Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विधान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विधान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, मे ०४, २०१८

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक छाननीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक छाननीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

election साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कालच्या शेवटच्या दिवशी दाखल केलेले आठही उमेदवारांचे 12 अर्ज वैध ठरवण्यात आले आहे.
आज नाम निर्देशन करणाऱ्या छाननी समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या 8 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले होते. राज्यात भारत निवडणूक आयोगाने रायगड -रत्नागिरी - सिंधुदुर्ग , नाशिक , वर्धा -चंद्रपूर - गडचिरोली, परभणी -हिंगोली, अमरावती आणि उस्मानाबाद -लातूर - बीड या मतदारसंघात स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे . 
काल ज्यांनी अर्ज दाखल केला आहे, यामध्ये रामभाऊ पुंडलिक मेश्राम-भाराकॉ-अपक्ष, जगदीश अचलदास टावरी-अपक्ष, सौरभ राजू तिमांडे-अपक्ष, रामदास भगवानजी आंबटकर-भाजपा, सुरेश रामाजी मुंजेवार-अपक्ष, चंदनसिंह साधुसिंग चंदेल भाजपा-अपक्ष, इंदकुमार सराफ-भाराकॉ, पांडूरंग रामू जाधव-अपक्ष यांचा समावेश आहे. 7 मे रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे .या निवडणुकीसाठी मतदान दिनांक 21 मे रोजी सकाळी 8 ते सायं.4 वेळात घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 24 मे 2018 रोजी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे