पुणे,नाशिक,कोल्हापूर

सांगली,सातारा  

०५.५७ 

०५.५९ 

--१५ %

१.२९ तास 

मुंबई,अलिबाग,

गोवा,रत्नागिरी 

०६.०१ 

०६.०३

--१२ %

१.२५ तास 


                      #Grahan2021 #Chandragrahan2021 #Lunareclipse2021

ग्रहण असे दिसेल

संबंधित शोध


गुरुवार, नोव्हेंबर ०३, २०२२

इको-प्रो तर्फे पक्षीनिरीक्षण तथा जनजागृती कार्यक्रम

इको-प्रो तर्फे पक्षीनिरीक्षण तथा जनजागृती कार्यक्रम



शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती : पद्मभूषण डॉ सलीम अली तसेच सेवानिवृत्त वनाधिकारी श्री मारुती चितमपल्ली यांनी पक्षी संवर्धनाकरिता केलेल्या अमूल्य कार्याची दखल म्हणून यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याच निम्मिताने इको-प्रो भद्रावती तर्फे पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान शहरालगत व तालुक्यात असलेल्या काही पानवठ्यांवार पक्षी निरीक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे.

दि.५ नोव्हे. ला घोडपेठ तलाव, दि.६ नोव्हे. ला दुधाळा व लेंडारा तलाव, दि.७ नोव्हे. ला चिंतामणी तलाव, दि.८ नोव्हे. ला मल्हारा तलाव, दि.९ नोव्हे ला विंजासन तलाव, दि.१० नोव्हे. ला घोट-निंबाळा तलाव, दि.११ नोव्हे. ला डोलारा तलाव तसेच दि.१२ नोव्हे ला गौराळा तलाव या तलावांवर दररोज सकाळी ६ ते ८.३० या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


ज्यात पक्षीनिरिक्षणा सोबतच पक्षांचे निसर्गात असणारे महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास संवर्धन, स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण या सोबतच पक्षीसंरक्षण व संवर्धन कायद्या विषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
हिवाळ्याची चाहूल लागताच प्रवासी पक्षी विविध भागातून येत असतात. वर्षभर नजरेआड असणाऱ्या या रंगबेरंगी पक्ष्यांना पाहण्याची, त्यांना अभ्यासनाची व त्यांचे संवर्धन करण्याची ही सुवर्ण संधी आहे. स्थानिक पक्षानं सोबतच या प्रवासी पक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी ही स्थानिक नागरिकांची आहे त्या करिता संपूर्ण आठवलाभर चालणाऱ्या या उपक्रमात विधार्त्यांनी, सामाजिक संघटनांनी, पक्षी अभ्यासकांनी तसेंच सामान्य नागरिकांनी मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन इको -प्रो तर्फे करण्यात येत आहे.

गुरुवार, ऑक्टोबर १३, २०२२

 सलग तिसऱ्या वर्षी चंद्रपूर शहराला ३ स्टार मानांकन

सलग तिसऱ्या वर्षी चंद्रपूर शहराला ३ स्टार मानांकन

चंद्रपूर:
“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित केलेल्या नामांकनामध्ये चंद्रपूर शहराचा ३ स्टार मानांकन देऊन गौरव करण्यात आला आहे. चंद्रपूर शहराने २०२०,२०२१ व २०२२ असे सलग ३ वर्ष ३ स्टार मानांकनाचा दर्जा राखला आहे.

कचरामुक्त शहराच्या दृष्टीने स्वच्छतेचे नियमीत काम महानगरपालिकेतर्फे केले जात आहे. शहरातील सर्व परिसरात घंटागाडीच्या माध्यमातुन कचरा गोळा करणे, कचरा विलीगीकरण करणे सफाई कर्मचाऱ्यांद्वारे विविध पाळ्यात दिवसरात्र केले जाते. कचरामुक्त शहर राखण्याच्या दृष्टीने नागरिकांचा मोठा सभाग सुद्धा लाभत आहे.

शहरांसाठी कचरामुक्त तारांकित क्रमवारीचे प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रमांतर्गत नगरे /शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या आणि या कामाला ओळख देण्याच्या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातो. कचरामुक्त शहराच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित केलेल्या तारांकित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी करत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छता अँपवरही नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती.
15 व 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

15 व 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल


चंद्रपूर(खबरबात):
  धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथील सोहळा पाहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक 15 व 16 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चंद्रपूर शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनाकरीता तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग स्थळे उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सादर करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) व कलम 36 अन्वये दि. 15 ऑक्टोंबरचे 7 वाजेपासून ते 17 ऑक्टोबर 2022 च्या 7 वाजेपर्यंत चंद्रपूर हद्दीतील स्थळे सर्व वाहनाकरीता पार्किंग स्थळे म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

ही आहेत वाहनाकरीता पार्किंग स्थळे:

नागपूर रोडने दिक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांनी त्यांची दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण व जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान येथे पार्क करावीत. तसेच शहरातून दिक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता सेंट मायकल स्कूल मैदान व सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौक), वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दिक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता लोकमान्य टिळक हायस्कूल (जिल्हा स्टेडियमच्या मागे) ‌व जीवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था(मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे), मुल रोड, बंगाली कॅम्प व तुकूम या परिसरातून येणाऱ्या वाहनांकरिता कृषी भवन जवळील मैदानात व टॅक्सी स्टँड ही स्थळे पार्किंग स्थळे म्हणून जाहीर करण्यात आली असून या ठिकाणी नागरिकांनी व अनुयायांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करावीत. असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

रविवार, सप्टेंबर ११, २०२२

 नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे

नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे


विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई / चंद्रपूरदि. 11 सप्टेंबर : ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुखपारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी देखील आपल्या तक्रारीनिवेदनेअर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सुशासन नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 8 सप्टेंबरला घेतलेल्या बैठकीत विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या कामकाजाविषयी चर्चा झाली. नागरिकांचे विविध प्रश्न आणि शासनस्तरावरील कामे तालुकाजिल्हा पातळीवरच निकाली निघावेत यासाठी विभागीय मुख्यमंत्री सचिवालय अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  मुख्य सचिवांना दिल्या.

नागरिकांची शासनस्तरावर असलेली कामेत्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्जनिवेदनेआदी मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधीत क्षेत्रीयस्तरावर कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखतापार्दशकतागतिमानता आणतानाच सर्वसामान्य जनतेला कमी त्रास व्हावा या हेतूने कोकणअमरावतीपुणेनाशिकऔरंगाबादनागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय (सीएमओ) यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयांमधील महसुल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ते याबाबत संनियंत्रण करीत असून विभागीय कक्षांमध्ये अर्ज स्विकारणेपोच पावती देणेअर्जावर कार्यवाही करणे तसेच प्राप्त अर्जत्यावरील कार्यवाही केलेले अर्ज व प्रलंबीत अर्ज इ. बाबतचा मासिक अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवितात. मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचे या क्षेत्रियस्तरावरील मुख्यमंत्री कार्यालयावर संनियंत्रण केले जात आहे.

माहिती अधिकाराअन्वये प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जावर प्रशासकीय विलंब टाळण्याच्या दृष्टीने व तातडीने कार्यवाही होण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जन माहिती अधिकारीसहायक जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांना पदनिर्देशित करण्यात आले आहे.




गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू

Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू



by Shirish Uge
वरोरा |  स्थानिक शेगाव येथुन जवळच असलेल्या चारगाव धरण येथे आज दुपार तीन वाजताच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  Two youths died due to drowning

      सविस्तर असे की बाहेर गावी शिकत असल्याने आज पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने एन्जॉय म्हणून फिरण्याचा बेत घेऊन सर्व मित्र एकत्र येऊन चारगाव धरण येथे जाण्याचा बेत घेतला व इथे आले . सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा मृतक हार्दिक विनायक गुळघाणे राहणार शेगाव बू.हा सेल्फी फोटो काढण्या करिता गेला असता पाय स्लीप होऊन पाण्यात पडला. तेव्हा मृतक आयुष चीडे राहणार वरोरा हा त्याला वाचविण्या करिता गेला असता तो सुधा पाण्यात पडला . तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला.. यात हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष राहणार शेगाव बू... तर दुसरा आयुष चिडे याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी घटना स्थळ गाठून मुलांना पाण्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गावातील श्री रामकृष्ण भट यांच्या सहकार्याने नाव्ह व लोखंडी गळ च्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले ...सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्या करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले . याचा अधिक तपास ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहे . मृत युवक सोबत त्यांचे सवंगडी श्वेतम जयस्वाल राह.शेगाव बू. मयूर पारखी राह.वरोरा. आश्रय गोळगोंडे राह.वरोरा.हे मित्र तलाव बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाचले..

Chandrapur News34 Mh 34 | Warora | Chandrapur Police

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

Chandrapur Airport Update | चंद्रपूर विमानतळासंदर्भात महत्त्वाची अपडेट

Chandrapur Airport Update | चंद्रपूर विमानतळासंदर्भात महत्त्वाची अपडेट

चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी.: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

*वन्यजीव मंडळाच्या परवानग्या त्वरित मिळविण्याच्या सूचना




मुंबई, दि. 24 ऑगस्ट 2022 : Chandrapur Airport
चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश वनमंत्री ना.श्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत. विधान भवनात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरता उपाययोजना आखण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ना.श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले की चंद्रपुर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर येथील वन पर्यटन, पर्यावरण व व्याघ्र संवर्धन, आणि आदिवासींच्या वनोत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीही या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे.

वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबर मधील नियोजित बैठकीत या विमानतळासंदर्भातील सर्व परवानग्या मिळविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकारीवर्गाला दिले. Chandrapur Airport

या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्यापलिकडील सुरक्षा क्षेत्र यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवरही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला.