Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, एप्रिल ०१, २०२०

विनाकारण घराबाहेर निघाल तर थेट गाढवावरुन धिंड...

विनाकारण घराबाहेर निघाल तर थेट गाढवावरुन धिंड...

बीड

कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. मात्र या दरम्यान काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरस आणखी पसरण्याची शक्यता आहे. याला आळा घालण्यासाठी गावात बीड जिल्ह्यातील टाकळी येथील गावकऱ्यांनी एक अजब निर्णय घेतला आहे. घराबाहेर विनाकरण फिरणाऱ्यांची गाढवावरुन धिंड काढण्यात येईल, असा निर्णय टाकळीच्या गावकऱ्यांनी घेतला आहे.

एक वेळ विनाकारण बाहेर आढळून आल्यास पाचशे रुपये दंड, तीन वेळा आढळून आला तर थेट गाढवावरुन धिंड असा निर्णय टाकळी गावच्या गावकऱ्यांनी एकमुखाने घेतला आहे.

आता या गावची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. थेट गावात दवंडी देऊन या निर्णयाची माहिती सगळ्यांना देण्यात आली. खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गावात स्वच्छता मोहिमही राबवण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणार नाही, असा विश्वासही गावच्या सरपंचांनी व्यक्त केला.