Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सिंदेवाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सिंदेवाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै १५, २०१८

चंद्रपुरात वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

चंद्रपुरात वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रत्नापुर वनपरिक्षेत्रात एका वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी रत्नापूर-खांडला मार्गापासून २०० मीटरवर वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.मिळालेल्या माहितीवरून तीन ते चार दिवसांपूर्वी हा वाघ मरण पावला असावा, असा अंदाज वनविभागाने लावला आहे.मात्र हा वाघ कशामुळे मेला ह्याचे कारण समजू शकले नाही.




सोमवार, जुलै ०२, २०१८

अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश

अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश

वाघ पिंजरा  साठी इमेज परिणाम
संग्रहित 
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
६ ग्रामस्थांना ठार केलेल्या दहशदखोर वाघाला पिंजराबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागात सिंदेवाही परिसरात गेले काही दिवस एका वाघाने चांगलीच दहशत पसरविली होती. किन्ही, मुरमाडी , लाडबोरी भागात या वाघाने शेतशिवार कामे करणा-या आणि जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या 6 ग्रामस्थांना ठार केले होते तर ३ ग्रामस्थांना जबर जखमी केले होते. या घटनेनंतर वाघाला पकडण्यासाठी वनविभाग मोठे अभियान राबवित होते. लोकांचा रोष बघता या वाघाला पकडने वनविभागाची महत्वाचे होते,या संपूर्ण घटनेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याने या वाघाचा बंदिबस्त करण्याच्या सूचना वनाधिका-याना दिल्या होत्या.याच प्रयत्नात रविवारी संध्याकाळच्या सुमारास सिंदेवाही जंगलातील कक्ष क्रमांक १३३४ मध्ये वन विभागाच्या पथकाने या वाघाला बेशुद्ध करत त्याचा ताबा मिळविला.विशेष म्हणजे या वाघाला पकडण्यासाठी जंगल परिसरात वनविभागाने कॅमेरे लावून तब्बल ४० वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची या वाघावर पाळत होती.हा दीड ते २ वर्षाचा नर वाघ असून त्याची तातडीने चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यातच या वाघाची दहशत असल्याने स्थानिक नागरिक संतापले होते. वाघ पिंजराबंद झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

मंगळवार, जून १९, २०१८

  सिंदेवाही तालुक्यातील वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

सिंदेवाही तालुक्यातील वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

वाघ साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी व अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे महिला मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या वाघाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. वनविभागाने यासंदर्भात चौकशी करून वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनाच्छादित भागात अनेक वेळा वाघामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. चंद्रपूर जिल्ह्यासाठी वाघ हा महत्त्वपूर्ण प्राणी आहे. मात्र यासोबतच वनाशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या जीवित्वाची किंमत अमूल्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव व वन्यजीव संघर्ष जनजागृती आणि उपायोजना संदर्भात वेळोवेळी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांचे नेहमी सहकार्य असून या जिल्ह्यातील वाघ पर्यटनाचे व मिळकतीचे माध्यम आहे. तरीही अशा परिस्थितीत नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे पहिले कर्तव्य असून वनविभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्वांनी सिंदेवाही तालुक्यामधील वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी एकत्रित मोहिम आखावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 
17 जून रोजी सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावातील शेत शिवारामध्ये पट्टेदार वाघाने अनुबाई आनंदराव चौखे या महिलेवर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी 15 जून रोजी देखील सिंदेवाही तालुक्यातील किन्ही या गावांमध्ये शेतकऱ्याला वाघाने जखमी केल्याची घटना घडली. गेल्या चार पाच महिन्यांमध्ये या परिसरात पट्टेदार वाघाची प्रचंड दहशत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाशेजारी राहणाऱ्या गावांमध्ये वनावर आधारित अनेक जोडधंद्याला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी अगरबत्ती उद्योगांपासून पर्यटनाच्या पूरक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. जंगलामध्ये नागरिकांना जावेच लागू नये यासाठी शंभर टक्के गॅस वितरणाचा यशस्वी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांना रोजगार मिळण्यासोबतच शेताला कुंपणाची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. तरीही अशा काही दुर्दैवी घटना घडतातच. मात्र या भागातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे पहिले कर्तव्य असून संबंधित विभागाने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबतही वनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवार, एप्रिल ०७, २०१८

पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

चोरी साठी इमेज परिणाम
सिंदेवाही/प्रतिनिधी:
 तळोधी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले आणि सिंदेवाही येथील रहिवासी असलेले पोलीस हवालदार यांच्या घरी कोणी नसल्याने  संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला यात ९२ हजार ४०० रुपयाचा सोने,व यासह चांदीचा ऐवज लंपास केला.या प्रकरणात  सिंदेवाही पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदेवाही येथील कॉलनी परिसरात राहत असलेले जनार्दन मांदाळे यांचे घरी कुणी नसल्याने चोरट्यांनी भरदुपारी  दोन वाजताच्या सुमारास दरवाज्याचा ताला तोडला व  दिवानात ठेवलेल्या सोन्याचे मंगळसुत्र, चांदीचा करंडा, लक्ष्मीची मुर्ति यासह किरकोड मौल्यवान वस्तूनसह एकूण  ९२ हजार ४०० रुपयाचा ऐवज चोरला .
     कुटुंबिय काही वेळानंतर घरी आल्यानंतर प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी सिंदेवाही पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली  असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेमुळे पोलीसाच्याच घरी झाल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकात आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

मंगळवार, जानेवारी १६, २०१८

ट्रक आणि कारच्या धडकेत एक ठार ; एक जखमी

ट्रक आणि कारच्या धडकेत एक ठार ; एक जखमी

सिंदेवाही /प्रतिनिधी:
सिंदेवाही-चंद्रपूर मार्गावरील सरडपार ते सिंदेवाही मुख्य रस्त्यावरील कळमगाव कार्नरवर ट्रक व कारची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगलवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. चंदन कोठेवार असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव असल्याचे कळते. 
सरडपार ते सिंदेवाही मुख्य रस्त्यावरील कळमगाव कार्नरजवळ ट्रकने समोरून येत असलेल्या कारला जोरदार धडक दिली. यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चकणाचुर झाला असून यात चंदन कोठेवार ठार झाले.तर वृत्त लिहिपरियंत जखमीचे नाव कळू शकलेले नव्हते. गंभीर अपघातग्रस्ताला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कड़ते.