Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वाटप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाटप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट १५, २०१८

कुपोषितांना भूमिपुत्राची साथ

कुपोषितांना भूमिपुत्राची साथ

कुपोषित बालकांना भूमीपुत्राकडून पोषणआहार वाटप
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील कुपोषित बालकांची खुप संख्या आहे पण त्यावर  आपल्याला योग्य मार्गदर्शन करून कुपोषित बालकांना योग्य आहार पोहचावा हि संकल्पना घेऊन डाँ सपना बच्चूवार या क्षेत्रात कार्य करीत आहे. ही संकल्पना  भूमीपुत्राचे सामाजिक कार्यकर्ते मा श्री विनोद   गोवरदीपे सर , नीतेश खामनकर ,निलेश पाऊणकर यांना डाँ सपना बच्चूवार यांनी सांगितली त्यांनी  अथक परिश्रम घेऊन कुपोषित बालकांना एकदिवसीय आहार मिळावा यासाठी विनोद गोवरदीपे, नीतेश खामनकर, निलेश पाऊणकर यांनी व  भूमीपुत्राचे सर्व सदस्यांनी यात आर्थिक मदत केली व हा स्तुत्य उपक्रम घडवून आणला. या कार्यक्रमात बाल रोग तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी व मल्टी व्हिटॅमिन टॉनिक बाटल्या वाटप करण्यात आल्या.
दि. १४/०८/२०१८ रोज घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात  उद्घाटक: डाॅ. राहुल भोंगळे, बाल रोग तज्ञ, जि.सा.रू.
अध्यक्ष: श्री . संजय झोल्ले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण, चंद्रपुर प्रमुख पाहुणे: श्री. प्रकाश भादंकर, सि.डि.पी.ओ. चंद्रपुर प्रमुख अतिथी मा श्री उमाकांत  धांडे ,डाँ सोनाली कपूर, डाँ.यशोधन वाडेकर, डाँ सपना बच्चूवार गोवरदीपे सर नीतेश खामनकर या कार्यक्रमात  उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्र-संचालन केतन जुनघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद जी उरकुडे सरांनी केले.  या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी  मोलाचा वाटा असणारे भूमीपुत्राचे सहकारी मित्र मा. श्री संतोष  ताजणे , विनोद गोवरदीपे, लक्ष्मीकांत धानोरकर, महेश गुंजेकर ,महेश खंगार,रोशन आस्वले, प्रवीण सोमलकर, प्रणय काकडे , निलेश पाऊणकर, आशीष ताजणे, अतुल जेणेकर, केतन जुनघरे, प्रमोद उरकुडे,मनोहर डवरे, सूर्यकांत डवरे, नीतेश खामनकर, दीक्षांत बेले, प्रिया नांदे , कीर्ती केशट्टीवार व इतर मित्रांनी सहकार्य केले.

रविवार, एप्रिल १५, २०१८

युथ ऑफ चांदा तर्फे शालेय साहित्याचे वाटप

युथ ऑफ चांदा तर्फे शालेय साहित्याचे वाटप

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीचेऔचित्य निमित्य चंद्रपुर येथील विद्यामंदिरप्राथमिक शाळा उर्जानगर येथे युथऑफ चांदा बहुद्देशीय चंद्रपुर संस्थेतर्फे शालेय पुस्तकांचे ,शैक्षणिक साहित्य तसेच  चाँक्लेट्स चे वितरण करण्यात आले.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि.निलेशजी बेलखेडे  यांनी विद्यार्थांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जिवन प्रणाली व  आजच्या काऴातील शिक्षणाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
 यावेळी शाऴेचे  मुख्याध्यापक आवारी सर  यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा.उराडे मँडम यांनी केले.
 यावेळी संस्थेचे इंजि.सिया नागापुरे, रुपल उराडे,सागर मुंधडा,मुकेश जक्कुलवार, किरन निब्रड,        सुरज घोंगे,अश्विन देवतळे,सागर तुरक व इतर सदस्य उपस्थित होते. 



मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

महाशिवरात्री निमित्य शिवसेने तर्फे शिरा वाटप;भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

महाशिवरात्री निमित्य शिवसेने तर्फे शिरा वाटप;भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्री निमित्य शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेना चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शहरातील प्रसिद्ध असलेले प्राचीन अंचलेश्वर मंदिर येथे महादेवाच्या दर्शनाकरिता येणा-या हजारो भाविकांसाठी आज शिरा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 या महाप्रसादाला हजारो भक्तांनी शिरा प्रसाद म्हणून ग्रहण केला. यावेळी शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष राजेश नायडू, नगरसेवक विशाल निंबाळकर, उपजिल्हा प्रमुख माया पटले, संतोषी  चव्हाण, वंदना हातगांवकर, दुर्गा वैरागडे, किशोर बोल्लमवार, दिलीप बेंडले, विनोद अनंतवार, विनोद गोल्लजवार, लक्ष्मण टोकला, रुपेश पांडे, गौरव जोरगेवार, मोहित मोदी अक्षय कोटावार यांची उपस्थिती होती.
             महाशिवरात्रीला हजारो भाविक आजच्या दिवशी उपवास पाळतात उपाश्या पोटी महादेवाचे दर्शनाकरिता शहरातील अनेक मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात. हि बाब लक्षात घेता आज शिवसेना चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शहरातील प्राचीन प्रसिद्ध असलेले अंचलेश्वर गेट येथील शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या  भाविकांनी या शिरा महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी कार्यकर्ता, शिवसैनिक यांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.