Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मोर्चा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोर्चा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑगस्ट ०४, २०१८

चंद्रपुरात मराठा क्रांती मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

चंद्रपुरात मराठा क्रांती मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज चंद्रपुरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यात विविध मागण्यांचे निवेदन घेऊन मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शहरातील गांधी चौक येथून सुरुवात झाली.आंदोलनातील समाज बांधवांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे व जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत मिळाली पाहिजे तसेच घरातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,कोपर्डीच्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अश्या मागण्यां घेऊन हा मोर्चा  शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आला, या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यांनतर मोर्चातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

मंगळवार, जून १२, २०१८

पवनी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

पवनी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

Fisherman's Front at the Pawani Tehsil Office | पवनी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चापवनी/प्रतिनिधी:
 मत्स्य व्यवसायासासाठी तलाव कंत्राट धोरणासंदर्भात वारंवार आश्वासने देऊनही त्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेने सोमवारला पवनी तहसिल कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन केले. या आंदोलनात हजारो मासेमार बांधव सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही मासेमार समाज शासकीय योजनांपासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सरकारने कोणतेही ठोस पावले उचलले नाही त्यामुळे या समाजाचा वापर केवळ निवडणूक पुरते करून घेतला जात आहे. त्यामुळे या समाजाची सामाजिक, आर्थिक, बौद्धीक व राजकीय उन्नती होऊ शकलेली नाही. आता या समाजाला हक्काची जाणीव झाली असून संघटित होऊन आंदोलन करण्यात येत आहे.
भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १५ ही दे धक्का आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारला, पवनी तहसील कार्यालयात दे धक्का आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्याकडे लक्ष द्या अन्यथा आम्ही राज्यकर्त्यांना भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देणार असा गर्भित ईशाराही दिला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ३० जुन २०१७ चा मत्स्य व्यवसायाचा शासन निर्णय रद्द करून तलाव, जलाशयाचे कंत्राट पुर्ववत लिजवर देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त भटक्या जमातींना १३ टक्के आरक्षण देण्यात यावे. लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करण्यात यावी. धरणाखालील भागात मासेमारी व डांगरवाड्याच्या व्यवसाय पूर्णत: बंद पडल्यामुळे मासेमारांना प्रकल्पग्रस्त घोषित करून सुविधा पुरविण्यात यावे, मामा तलावातील गाळ उपसा करून तलावातील अतिक्रमणे काढण्यात यावे, जलाशयात पिढयानपिढया मासेमारी करीत असताना त्याची नोंद महसूल रेकॉर्डवर नमुद करण्यात यावे, २०० हेक्टरवरील जलाशयावर एकापेक्षा जास्त संस्थेची नोंदणी करण्याचा शासन निर्णय रद्द करून १००० हेक्टरवरील जलाशयावर दुसरी संस्था निर्माण करण्याचा शासन निर्णय करण्यात यावा, व्याघ्र प्रकल्पातील तलाव पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत केलेल्या तलावावर स्थानिक सहकारी संस्थांना मासेमारीकरिता देण्यात यावे, अनुसूचित जातीप्रमाणे जिल्हा व तालुका ठिकाणी भटक्या विमुक्त जाती जमातींना स्वतंत्र वसतिगृहे उघडण्यात यावे, भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, पेसा कायदा रद्द करून अनुसूचित जमाती क्षेत्रातील सर्व तलावाचे मासेमारीचे हक्क परंपरागत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाना देण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे.
या दे धक्का आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे यांनी केले. या आंदोलनात संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे, जनार्दन खेडकर, आनंदराव अंगतवार, राजेश येमहोदव वाघमारे, हर्षल वाघमारे, मिरा नागपुरे, देविदास नगरे, अजय मोहनकर, शेखर पचारे, चंद्रशेखर पचारे, विकास शिरकर, श्रावण कांबळी, दागो कुंभले, निलकंठ वाघमारे, संजय चोचेरे, सुनिल शिवरकर, शरद शिवरकर यांच्यासह मासेमार बांधव सहभागी होते.

रविवार, जून ०३, २०१८

चंद्रपुरात राकाँचा महागाई विरोधात मोर्चा

चंद्रपुरात राकाँचा महागाई विरोधात मोर्चा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Front against inflation, inflation | राकाँचा महागाई विरोधात मोर्चा शासनाच्या धोरणाविरोधात शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद समोरील जिल्हा मध्यवर्ती बँक पेट्रोल पंप पटांगणापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
देशात आणि राज्यात भाजपा सरकार येऊन चार वर्षे पूर्ण झालीत. या चार वर्षाच्या काळात जनसामान्याच्या समस्या सोडविण्यात शासन पूर्णपणे असफल ठरलेले आहे. चार वर्षांपासून पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव दिवसागनिक वाढतच आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या मानाने योग्य ती किंमत नसल्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. अजूनपर्यंत शेतकºयांची पुर्णपणे कर्जमाफी झालेली नाही. सामान्य जनता विविध समस्येला सामोरे जात आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात शुक्रवारी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाववाढ झालेल्या वस्तुची शवयात्रा काढण्यात आली. आज भाववाढी विरोधात सर्वांना जागे होण्याची वेळ आलेली आहे. आज आपण भाववाढीविरोधात आवाज उठविला नाही तर समोरही अशीच भाववाढ होत राहून सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागणार आहे. याचा निषेध व भाववाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जनसामान्यांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेभुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर, राष्ट्रवादी  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, गटनेते दीपक जैयस्वाल, हिराचंद बोरकुटे, राजीव कक्कड, संजय वैद्य आदी उपस्थित होते.

जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



मंगळवार, फेब्रुवारी २७, २०१८

सरकारविरोधात जिल्हाभरातील १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारविरोधात जिल्हाभरातील १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्यसरकारच्या कंत्राटी कामगारविरोधी धोरणाविरोधात राज्यभरातील कंत्राटी कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली असून आज दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले तसेच जिल्हाभरातील १४ संघटनांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
    सकाळी ११ वाजता जिल्हापरिषदेसमोर सर्व कर्मचारी एकवटले होते. त्यानंन्तर १२ वाजता जिल्हापरिषदेपासून मोर्चा काढत गांधी चौक, जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. या मोर्चात हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
राज्याच्या विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात राज्यात ३  लाख १६ हजार तर जिल्ह्यात २ हजारावर कर्मचारी आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रकल्पात सर्वाधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. गेल्या १५ वर्षांपासून हे कर्मचारी शासकीय सेवेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.मात्र अलीकडेच शासनाने कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीचा अटी व शर्ती बाबत तसेच या पदावर निरुक्त कर्मचाऱ्यांचा सेवा नियमित न करण्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक संपूर्ण कंत्राटी कामगारांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप करत विविध मागण्यांना घेऊन आज दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले तसेच जिल्हाभरातील १४ संघटनांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर मोर्चतील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले

शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

 आदिम समाजाचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

आदिम समाजाचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन शनिवारी आदिम समाजाचा मोर्चा चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़कला. राष्ट्रीय आदिम कृति समिति द्वारा मध्य नागपुरचे आमदार विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजताच्या सुमारास गिरनार चौकातुन निघालेला हा मोर्चा शासनाविरोधी नारेबाजी करत शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालवर जाऊन धड़कला.  

  शासन नियम व वेळोवेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र परिपत्रकानुसार कोष्टी हा व्यवसाय आहे. त्यामुळे कोष्टी या नावाखाली हलबा हलबीचे वैधता प्रमाणपत्र न नकारता ते देण्यात यावे,  गोवरी,हलबा,माना, व इतर अन्याग्रस्त जमतींना सुलभतेने प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे,  सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 च्या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहे. त्यामुळे या निर्णयाचा आधार घेऊन कोणत्याही कर्मच्याऱ्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये या मागण्यांसह ईतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.  या दरम्यान मोर्च्यात दाखल झालेल्या सहभाग्यानी  महानगर पालिका समोरिल महात्मा गांधी यांच्या पूतळयाला  पुष्पमार्लपन करून अभिवादन केले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचाच शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.या मोर्च्यात हजारो समाज बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या.