Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बावनकुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बावनकुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जून २५, २०१८

 30 जून ला चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपुरात

30 जून ला चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपुरात

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक 30 जून 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
30 जून रोजी सकाळी 9 वाजता कोराडी येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील आणि दुपारी 11.30 वाजता औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता भटाडी कोळसा खाण येथे आगमन व पाहणी व संबंधीत शेतक-यांसोबत चर्चा. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे भेट व पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथील समस्यांबाबत आढावा बैठक घेऊन सांय.6 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

बुधवार, जून ०६, २०१८

ईक्बाल बोहरी आणि मुकेश खुल्लर  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी

ईक्बाल बोहरी आणि मुकेश खुल्लर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी

मुंबई/प्रतिनिधी:
 निवृत्त जिल्हा न्यायाधीश ईक्बाल बोहरी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली असून त्यांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्रालयात पार पडलेल्या या शपथविधी कार्यक्रमाला मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, एमईआरसीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यूपीएस मदान, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एस. संधू, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्याम लाल गोयल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह विविध विभागाचे सचिव, विद्युत नियामक आयोग आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


शुक्रवार, जून ०१, २०१८

सोमवार, जानेवारी १५, २०१८

 चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री

नागपूर/प्रतिनिधी:  
इमेज परिणाम
राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासनाने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. 
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचे शासकीय परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जिल्ह्याला कुणीही पूर्णवेळ पालकमंत्री नव्हते. यापूर्वी बावनकुळे यांची भंडारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्याकडे आता नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.