Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

राज्यमंत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राज्यमंत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

 महाराष्ट्रातील मंत्र्यांची  म्हैसूरला भेट

महाराष्ट्रातील मंत्र्यांची म्हैसूरला भेट

सेंट्रल फूड टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट

कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील भारत सरकारच्या सेंट्रल फूड टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट ला काल महाराष्ट्रातील मंत्री आणि राज्यमंत्री यांनी भेट दिली.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे , पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर , कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर , अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर ,ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार , सचिव सर्वश्री विकास खारगे, विजयकुमार, देबाशीष चक्रवर्ती , चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री देवराव भोंगळे , मानव विकास आयुक्त भास्कर मुंडे यांची या भेटीदरम्यान प्रामुख्याने उपस्थिती होती. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत विकसित होणाऱ्या 25 तालुक्यात संयुक्त राष्ट्रसंघासोबत झालेल्या सामंजस्य कराराला अनुसरून सदर इन्स्टिट्यूट मधील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रकल्प राबवित सामूहिक सुविधा केंद्र उपलब्ध करत मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही भेट आयोजित करण्यात आली होती.

सेंट्रल फूड टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे 400 च्या वर विविध संशोधन आहेत.सेंट्रल फूड टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक श्री जितेंद्र जाधव आणी त्यांच्या सहकारी चमूने अन्न प्रक्रियेशी तसेच फळ , भाज्या , भात, ज्वारी , बाजरी , भगर, चिकन, मासे, मास , अंडी यावरील प्रक्रियेशी संबंधित विविध तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पाचे सादरीकरण करत विस्तृत माहिती दिली . यावेळी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया , अमरावती, अकोला, बुलढाणा,नंदुरबार, हिंगोली, जालना, यवतमाळ या 12 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते .

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

पाशा पटेल यांना राज्यमंत्र्याचा दर्जा

पाशा पटेल यांना राज्यमंत्र्याचा दर्जा


मुंबई दि.१६ राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.सरकारच्या वतीने त्या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.


राज्यातील शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा या दुहेरी उद्देशाने राज्य कृषी मूल्य आयोग गठीत करण्यात आला असून, सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल म्हणजेच ‘पाशा पटेल’ यांची या आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेल्या जूलै महिन्यात नियुक्ती करण्यात आली आहे.या आयोगाच्या माध्यमातुन करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधित्व याचा विचार करून पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाशी समकक्ष दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.