Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑक्टोबर ०१, २०१८

  शहीद भगतसिंग चौक लोकार्पण सोहळा संपन्न

शहीद भगतसिंग चौक लोकार्पण सोहळा संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिनांक २३/०८/२०१८ ला सुप्रसिद्ध ताडोबा रोड वरील शहीद भगतसिंग चौकाचे सौंदर्यीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याचे थाटात लोकार्पण मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रपूर तथा मा. आ. श्री नानाभाऊ शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. माणिकगड सिमेंट कंपनीचे श्री अशोकजी काबरा यांना महापौर सौ. अंजलीताई घोटेकर व आयुक्त श्री संजय काकडे यांनी कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून शाहिद भगतसिंग चौकाचे सौदर्यीकरण करण्याविषयी मागणी केली होती. त्या अनुषंगाने माणिकगड सिमेंट कंपनीने हि मागणी मान्य करून रु. १५ लाखाच्या सी.एस.आर. फंड मा नाम. श्री हंसराजभैय्या अहिर यांच्या माध्यमातून मनपाला देण्यात आला. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक चौकाचे सौदर्यीकरणाच्या संकल्प महापौर सौ. अंजलीताई घोटेकर यांनी केला आहे. चंद्रपूर शहर स्वच्छ, सुंदर व हिरवे दिसावे चौकाचे सौदर्यीकरण व्हावे या उद्देशाने पालकमंत्री मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा नाम. श्री हंसराजभैय्या अहिर, केंद्रीय गृहराज्य मंत्री भारत सरकार, मा. आ. श्री नानाभाऊ शामकुळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून शहर मनपाला भरघोस निधी प्राप्त करून दिला आहे. त्या अनुषंगाने माणिकगड सिमेंट कंपनी द्वारे शाहिद भगतसिंग चौकाचे सुंदर सौदर्यीकरण करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले कि, या चौकाच्या सौंदर्यात आणखी भर टाकण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता असेल तर मी सदैव तत्पर आहे. तसेच महापौर सौ अंजलीताई घोटेकर यांनी प्रास्ताविक करिताना सांगितले कि, या चौकाच्या भिंतीवर शहीद भगतसिंग चौक असे ठळक अक्षरे असलेले नाव लिहावे व शहीद भगतसिंगांचे म्युरल पण काढून द्यावे. जेणेकरून या चौकाचे सौंदर्यीकरणात भर पडेल. 
या प्रसंगी समितीचे श्री रमेश कसनगोट्टूवार व त्याचे सर्व सहकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी मा. आ. श्री नानाभाऊ शामकुळे, मा. महापौर सौ. अंजलीताई घोटेकर, उपमहापौर श्री अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती श्री राहुल पावडे, मनपा आयुक्त मा. श्री संजय काकडे, श्री अशोकजी काबरा अध्यक्ष माणिकगड सिमेंट, श्री देवेंद्रसिंग माणिकगड कंपनी ,मनपा झोन क्र १ चे सभापती सौ. मायाताई उईके, उपायुक्त श्री विजय देवळीकर, श्री मनोज गोस्वामी उपायुक्त, शहर अभियंता श्री बारई, शाखा अभियंता श्री घुमडे, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

शनिवार, सप्टेंबर २९, २०१८

चंद्रपूर मनपाच्या आमसभेत काँग्रेस-भाजपाचे गटनेते भिडले

चंद्रपूर मनपाच्या आमसभेत काँग्रेस-भाजपाचे गटनेते भिडले

पाणी व अनुसूचित जाती जमाती निधी वरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये झाला वाद
चंद्रपुर/विशेष प्रतिनिधी:

चंद्रपूर शहर महानगर पालिकेत आज आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेत पाण्याच्या विषयावरून विरोधी पक्षांनी चांगलाच गदारोळ केला.दरम्यान पाण्याच्या विषय सुरु असतानाच दलित नगरोत्थान अर्थात अनुसूचित जाती जमाती निधीवरून काँग्रेसचे नगरसेवक नन्दु नागरकर आणि नगरसेवक वसंता देशमुख यांच्यात चांगलीच जुंपली .हे दोन्ही नगरसेवक एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे.


सभागृहात कांग्रेसच्या नगरसेवकांनी मटके हातात घेत महापौरांना पाण्याची मागणी करीत मटके सभागृहात फोडण्यात आले.अचानक भाजपचे नगरसेवक वसंता देशमुख यांनी नंदू नागरकर यांना धक्कामुक्की करण्यास सुरुवात केली, दोघात जणू हाणामारी होणार हे लक्षात येताच बाकी नगरसेवकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.
श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठाना मार्फत पोलिस अधीक्षक व स्थायी समिती अध्यक्षांचा सत्कार

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठाना मार्फत पोलिस अधीक्षक व स्थायी समिती अध्यक्षांचा सत्कार

 प्रतिष्ठानने मानले प्रशासनाचे आभार 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नुकत्याच निर्विघ्न, सुरक्षीतेत व स्वच्छतेत पार पडलेल्या गणेश विसर्जनात सर्वात मोठा वाटा असणाऱ्या पोलिस प्रशासण व महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रशासनामुळे चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा उत्सव जिल्हातील  जनतेला उपभोगायला मिळाला,त्याच प्रमाणे सर्व सेवाभावी संस्थांना सर्वतोपरी मदत करून सेवेचा सुध्दा  लाभ घेतला. याच अनुशंगाने कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरच्या तर्फे जिल्हाचे पोलिस अधीक्षक मा.श्री. महेश्वर रेड्डी सर यांच्या जन्मदिनाच्या अनुशंघाने व उत्कृष्ठ शहर स्वच्छतेचे स्वप्न बाळगनारे चंद्रपूर महानगरपालीकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री. राहूल पावडे यांचे 28 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठानच्या वतिने शाल व वृक्ष तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना साई सेवासंकल्प प्रतिष्ठानाला शहरातील होणाऱ्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी करण्याकरीता निवेदन दिले.

या प्रसंगी प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ अध्यक्ष श्री सचिन गाटकिने, सचिव श्री नविन कपुर,सहसचिव श्री विनोद गोवारदिपे,कोशाध्यक्ष श्री प्रमोद वरभे, सदस्य श्री प्रदिप रणदिवे, श्री सचिन इमले,श्री दिघराज पें-सजयारकर,श्री तुशार राहुड,श्री गणेश साबळे, श्री प्रतिक लाड,श्री रवि त्रिनगरवार,श्री नितेश खामनकर,श्री कृणाल खनके उपस्थित होते.

बुधवार, सप्टेंबर २६, २०१८

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक


१०८० पीओपी मुर्त्यांचे विसर्जन
Image may contain: one or more people, people standing and outdoorचंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही रामाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने विविध भागातून विविध पर्यावरण, सामाजिक संघटनां निर्माल्य गोळा करण्यासाठी सरसावल्या होत्या. गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. या तलावांत ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़
गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते.. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ वाजता शिरविण्यात आली. मनपा स्वच्छता विभागाने रात्री १२ वाजता नंतर स्वच्छतेचे कार्य सुरु केले, अथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले. 
तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता ते कृत्रिम टँकमध्ये करावे, यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत १७ कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले . प्रत्येक तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले कलश निर्माल्याने भरले की लगेच महापालिकेतर्फे खाली केले जात होते.शहरातील मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी रामाळा तलाव येथे परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपुरात मागील वर्षीच्या तुलनेत प्रदूषणमुक्त विसर्जन पार पडल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 
Image may contain: night and outdoor
महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत ७७८५ मातीच्या मूर्ती व १०८० पीओपी अशा एकूण ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सगळ्या लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा कर्मचारी प्रयत्नशील होते, या कामात एस.पी. महाविद्यालय चंद्रपूरच्या ग्रीन थिंकर्स सोसायटी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावातच गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा तसेच निर्माल्य कलशातच टाकण्याचा आग्रह स्वयंसेवक करीत होते. नागरिकांनाही त्यास प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव विसर्जनास हातभार लावला. याद्वारे बहुतांश मूर्तींचे विसर्जन रामाळा तलाव , गांधी चौक , शिवाजी चौक , दाताळा रोड इरई नदी , पं. दीनदयाळ उपाध्याय तुकूम प्रा. शाळा, झोन क्र. ३ कार्यालय, नेताजी चौक बाबुपेठ, बंगाली कॅम्प झोन ऑफिस, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड , शिवाजी चौक, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड, नटराज टॉकीज ताडोबा रोड, इत्यादी ठिकाणच्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या भाविकांना व गणेश मंडळांना प्रमाणपत्रे देऊन महानगरपालिकेने त्यांचा गौरव केला
याप्रसंगी आयुक्त श्री. संजय काकडे तसेच पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराज राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नायक सीसीटीव्ही च्या माध्यमातून मोबाईलद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे. उपायुक्त श्री. गजानन बोकडे. श्री. गोस्वामी, सहायक आयुक्त श्री. विजय देवळीकर, धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता श्री. नितीन कापसे विसर्जन सुरळीतपणे पार पडण्यास प्रयत्नशील होते. 
Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor




शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८

जलजन्य आजारांबाबत तातडीने उपाययोजना करा

जलजन्य आजारांबाबत तातडीने उपाययोजना करा

नगर विकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश : मनपाला आकस्मिक भेट 
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. शिवाय परिसरात स्वच्छता कायम राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्यावे. संसर्गजन्य आजारांमुळे शहरवासीयांना त्रास होउ नये यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश राज्याचे नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. 
नागपूर परिसरात विविध संसर्गजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याबबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासंर्भात नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरूवारी (ता. २०) नागपूर महानगरपालिकेला आकस्मिक भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयोजित आढावा बैठकीत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपसत्तापक्ष नेत्या वर्षा ठाकरे, उपसत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेविका व प्रतोद दिव्या धुरडे, निगम आयुक्त रविंद्र ठाकरे, अप्पर आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक सेवा आरोग्य सेवा डॉ. मिलींद गणवीर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनचे झोनल आरोग्य अधिकारी व मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील म्हणाले, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया यासारख्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर आपण ज्याप्रमाणे उपययोजना करतो. तशाच उपाययोजना हे आजार होउ व वाढू नयेत यासाठीही करण्याची गरज आहे. परिसरातील स्वच्छता अत्यंत महत्वाची असून आजारांपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा उपयोग करून नागरिकांना आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता कशी महत्वाची आहे हे पटवून देणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व शहरातील विविध एनजीओंचा सहभाग घ्या. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जास्त भर देउन जनजागृतीच्या माध्यमातून योजना कार्यान्वित करा, असेही निर्देश नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. 
संजर्गजन्य आजारांबाबत महानगरपालिकेचे दवाखाने रूग्णालयांमध्ये सर्व सोयी, सुविधांवर विशेष भर देउन जनतेला या सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. मनपा दवाख्यांनाबाबतची नागरिकांची धारणा बदलण्यासाठी उत्कृष्ठ आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. विविध आजारांवर उपचार करताना इतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना मनपा रुग्णालयांमध्ये बोलावून त्यांचेही सहकार्य घ्यावे. ‘मॉडेल हॉस्पीटल’ तयार करून त्या माध्यमातून नागरिकांना अद्ययावत सुविधा मिळावे, यासाठी इतर खासगी डॉक्टरचे सहकार्य घ्या, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले. 
डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया, डेंगी यासारख्या आजारांचा प्रकोप त्यांच्या वाढत्या रुग्णांवरून लक्षात येतो. मनपा किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-यांची संख्याही अधिक असते. या सर्व रुग्णांची माहिती घेउन त्यांच्यावर होणा-या उपचाराचा आढावा घेण्याचीही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अशा रुग्णांची माहिती व त्यांच्या आजाराबाबतच अहवाल खासगी रुग्णालये व पॅथॉलॉजीकडून घेण्यात यावे, असेही निर्देश नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. शहरातील दहाही झोनचे आरोग्य अधिकारी, समन्वयक, निरीक्षक या सर्वांची प्रत्येक आठवड्याला बैठक घेउन झोननिहाय आजार, स्वच्छता याबाबतीत आढावा घेण्यात यावा, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले. 
शहरातील आरोग्यासंबंधी चर्चेतून नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडून मिळालेल्या निर्देशावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, असे यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी निर्देशित केले. यावेळी मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे यांनी नागपूर शहरात मनपा व शासकीय तसेच खासगी दवाखान्यांबाबतची सविस्तर माहिती विषद केली. संसर्गजन्य आजारांवर मनपातर्फे काय कार्यवाही करण्यात येत आहे, याबद्दलची माहिती त्यांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांना सादर केली. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

शनिवार, ऑगस्ट १८, २०१८

मनपा सभागृहात माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण

मनपा सभागृहात माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण

चंद्रपूर/प्रतिनिधी:
आज चंद्रपूर शहर महानगरपालिकातर्फे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न मा. अटल बिहारी वाजपेयी यांचा दुःखद निधनाबद्दल महानगरपालिका सभागृहात शनिवारी महापौर सौ. अंजली घोटेकर याचे हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मा. आयुक्त श्री. संजय काकडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते श्री दीपक जैस्वाल, प्रहार संघटनेचे नेते श्री पप्पूभाऊ देशमुख, झोन सभापती मायाताई उईके, शाम कनकंम तसेच सर्व नगरसेवक/नगरसेविका, मनपाचे उपायुक्त, सहाय्य्क आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, नोडल अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या प्रसंगी प्रहार संघटनेतर्फे गटनेते पप्पूजी देशमुख, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते श्री दीपक जैस्वाल व मंगला आखरे, कांग्रेस पक्षातर्फे देवेंद्र बेले यांनी अटलबिहारी वाजपेयी जीवनाबद्दल प्रकाश टाकला. यानंतर महापौर सौ. अंजलीताई घोटेकर यांनी मा. अटल बिहारी वाजपेयी यांचे कार्य हे देशासाठी प्रेरणादायी होते. त्यांचा कार्यप्रमाणेच आपण महानगरपालिकेची वाटचाल करूया अशी अपेक्षा व्यक्त केली. व श्रद्धांजली व्यक्त केली. 
सर्वांनी सभागृहात दोन मिनिटांचा मौन पडून श्रद्धांजली अर्पण केली. व सर्वश्री कार्यक्रम संपन्न झाला.

बुधवार, ऑगस्ट १५, २०१८

स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या:महापौर नंदा जिचकार

स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या:महापौर नंदा जिचकार

नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्मार्ट शहरातील प्रत्येक नागरी सुविधा स्मार्ट करण्यावर भर आहे. त्यादृष्टीने कार्य सुरू आहे. नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट होत आहे. मेट्रो येत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस, इलेक्ट्रीक टॅक्सी, ई-रिक्षा अशा अनेक पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोयी संपूर्ण देशात फक्त नागपुरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु जोपर्यंत नागरिक या सुविधांचा लाभ घेणार नाही, तोपर्यंत याचा काही उपयोग नाही. नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिका अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.  
भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड सिद्दिकी उपस्थित होते. 
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहर ‘विकासाचे मॉडेल’ म्हणून उदयास येत आहे. येथील प्रत्येक सोयी सुविधा स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकास,सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक उत्सव अशा विविध पैलूंअंतर्गत कार्य सुरू आहे. विविध योजनांचा लाभ येथील त्या-त्या घटकातील नागरिकांना मिळावा, यासाठी यंत्रणा दिवसरात्र कार्यरत आहे. या सर्व कार्यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी प्रत्येक योजनांत, उपक्रमांत सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अग्निशमन पथकाचे महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी निरीक्षण केले. त्यानंतर परेडची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाचे संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
प्रभाग १५ ला ५० लाखांचा पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डाची स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यात धरमपेठ झोनमधील प्रभाग क्र. १५ ला ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला. द्वितीय क्रमांक धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १७ ला जाहीर झाला असून तो ३५ लाख रुपयांचा आहे. १५ लाख रुपयांचा तृतीय क्रमांक धंतोली झोनमधीलच प्रभाग क्र. ३३ व प्रभाग क्र. ३५ ला विभागून जाहीर करण्यात आला. 
फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, निगम सचिव हरिश दुबे, आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

  सर्वांनी स्वातंत्र्य वीरांचा सन्मान करावा:महापौर अंजली घोटेकर

सर्वांनी स्वातंत्र्य वीरांचा सन्मान करावा:महापौर अंजली घोटेकर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्य १५ ऑगस्ट, २०१८ रोजी सकाळी ०७.४० वाजता मनपा महापौर सौ. अंजलीताई घोटेकर यांचे शुभहस्ते सर्वप्रथम गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून "ध्वजारोहण"उत्साहाने साजरा करण्यात आला,यावेळी उपमहापौर श्री अनिलभाऊ फुलझेले, आयुक्त श्री संजय काकडे, स्थायी समिती सभापती श्री राहुल पावडे, सभागृह नेता श्री वसंत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती होती, विशेष म्हणजे हा स्वतंत्र दिनाचा "ध्वजारोहण" कार्यक्रम शालेय बैंडच्या सुमधुर संगीतात उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना महापौर सौ. अंजली घोटेकर म्हणाल्या की आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा व अभिमानाचा आहे. या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. १५० वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याकरिता झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, नेताजी शुभाचंद्र बोस, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य वीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, लाला लाजपतराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अश्या अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. व आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य बघता आला. हे स्वातंत्र्य अबाधित राखणे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी स्वातंत्र्य उपभोगत असतांना शहिदांचा समरण केले पाहिजे. त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे. 
याप्रसंगी रफी अहमद किदवई शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय बँडद्वारे राष्ट्रगीत सादर केले. ध्वजारोहणास उपमहापौर श्री अनिल फुलझेले, सभापती श्री. राहुल पावडे, अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहरे, उपायुक्त श्री. मनोज गोस्वामी, गजानन बोकडे, विजय देवळीकर, वैद्यकीय अधिकारी सौ. अंजली आंबटकर, श्री. नितीन कापसे, शहर अभियंता श्री. महेश बारई, श्री. बोरीकर, श्री.घुमडे, श्री. हजारे, श्री. अनिल घुले, सर्व नगरसेवक - नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहरे, उपायुक्त श्री. मनोज गोस्वामी, गजानन बोकडे, विजय देवळीकर, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय सरनाईक, शीतल वाकडे. श्री. सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी सौ. अंजली आंबटकर, श्री. नितीन कापसे, शहर अभियंता श्री. महेश बारई, श्री. बोरीकर, श्री.घुमडे, श्री. हजारे, श्री. अनिल घुले, सर्व नगरसेवक - नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार, जुलै ३१, २०१८

विविध मुद्यांवरून गाजली चंद्रपूर मनपाची आमसभा

विविध मुद्यांवरून गाजली चंद्रपूर मनपाची आमसभा

 ललित लांजेवार:
मंगळवारी चंद्रपूर मनपाच्या सभागृहात आयोजित आमसभेत  विविध मुद्यांवरून चांगलीच गाजली.आरोग्य,औषध,दुषित पाणी,शहरातील LED दिवे,गुंठेवारी प्रकरण,शहरातील मुख्य रस्त्यांचे सौदर्यीकरण व रुंदीकरण,अतिक्रमण,बाबूपेठ उड्डाण पुलाचे धीम्या गतीने होत असेलेले बांधकाम,अश्या विविध मुद्द्यांवरून आज पालिकेच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकात हल्ला ऐकायला मिळाला.
सभा सुरु होताच सभागृहात झारखंड आणि जम्मूमध्ये शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शहिदांना श्रद्धांजली देत असतांना मात्र चंद्रपूर शहरात खड्ड्यांमुळे विनाकारण बळी गेलेल्या नंदा प्रमोद बेहरम (५८) रा. वडगाव व काजल पाल (१८) रा.बंगाली कॅम्प या दोघांचाही सभागृहाला विसर पडला.या आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.
 सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र मनपाच्या आरोग्य केंद्रावर औषधच उपलब्ध नसल्याने रूग्णांलयांमध्ये रुग्णाची गैरसोय होत आहे,सध्या सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने नागरिकात रोष आहे.मंगळवारी मनपाच्या सभागृहात नगरसेवक सचिन भोयर यांनी अजेंट्यावरील विषय बाजूला ठेऊन पहिले,नगरसेवक व नागरिकांना हुज्जतबाजी करणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱयांना सस्पेंड करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व नगरसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे लावून धरली. शहरातील आरोग्यकेंद्रावर डॉक्टर वेळेवर हजर होत नाही,औषधांचा तुटवडा आहे,रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असल्याच्या वारंवार तक्रारी जनतेकडून नगरसेवकांना प्राप्त होत होत्या ,त्यावर उत्तर देत महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या ब्योम्याट्रिक थम मशीन तात्काळ प्रत्येक आरोग्य केंद्रावर बसवून उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. व वागणूक व्यवस्थित नसेल त्याविरुद्ध नौकरीवरून निलंबीत करण्याचे आदेशही देण्यात येतील अश्या सूचना यावेळी आरोग्य अधिकारी अंजली आंबटकर यांना करण्यात आल्या.
नगरसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांना विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी देखील नगरसेवकांशी हुज्जत बाजीने बोलतात  यावर उत्तर देत महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या यानंतर सन्मापूर्ण वागणूक न देणाऱ्यांवर नौकरीवरून पायउतार करू त्यामुळे आता अधिकाऱ्यांवर चुकीला माफी नसल्याची वेळ आली आहे .
आवश्यकतेनुसार रस्त्यावरील झाडे येणार काढण्यात 
शहरातील अनेक प्रभागात दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे
हि बाब सभागृहाच्या लक्षात आणून देतांना दीपक जयस्वाल 
व्यापाऱ्यांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण वाहनांची कोंडी व अरुंद रस्ते शहरातील मुख्य समस्या असतांना त्यामुळे मनपा अंतर्गत विकास कामात शहरातील मुख्य रस्ता असलेले गांधी चौक ते जटपुरागेट व कस्तुरबा मार्गाचे २ कोटी ५६ लाखाचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरु होणार आहे,त्या मार्गावर अनेक झाडेआधी पासून लावण्यात आले आहे अश्या झाडांना आवश्यकते नुसार काढण्यात येणार असल्याचे आयुक्त संजय काकडे यांनी सभागृहाला सांगितले हा रुंदीकरणाचा स्पेस वाढवून येथे पार्किंगची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले ,रस्ते बांधकामाचा टेंडर वारंवार एकाच व्यक्तीला का? व या मार्गावर येणाऱ्या झाडांचे काय? असा सवाल नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देतांना आयुक्त संजय काकडे यांनी सभागृहाला हि महिती दिली.
      ट्रायस्टार ते एमईएलपर्यंतचा रस्ता वगळण्याचा ठराव मंजूर 
नगरपालिका अस्तित्वात असताना १९९७ मध्ये शहराच्या आराखड्या नुसार ६० मीटर रुंद विकास योजना रस्ता हा वळण रस्ता म्हणून मंजूर करण्यात आला होता. सदर रस्ता होटल कुंदन प्लाझा( ट्रायस्टार) ते तुकूम परिसरातील लॉ कॉलेजपर्यंतचा हा रस्ता होता. या रस्त्यामुळे ७०० हून अधिक घरे बाधित होणार होती,त्यामुळे नगरसेवक अशोक नागापुरे यांनी या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यांनी नगरपालिकेने दिलेल्या नोटीसांवर स्टे दिला.त्यानंतर ह्या विषय थंड बस्त्यात पडला. आजच्या आमसभेत नगरसेवक संदीप आवारी यांनी रिंगरोडमधून नेहरूनगर परिसर वगळण्यात यावा हा विषय सभागृहात उपस्थित केला होता,या संधर्भात नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या परिसरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० जात  असल्याने सध्या या रस्त्यावर ५६० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा विषय प्रस्तावित आहे. त्यामुळे या मार्गावरील ७०० घरे बाधित होण्यापासून वाचली आहेत. 
बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम संथ गतीने 
गेल्या कित्तेक दिवसांपासून बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. या प्रभागात लालपेठ,जुनोना,बाबूपेठ या परिसरातील व शहरातील अर्ध्या अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे.
 रेल्वे वाहतुकीने आधीच समस्या झेलत असलेल्या बाबूपेठ वासियांना आणखी किती दिवस उड्डाण पुलाच्या संथगतीने सुरु असलेल्या समस्सेला झेलावे लागेल असा प्रश्न बसप गटनेता अनिल रामटेके, स्नेहल रामटेके यांनी उपस्थित केला.



हा तर वडगाव प्रभागावर अन्याय 
पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप
शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना मालमत्ता कराची माफी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
 मौजा दे.गो. तुकूम मधील 8 जागेवरील आरक्षण काढण्याचा विषय आज आमसभेमध्ये आला होता. यावर वडगाव प्रभागाचे  नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मुद्द्याला धरून आमसभेत प्रश्नांची सरबत्ती केली.वडगाव प्रभागामध्ये सुद्धा अनेक जमिनीवर आरक्षण आहेत. आरक्षण असलेल्या जमिनीवर रहिवाशी घरे झालेली आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 टक्केपेक्षा जास्त घरे झालेली असताना व आरक्षणाची गरज नसल्यास अशा प्रकारचे आरक्षण काढण्याची तरतूद आहे.असे पप्पू देशमुख यांचा आमसभेत सांगितले.
या तरतुदीचा वापर करीत मौजा दे गो. तुकुम मधील आरक्षण काढण्याचा विषय महासभेमध्ये घेण्यात आला.मग वडगाव प्रभागात सोबत दुजाभाव का करण्यात येत आहे,वडगाव प्रभागातील नागरिक गुंठेवारीसाठी चकरा मारत आहेत. अशा वेळी वडगाव प्रभागांमधील ट्रक टर्मिनल व इतर आरक्षण जिथे 50 टक्केपेक्षा जास्त निवासी घरे झाली,ही आरक्षणे काढण्याचा विषय का घेण्यात आला नाही.हा वडगाव प्रभागावर अन्याय असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी आमसभेत केला.तसेच वडगाव प्रभागातील गुंठेवारीची आरक्षणे काढण्याचा विषय घेतल्याशिवाय इतर विषयांना स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर बराच वेळ गदारोळ झाला  यानंतर वडगाव प्रभागातील पात्र प्रकरणे आरक्षण काढण्यासाठी घेण्यात येतील असे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
 आमसभेमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आली.मागील आमसभेमध्ये प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हा विषय लावून धरला होता. त्यामुळे या आमसभेत अजेंड्यावर चर्चेमध्ये हा विषय घेण्यात आला होता.आमसभेत  सर्वानुमते माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र त्याच वेळी गोवा स्वातंत्र्य लढ्यातले शहीद बाबूराव थोरात यांच्या वारसदाराला टॅक्स माफी देण्याच्या मुद्द्यावरून पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना टॅक्स माफी देण्याचा ठराव चंद्रपूर नगरपालिकेमध्ये घेण्यात आला होता.या ठरावानुसार मागील अनेक वर्षांपासून बाबूराव थोरात यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत होती.२०१८ मध्ये महानगरपालिकेने शहीद थोरात यांच्या मुलाला ४०००० मालमत्ता कर पाठविला .याबाबत  सभेमध्ये मुद्दा उपस्थित करून शहीद थोरात यांच्या कुटुंबियांना पूर्ववत मालमत्ता करमाफी सुरू ठेवण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.
मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे 
"शिवाजी महाराज कि जय" म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी
 सभागृहात काही नगरसेवकांनी घोषणाबाजी केली त्यावेळचे हे छायाचित्र





मनपा शाळांमध्ये मिळणार ॲथलेटिक्स व बुद्धीबळाचे धडे

मनपा शाळांमध्ये मिळणार ॲथलेटिक्स व बुद्धीबळाचे धडे

प्रतिभावंत खेळाडूंना खेळाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील प्रतिभावंत खेळाडू पुढे येऊन शहाराचा नावलौकिक करावा, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मनपाच्या प्रत्येक शाळांमध्ये लवकरच ॲथलेटिक्स व बुद्धीबळ खेळाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक शाळेत मानधन तत्त्वावर प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी सांगितले. 
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा विषयक वातावरण तयार करून प्रतिभावंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा शाळांमधील सर्व क्रीडा शिक्षकांची बैठक घेण्यात आली. यावेळी क्रीडा उपसभापती प्रमोद तभाने, सदस्य दर्शनी धवड, विरंका भिवगडे, संजय चावरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना श्री. सहारे म्हणाले, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने ते पुढे येऊ शकत नाही. शिवाय काही मनपा शाळांमध्ये मैदानही उपलब्ध आहेत. मात्र देखरेखीअभावी त्यांचीही अवस्था वाईट आहे. या मैदानांना दुरूस्त करून येथे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा मिळवून देता येईल. महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा विषयक रूची निर्माण करून विद्यार्थ्यांना खेळाच्या जवळ आणण्याचा मनपाचा मानस आहे. यासाठी इयत्ता चौथी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल. यामध्ये सुरूवातीला ॲथलेटिक्सला प्राधान्य देण्यात येणार असून, ॲथलेटिक्समधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात वर्गनिहाय विद्यार्थ्यांची तीन दिवस चाचणी घेण्यात येईल. यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिर घेण्यात येईल. प्रतिभावंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातून पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे या मागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. 
याशिवाय बुद्धीबळामध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी नावलौकिक करावा, यासाठी प्रत्येक शाळेमध्ये बुद्धीबळातील तज्ज्ञांकडून धडे देण्यात येतील. यासाठी मनपाकडून मानधन तत्त्वावर बुद्धीबळ तज्ज्ञांची नेमणूक करण्याचेही त्यांनी सुचविले. याशिवाय प्रत्येक मनपा शाळेत कार्यरत शारीरिक शिक्षकही प्रावीण्य असलेल्या खेळात विशेष मेहनत घेऊन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले. मनपा शाळेतील प्रतिभावंत खेळाडूंच्या विकासासाठी सर्व बाबींमध्ये शारीरिक शिक्षकांना मदत करणार असल्याचे शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी सांगितले.

गुरुवार, जुलै २६, २०१८

चंद्रपुरात अतिक्रमणाचा वाद चिघळला

चंद्रपुरात अतिक्रमणाचा वाद चिघळला

सहा.आयुक्तांच्या गाडीसमोर ठेलेवाल्यांचा १ तास ठिय्या
ललित लांजेवार:
चंद्रपुरात प्लास्टिक बंदीच्या  कारवाई वरून सुरु झालेल्या  मनपाच्या कारवाईला गुरुवारी वेगळेच वळण मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार प्लास्टिक बंदी झाल्यानंतर शहरात मनपा प्लास्टिक बंदी मोहिमेसाठी धडक मोहीम राबवीत आहे,अश्यातच गुरुवारी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक परिसरात मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एका पानठेल्यातून प्लास्टिक जप्त केला व त्यावर कायदेशीर कारवाई केली असे मनपाचे कर्मचारी यांचे म्हणणे आहे,दोषी पानठेला मालकावर दंड आकारण्यात आला होता.मात्र पानठेला चालकाला हे मंजूर नव्हते. हि कारवाई सुरु असतांनाच हॉकर्स असोसिएशनच्या काही लोकांनी ठेलेवाल्यांच्या बाजूने बचावात या कारवाईत उडी घेतली,येथे एका नवीनच वादाला तोंड फुटले. ह्या कारवाईला पुढे नेत मनपा अधिकारयांचा मोर्चा हा शहरातील वरोरा नाका परिसरातील पत्रकार भवन येथे वळला. या ठिकाणी मनपाची अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु असतांना एका व्हाईट कॉलर नेत्याने ठेलेवाल्यांना एकत्र करत या कारवाईला विरोध केला,मात्र हा अतिक्रमनाचा वाद अधिकच चिघळला,
अतिक्रमण विभागाची कारवाई सुरु असतांना कारवाई दरम्यान कारवाई स्थळावर शासकीय वाहनाने आलेल्या सहा.आयुक्त शितल वाकडे यांची गाडी परिसरातील संपूर्ण हात ठेलेवाल्यांनी रस्त्यावर अडवत सहा.आयुक्त शितल वाकडे यांना तब्बल एका तास घेराव घातला. या ठेलेवाल्यांनी सहा.आयुक्त वाकडे यांच्या गाडी समोर मागे-पुढे ठिय्याच मांडला. शेवटी गाडीत बसलेल्या शीतल वाकडे ह्या गाडीतून बाहेर येत काही अंतरावर उभ्या राहिल्या. स्थिती आणखीनच चिघळत दिसल्याचे समजताच आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे यांना संपर्क करत अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे व उपायुक्त विजय देवलीकर यांनी पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळावर मदत म्हणून मागविला .वरोरा नाका परिसरात दिवसेंदिवस चायनीज आणि पानठेल्यांची संख्येत वाढ होत आहे. 
अश्या आशयाची तक्रार मनपा अतिक्रमण विभागाला मिळाली होती.याच तक्रारीच्या आधारे मनपाच्या अतिक्रमण विभागाने हि कारवाई केली. दरम्यान या कारवाईत अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे, उपायुक्त विजय देवलीकर, अतिक्रमण व जब्ती विभागाचे भाऊराव सोनटक्के, नामदेव राऊत व रामनगर पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. हा वाद इथेच थांबला नसून रामनगर पोलिसात गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाला  आता काय वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.

बुधवार, जुलै ११, २०१८

मनपाच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलेही खोदकाम नाही!

मनपाच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलेही खोदकाम नाही!

आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले:विविध विभागांसोबत समन्वय बैठक

नागपूर / प्रतिनिधी:
 नागपूर शहरात ज्या विविध एजंसी किंवा सरकारी विभाग काम करतात, ते शहरात खोदकाम करताना कुठलीही परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे असे चालणार नाही. कुठल्याही खोदकामासाठी नागपूर महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. परवानगी घेताना अनामत रक्कम जमा करावी. ही प्रक्रिया न करता खोदकाम केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, या शब्दात मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले. 
नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १०) विविध शासकीय/निमशासकीय विभागांच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह मनपाच्या वतीने प्रभारी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके तसेच नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन लि., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर पोलिस, नगर भूमापन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., रेल्वे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह पुढे म्हणाले, रस्ता खोदकाम करण्यापूर्वी अनामत रक्कम आवश्यक राहील. कार्य पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी पुनर्भरणास नाहरकत दिल्यानंतर अनामत रक्कम परत दिल्या जाईल. बऱ्याचदा खोदकाम करताना पूर्वीच असलेल्या केबल, जलवाहिनी आदींचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक विभाग, एजंसीला यापुढे खोदकाम करण्यापूर्वी जीपीआर सर्वेक्षण करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले. 
यापुढे कुठल्याही प्रकारचे शहराचे विद्रुपीकरण खपवून घेणार नसल्याचेही आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, शहरातील कुठल्याही शासकीय इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर, कार्यालयाच्या भिंतीवर कुठल्याही प्रकारच्या जाहिराती रंगविल्या असेल, स्टीकर लावले असेल तर संबंधित कार्यालयाने संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई करावी. पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. कार्यालयासमोरील फुटपाथ मोकळे राहील, याची काळजी घ्यावी. अतिक्रमण होणार नाही, ही त्या-त्या कार्यालयाची जबाबदारी आहे. अतिक्रमण आढळल्यास मनपा कायदेशीर कारवाई करेल आणि त्याचा भुर्दंड शासकीय कार्यालयांना भरावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 
यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेत ज्या प्रकल्पांना ज्या विभागाकडून अडचण आहे, त्या विभागांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. यासाठी कालमर्यादाही ठरवून दिली. यामध्ये मेट्रोतर्फे बांधण्यात येणारे तीन मीटर रुंदीचे फुटपाथ, ऑरेंज सिटी स्ट्रीटच्या जमीन डिमार्केशनबाबतचा नगर भूमापन कार्यालयाला पाठविलेला प्रस्ताव, जरिपटका मार्केटच्या जागेची मोजणी, लकडगंज फायर स्टेशन, पाचपावली फायर स्टेशन, गंजीपेठ फायर स्टेशन जागा मोजणी, सीमेंट रस्त्यावरील विद्युत पोल हटविणे आदींचा आढावा घेत जेथे अडचण आहे ती पुढील सात दिवसांत दूर करण्याचे निर्देश दिले. 

प्रलंबित कर भरा!
विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे ३३ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे तर १० कोटींचा पाणी कर थकीत आहे. हा कर तातडीने भरावा, असे निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मागील करामध्ये काही अडचण असेल तर त्या तातडीने सोडवाव्या. किमान नवीन कर भरण्यासंदर्भात यंदाच्या आर्थिक वर्षात त्याबाबतचे नियोजन करावे, असेही ते म्हणाले. 
समन्वय बैठकीला उपस्थिती आवश्यक
मंगळवारी झालेल्या समन्वय बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व अन्य काही विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. या सर्व विभागांना तातडीने पत्र देऊन समन्वय बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्र पाठवावे, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

बुधवार, जून २७, २०१८

चंद्रपुरात सुरु होणार प्लास्टिक संकलन केंद्र

चंद्रपुरात सुरु होणार प्लास्टिक संकलन केंद्र

प्लास्टिक साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विविधस्तरावर अभ्यास सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यातील बाबींची अंमलबजावणी करण्याबरोबरच घरी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची कशा प्रकारे विल्हेवाट लावता येईल, यासाठी योजना आखण्याचे काम सध्या पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच मनपातर्फे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू होणार आहे.
व्यापारी संघांची बैठक सोमवारी मनपा सभागृहात आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शंभर टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची तयारी महानगरपालिकेने सुरू केली असून चंद्रपूरकरांना आपल्या घरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावता यावी, यासाठी पालिकेच्या तिनही झोन कार्यालयांमधे प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
बहुतेक घरी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, अन्य वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. नागरिक घरातील प्लास्टिक वस्तू या केंद्रावर जमा करू शकतात. तसेच शहरात प्लास्टिक वस्तू जमा करण्यास फिरते ‘कचरा संकलन वाहन’ सुरु करण्यात येणार आहे. जमा झालेल्या प्लास्टिक वस्तूंची मनपातर्फे शासन निर्देशाप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. व्यापारी, नागरिकांनी संकलन केंद्र किंवा फिरते वाहन यात प्लास्टिक जमा करावे. तसे न केल्यास व साठा किंवा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. प्लास्टिकमुक्त मोहिमेस व्यापारी मंडळे व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शितल वाकडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन कापसे व सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्वछता अधिकारी उपस्थित होते.

सोमवार, जून २५, २०१८

५३८ किलो प्लास्टिक जप्त

५३८ किलो प्लास्टिक जप्त

प्लास्टिक विरोधात मनपाची मोहीम :प्रत्येक झोन मध्ये दहा सदस्यीय पथक
नागपूर/प्रातिनिधी:
नागपूर महानगरपालिकेने प्लास्टिकविरोधात शनिवारपासून (ता. २३) धडक मोहीम उघडली असून पहिल्याच दिवशी दहाही झोनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण दीड लाख रुपयांच्या वर दंड वसूल करण्यात आला.या मोहिमेमुळे आता प्लास्टिक विक्रेत्यांचे आणि वापरणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याकरिता मुदत शुक्रवारी (ता. २२) संपली.त्यामुळे शनिवार पासून कारवाईची धडक मोहीम सुरु करण्यात आली. त्याच्या नियोजनासाठी शुक्रवारीच अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी आढावा बैठक घेतली होती. सदर बैठकीत कारवाई संदर्भात निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी दहा सदस्यीय चमूने कारवाईला सुरुवात केली. 
आजपासून कारवाई सुरू होणार म्हणून बहुतांश प्लास्टिक विक्रेत्यांनी दुकाने उघडली नाहीत, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. प्रत्येक झोनमधील पथकाने शासन आणि प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे अशा प्लास्टिक विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली. 

३४ जणांना नोटीस, एक एफआयआर

या कारवाईअंतर्गत आज पहिल्या दिवशी दहाही झोन मिळून एकूण ३४ जणांना नोटीस देण्यात आली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत एका कारवाईदरम्यान दुकानदाराने पथकाशी हुज्जत घातली. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला. सर्वाधिक १५० किलो प्लास्टिकची जप्ती धरमपेठ झोन क्र. २ मध्ये करण्यात आली तर सर्वाधिक ३२ हजारांचा दंड मंगळवारी झोन क्र. १० मधून वसूल करण्यात आला.लक्ष्मीनगर झोन क्र. एक मध्ये एक नोटीस देण्यात आला नाही किंवा दंड वसुली झाली नाही. धरमपेठ झोन क्र. २ मध्ये १५० किलो प्लास्टिक जप्ती, सहा नोटीस आणि १० हजार दंड वसुली, हनुमाननगर झोन क्र. ३ मध्ये ३२ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २३ हजार ५०० रुपयांची दंड वसुली, धंतोली झोन क्र. ४ मध्ये ५० किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २५ हजारांची दंडवसुली, नेहरूनगर झोन क्र. ५ मध्ये ४३ किलो प्लास्टिक जप्ती आणि २५ हजारांची दंड वसुली करण्यात आली. या झोन मध्ये एकही नोटीस देण्यातआली नाही.गांधीबाग झोन क्र. ६ मध्ये १३६ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि दहा हजारांची दंड वसुली, सतरंजीपुरा झोन क्र. ७ मध्ये ६.२०० किलो प्लास्टिक जप्ती, एक नोटीस आणि पाच हजार रुपयांची दंड वसुली, लकडगंज झोन क्र. ८ मध्ये २१.७०० किलो प्लास्टिक जप्ती, दोन नोटीस आणि १० हजार रुपयांचा दंड, आसीनगर झोन क्र. ९ मध्ये १८ किलो प्लास्टिक जप्ती, तीन नोटीस आणि १५ हजारांचा दंड तर मंगळवारी झोन क्र. १० मध्ये ८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. सात नोटीस बजावण्यात आल्या आणि ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दहाही झोन मिळून एकूण ५३८.९०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ३४ नोटीस बजावण्यात आल्या आणि एकूण एक लाख ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

कारवाई कुठे आणि कुणावर होणार?

प्लास्टिकबंदी अंतर्गत सर्व दुकाने व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, वने व संरक्षितवने, इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र आदी ठिकाणी कारवाई होईल. दुकानदार, मॉल्स, कॅटरर्स, घाऊक व किरकोळ विक्रेता, वितरक, वाहतूकदार, मंडई, स्टॉल्स आदी ठिकाणीही कारवाई होईल.

प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घ्या :आयुक्तांचे आवाहन

नागपूर शहरात आज, शनिवारपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.प्लास्टिक बाळगल्यास पाच पासून २५ हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करा.याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले आहे. 

बंदी असलेल्या वस्तू

प्लास्टिक पासून बनविलेल्या पिशव्या, प्लास्टिक व थर्माकोलपासून बनविण्यात आलेले व एकदाच वापरल्या जाणारे ताट, ग्लास, वाट्या, चमचे, कप, स्ट्रॉ, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी प्लास्टिकची भांडी, वाट्या, पॉलिप्रॉपीलेन बॅग, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पाऊच, कप आदीवर बंदी आहे. प्लास्टिक व थर्माकोलचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे.

यावर बंदी नाही

अर्धा लिटरच्या पाण्याच्या बाटल्स, औषधांचे वेष्टण, कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक, नर्सरीमध्ये वापरात असलेले प्लास्टिक, अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या, ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या, रेनकोट, कच्चा माल साठविण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक, टीव्ही, फ्रीजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल, बिस्कीट, चिप्स, वेफर, पुड्यांची वेष्टणे आदींवर बंदी नाही. 
काय करावे?
कापडी, ज्यूट पिशव्यांचा वापर करावा.घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन निघावे.पाण्याची स्टील किंवा काचेची बाटली सोबत ठेवावी.दूध, दही, मासे, मटण आणण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करावा.


बुधवार, जून २०, २०१८

 फुटपाथ पादचाऱ्यांसाठीच,अतिक्रमण तातडीने काढा:आयुक्त वीरेंद्र सिंह

फुटपाथ पादचाऱ्यांसाठीच,अतिक्रमण तातडीने काढा:आयुक्त वीरेंद्र सिंह

आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक मार्गाचा केला दौरा 
नागपूर/प्रतिनिधी:
  शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठीच आहे. त्यावर एकही अतिक्रमण नको. फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मंगळवारी (ता.१९) आयुक्तांनी लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, श्री. कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते. लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गावरील फुटपाथवर इमारतीच्या पायऱ्या आहेत किंवा अन्य बांधकाम केलेले आहे. ते बांधकाम तातडीने काढून टाकण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. फुटपाथवर खाद्यपदार्थांचे ठेले, फळविक्रेते, भाजीविक्रेते बसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना त्रास होतो. हे सर्व ठेले तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. आरपीटीएस रोड वर असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रालगत अनेक दुकानांचे अतिक्रमण आहे. त्यांना तातडीने अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जेरील लॉन चौकातील कचरा कुंड भरलेले आहे. त्यातून कचरा बाहेर पडत असल्याचे दृश्य आयुक्तांनी बघितले. यानंतर अशी परिस्थिती दिसता कामा नये. झोनच्या सहायक आयुक्तांनी दररोज पाहणी दौरा करावा, अशी सूचनाही त्यांना केली. यानंतर आपण शहरातील सर्व फुटपाथचे निरिक्षण करणार आहोत. यानंतर फुटपाथवर अतिक्रमण आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला. वर्धा रोडवरील उरुवेला कॉलनी येथे नाल्याच्या काठावर अतिक्रमण आहे. ते अतिक्रमणही तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.


शनिवार, जून १६, २०१८

उपमहापौरांनी घेतला योग दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

उपमहापौरांनी घेतला योग दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

विविध योग संस्थेचा सहभाग 
नागपूर/प्रातिनिधी:
दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ जुन रोजी जागतिक योग दिन नागपूर महानगरपालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेतला. 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका रूपा राय, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हूमने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. 
जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी होणा-या संस्थेची काय तयारी आहे, याचा आढावा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी घेतला. कार्यक्रमात किती साधक उपस्थित राहील त्यांची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचाही आढावा उपमहापौरांनी यावेळी घेतला. साधकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी व नेण्यासाठी मनपाच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. कोणत्याही संस्थेचे किती साधक येणार आहे, त्यांना बसेस लागतील की नाही, यासंबंधीचा आढावा ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी घेतला. ज्यांना बेसेसची गरज आहे त्यांनी मनपाच्या परिवहन विभागाशी संपर्क साधावा. किंवा धरमपेठ झोन सहायक आयुक्तांना याबाबत पत्रद्वारे कळविण्यात यावे, असेही दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. 
दरवर्षी नागपूर महानगरपालिका जागतिक योग दिवसाचा कार्यक्रम हा जनार्दन योगाभ्यासी मंडळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यासह इतर योग संस्थेच्या सहकार्याने होत असतो. यावर्षीही सर्व योग संस्थेच्या सहकार्याने जागतिक योग दिनाचा कार्यक्रम घेण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. 
बैठकीला यावेळी जनार्दन योगाभ्यासी मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ओशोधारा संघ नागपूर, आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूर, नागपूर जिल्हा हौशी योग संघटना असोसिएशन नागपूर यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सोमवार, जून ११, २०१८

चंद्रपूर मनपा करणार ९७ हजार वृक्षांची लागवड

चंद्रपूर मनपा करणार ९७ हजार वृक्षांची लागवड

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.
याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाल्या पर्यावरण संरक्षणासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील वर्षी आपण सर्वांच्या सहकार्याने अपेक्षित उद्दिष्टाच्या दुप्पट झाडे लावली. मात्र आपले शहर हे जगातील सर्वात उष्ण हवामानाचे शहर असल्याने पर्यावरणाप्रती आपली जवाबदारीही दुप्पट आहे. चंद्रपूरची जनता आम्हाला साथ देईल, शासनाच्या वृक्षलागवडीत पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करीत प्रत्येकाने किमान एका तरी झाडाचे पालकत्व घेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.तर वृक्षलागवड संदर्भात माहिती देताना आयुक्त संजय काकडे म्हणाले, मनपातर्फे शासनाने ६० हजार झाडे लावावे, असे आवाहन दिले आहे. मात्र मनपाने ९७ हजार झाडांचे नियोजन केले आहे. शहरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून कुंपणावर विशेष लक्ष देण्यात ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना विवाह, जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र देताना रोपटे देण्यात येणार आहेत. तसेच यावर्षी १०० टक्के झाडे जगविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त सचिन पाटील, शीतल वाकडे, बारई, हजारे, इको प्रो संस्था, रेडक्रॉस सोसायटी, रोटरी क्लब, विश्व मानव केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गुरुवार, जून ०७, २०१८

 झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्याचे नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्याचे नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

पावसाळापूर्व तयारीचा आढावा : झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्याचे निर्देश
नागपूर/प्रतिनिधी:
 शहरातील नदी स्वच्छतेचे शिल्लक काम पुढील सात दिवसांत तर नाले सफाईचे कार्य तीन दिवसांत पूर्ण करा. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत हे कार्य असल्यामुळे कुठलीही प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जिथे अडचण येईल तिथे सरळ माझ्याशी संपर्क साधा, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. 
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते. 
सर्वप्रथम आयुक्तांनी स्ट्रेचनिहाय नदी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. नदी स्वच्छता अभियानाअंतर्गत काही स्ट्रेचचे काम तांत्रिक अडचणीमुळे लांबले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. नदी स्वच्छता अभियान लोकसहभागातून असले तरी जेथे लोकसहभागातून आवश्यक मशिनरी मिळत नसेल तेथे मशिनरी किरायाने उपलब्ध करून घ्या. पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वच कामे बाधीत होतील. त्यामुळे या कामात मुळीच दिरंगाई नको. नदी स्वच्छतेचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. 
यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी नाले आणि पावसाळी नाल्यासफाईंचा झोननिहाय आढावा घेतला. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२ नाले असून त्यापैकी २१ स्वच्छ करण्यात आले आहेत. धरमपेठ झोनमध्ये ३५ पैकी ३१, हनुमाननगर झोनमध्ये १४ पैकी १२, धंतोली झोनमध्ये १८ पैकी १७, नेहरूनगर झोनमध्ळे १५ पैकी १३, गांधीबाग झोनमध्ये ५१ पैकी ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२ पैकी २१, लकडगंज झोनमधील १२ पैकी ८, आसीनगर झोनमधील १८ पैकी १८ तर मंगळवारी झोनमधील २९ पैकी २७ नाले आतापर्यंत पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असल्याची माहिती झोन सहायक आयुक्तांनी दिली. बैठकीला सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, डी.डी. जांभुळकर, सतीश नेरळ, अनिरुद्ध चौगंजकर, गिरीश वासनिक, राजेश भूतकर, नगर रचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमणे, राजू भिवगडे, प्रकाश वऱ्हाडे, हरिश राऊत, गणेश राठोड, राजेश कराडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. 
झाडांच्या धोकादायक फांद्या त्वरित कापा!
नागपूर शहरात वादळी पाऊस आल्याने अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्या तुटून खाली पडतात. यामुळे वाहनांचे नुकसान होते. मनुष्याच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अशा धोकादायक फांद्या तातडीने कापा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. उद्यान विभागाने अशा धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले असून सुमारे ७० धोकादायक झाडे आढळली. फांद्या कापण्याआधी आणि फांद्या कापल्यानंतरचे छायाचित्र घ्या आणि त्याचा ठिकाणांसह संपूर्ण रेकॉर्ड ठेवा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. 
२४ तास ३६५ दिवस सज्ज राहा!
आपत्ती व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला आपली जबाबदारी निभावण्याचे अगदी मनापासून वाटले पाहिजे. अधिकाऱ्यांना ‘रिॲक्टिव्ह’ न होता ‘प्रो-ॲक्टिव्ह’ व्हावे, असा सल्ला आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिला. आपण अधिकारी आहोत. या शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी आहोत. त्यामुळे आपण २४ तास आणि ३६५ दिवस आपले कर्तव्य निभावले पाहिजे, असेही ते म्हणाले. 
नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन
आपत्ती व्यवस्थापनात नागपूर महानगरपालिकेसोबतच नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची असते. कुण्या व्यक्तीला कुठेही धोकादायक झाडे आढळून आल्यास त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला याबाबत तातडीने माहिती देण्याचे आवाहन आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले. 
मनपाचा आपातकालीन नियंत्रण कक्ष
आपातकालिन स्थितीची माहिती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा आपातकालिन नियंत्रणकक्ष कार्यान्वित आहे. यासाठी १०१ हा टोल फ्री क्रमांक आहे. याशिवाय ७०३०९७२२०० हा मोबाईल क्रमांक आहे. ह्या दोन मुख्य क्रमांकासोबतच ०७१२-२५६७७७७, ०७१२-२५६७०२९, ०७१२-२०३११०१, ०७१२-२५५१८६६ ह्या क्रमांकावरही नागरिकांना संपर्क साधता येईल. याव्यतिरिक्त झोननिहाय क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. लक्ष्मीनगर झोन-०७१२-०२२४५८३३, धरमपेठ झोन-०७१२-२५६५५८९, हनुमाननगर झोन-०७१२-२७५५५८९, धंतोली झोन-०७१२-२४६५५९९,२४३२३४४, नेहरूनगर झोन - ०७१२-२७०५५८९, गांधीबाग झोन-०७१२-२७३५५९९, सतरंजीपुरा झोन-०७१२-२७६७३३९, ७०३०५७७६५०, लकडगंज झोन-०७१२-२७३७५९९, आशीनगर झोन-०७१२-२६५५६०३, २६५५६०५, मंगळवारी झोन-०७१२-२५९५५९९.

मंगळवार, जून ०५, २०१८

 न्यू मनीषनगर ते गांधीबाग‘आपली बस’चा शुभारंभ

न्यू मनीषनगर ते गांधीबाग‘आपली बस’चा शुभारंभ

नागपूर/प्रतिनिधी:
न्यू सोमलवाडा, न्यू मनीषनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने मंगळवार ५ जूनपासून न्यू मनीषनगर-गांधीबाग ‘आपली बस’चा शुभारंभ केला.यानिमित्त श्यामनगर येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेवक अविनाश ठाकरे, संदीप गवई, नगरसेविका विशाखा बांते, जयश्री वाडीभस्मे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कामडी, श्री. पाठक उपस्थित होते. 
यावेळी बोलताना सभापती बंटी कुकडे म्हणाले, नागपूर शहरातील ‘आपली बस’ अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. नागरिक मागेल त्या मार्गावर बस देण्याचा आमचा मानस आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची मानसिकता आता बनत आहे. यापूर्वी न्यू मनीषनगर-बर्डी बस सुरू केली. आता गांधीबाग मार्गावर बस सुरू झाल्याने मनीषनगर दोन मुख्य भागांशी जोडले गेले. या दोन्ही मार्गावरील बसचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नगरसेवक अविनाश ठाकरे यांनीही नागरिकांना मनपाच्या ‘आपली बस’चा वापर अधिकाधिक करण्याचे आवाहन केले. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कामडी यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून बसचा शुभारंभ केला. यावेळी परिवहन नियंत्रक योगेश लुंगे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव प्रा. अरुण फाळके, सहसचिव रामचंद्र चुटे, कार्याध्यक्ष रामकुपाल तिवारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक गुंडावार यांच्यासह अन्य सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अशोक कातुरे यांनी केले. सदर बसचा मार्ग न्यू मनीषनगर बस स्टॉप, श्यामनगर, काचोरे लॉन, बेसा टी-पॉईंट, रामेश्वरी चौक, विश्वकर्मा नगर, तुकडोजी पुतळा, मेडिकल चौक, बस स्टॅण्ड, टिळक पुतळा, बडकस चौक, गांधी पुतळा असा राहील. न्यू मनीषनगर येथून सकाळी ८ वाजता पहिली फेरी आणि सायंकाळी ५.३० वाजता अखेरीची बस राहील. गांधीबाग येथून सकाळी ९ वाजता पहिली बस तर सायंकाळी ६.३० वाजता अखेरची बस राहील. एका तासाच्या अंतराने बसफेऱ्या राहतील. बस शुभारंभ कार्यक्रमानंतर नागपूर महानगरपालिका आणि स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने श्यामनगर परिसरात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी वृक्ष लावून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा संदेश दिला.



आम्ही घरापासून सुरू करू प्लास्टिकबंदी;मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा संकल्प

आम्ही घरापासून सुरू करू प्लास्टिकबंदी;मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा संकल्प

मनपा-ग्रीन व्हिजीलद्वारे कार्यशाळा
नागपूर/प्रतिनिधी:

 पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या व्यतिरिक्त दैनंदिन उपयोगातल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करणे आजपासून आम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्य बंद करू. यासाठी जनजागृतीचा वसा आजपासून स्वीकारू, असा संकल्प मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एकमुखाने केला. 
निमित्त होते नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित कार्यशाळेचे. ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात’ हा कार्यशाळेचा विषय होता. मनपा शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षक सहभागी असलेल्या या कार्यशाळेत ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून आणि मूक अभियनातून प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांना बोलते केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी मूकनाट्यातून पर्यावरणाला धोका निर्माण होणाऱ्या कृती करून दाखविल्या. त्या कृती काय हे ओळखून विद्यार्थ्यांनी योग्य काय, ते अभिनयाच्या माध्यमातून करून दाखविले. 
सदर कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, मनपातील भाजपच्या प्रतोद नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेविका श्रद्धा पाठक, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटजी उपस्थित होते. 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले, काही गोष्टींवर कायदेशीर बंदी आणणे आणि स्वयंसंकल्पाने काही गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर करणे, यात बरेच अंतर आहे. ज्या गोष्टी पर्यावरण रक्षणात सहयोगी आहे अशा गोष्टींची सुरुवात मनपाने कायद्याची वाट न पाहता सुरू केली. नदी स्वच्छता अभियान, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, इथेनॉलवर बसचे संचलन आदी विधायक गोष्टींची सुरुवात केली आणि नागरिकांनीही त्याला तितकाच प्रतिसाद दिला. कुठलेही चांगले विचार रुजविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका मोठी असते. आपण स्वत:पासून प्लास्टिकबंदी सुरू केली तर आपण या चळवळीतील क्रांतिकारी बनाल, असेही ते म्हणाले. 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे असते. मनपाच्या शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर मूल्यशिक्षणही देते, हे अशा उपक्रमांतून सिद्ध होते. प्लास्टिकबंदी, वृक्षारोपण, नैसर्गिक स्त्रोत आदींचे जतन करणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने ओळखायला हवी.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकबंदी करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करू, अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मधु पराड यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनपा शिक्षण विभागाचे कर्मचारी वृंद आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, विकास यादव, अभय पौनीकर, कार्तिकी कावळे, अमोल भलम, शांतनू शेळके, आयुष शेळके, दादाराव मोहोड आदींनी सहकार्य केले. 
चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये साधला नागरिकांशी संवाद
पर्यावरण दिवसाच्या निमित्तान नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी सायंकाळी धरमपेठ परिसरातील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथे नागरिकांशी संवाद साधला. ‘प्लास्टिकचे दुष्परिणाम’ या विषयांवर स्वयंसेवकांनी नागरिकांची मते जाणून घेतली. प्लास्टिकबंदीसाठी काय करायला हवे यासंदर्भात नागरिकांच्या सूचना नोंदवून घेतल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ३५० नागरिकांशी संवाद साधण्यात आला. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत स्वत:पासून प्लास्टिकबंदी करण्याचा संकल्प केला.