Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जुलै ३१, २०१८

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण

चंद्रपूर/प्रतिनिधी:

मध्य चांद वन विभागातील कोठारी,धाबा,बल्लारपूर, पोभूर्ण या चार वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असल्याने येथे नेहमी मानव - वन्यजिव संघर्ष होतात.त्यामुळे या परिसरात जंगलालगत गावातील विद्याथ्याना निसर्ग सखा संस्थेच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आदरणीय अरण्यऋषी मारोती चितमपल्ली यांनी लिहलेले जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रम वनपरिक्षेत्र कोठारी याच्या कार्यलयात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक बी.जी हाके वनपरिक्षेत्र अधिकारी कोठारी यांनी केले तर अध्यक्ष म्हणून प.स.सदस्य सोमेश्वर पद्यगिरीवर हे होते .
निसर्ग सखा संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून ते या परिसरात वन व वन्यजीव संरक्षणाचे कार्य करीत आहे . लोकसहभागाशिवाय वन्यजीव सरंक्षण करणे अवघड असल्याने येथिल नागरिकांनी वन - वन्यजीव संरक्षणा करीता पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन बी.जी हाके यांनी यावेळी केले
अरण्यऋषीं मारोती चितमपल्ली सर हे निसर्ग लेखक म्हणून ख्यातीप्रात आहे.त्यानी लिहलेल्या पुस्तकांनी येथील युवक , विद्याथ्याना निसर्ग व वन्यजीव संरक्षणाची आवड निर्माण होईल.युवक,विद्यार्थी निसर्ग संरक्षणाकडे वळतील अशी आशा आहे असे मत निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले वन विभागाने निसर्गअनुभ ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो मुलांना एक दिवसिय जंगलात शिबीराचे आयोजन केले त्या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विध्याथ्याना या पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे असे ते सांगितले. कार्यक्रमास कोठारी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बी.जे.हाके,सोमोश्वर पद्यगिरीवर सदस्य ,प.स.बल्लारपूर,गोलू बाराहोते वन्यजीव फोटोग्राफर, चंद्रपूर, नितीन रायपूर अध्यक्ष,छायाचित्रकार बहु.संस्था, चंद्रपूर ,सुशील खोब्रागडे कोठारी,फुलचंद मेश्राम, चंद्रपूर संदीप गव्हारे,चंद्रपूर दिपक वांढरे अध्यक्ष, निसर्ग सखा संस्था इ उपस्थित होते.

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

 वनक्षेत्रपालाने फुलविली ‘पेंच अभयारण्यातील रानफुले’

वनक्षेत्रपालाने फुलविली ‘पेंच अभयारण्यातील रानफुले’

अतुल देवकरांचा वनमंत्री मुनगंटीवारांकडून सन्मान
 रामटेक/प्रतिनिधी-

पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांत पेंच पुर्व वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेले अतुल देवकर यांचा राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांची सन्मान केला.नुकतेच अतुल देवकर यांनी ‘पेंचमधील रानफुले’हे पुस्तक लिहीले व प्रकाषीत केले त्याब दल वनमंत्री यांनी पेंच येथील अमलताष सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला.

‘अतुल देवकर हे अश्टपैलु व्यक्तिमत्व असून वनविभागात कार्य करतांना पेंच अभयारण्यातील रानफुलांची माहीती देणारे पुस्तक त्यांनी लिहीले हे अभिमानास्पद आहे.रानफुले हा रानावनांच्या सौंदर्याचा मौलीक ठेवा असून या रानफुलांचे सौंदर्य टिपत त्याविशयीची विस्तृत माहीती देत पुस्तकरूपात संग्राहय संकलन तयार केले त्याबद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन’अषा षब्दांत मुनगंटीवारांनी देवकरांचा सन्मान केला आहे.
छेवकर यांना पाठविलेल्या लेखी पत्रांतून वनवैभव आधोरेखीत करीत अभिनव पद्धतीने लोकांपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दलही त्यांनी देवकरांचे कौतुक केले आहे.
अतुल देवकर हे उपक्रमषील व्यक्तीमत्व असून त्यांना राॅयल बॅंक आॅफ स्काॅटलॅंड च्या वतीने जंगलाच्या संरक्षण आणी संवर्धनासाठी ‘पृथ्वी हिरो’या पुरस्काराने यापुर्वी सन्मानीत करण्यात आले आहे.देवकर यांना गडचिरोली येथील दुर्मीळ होत चाललेल्या रानम्हषींचे संरक्षण व संवर्धन यासाठी केलेल्या कामांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांना बॅंकेच्या वतीने पुरस्कारादाखल दोन लक्ष रूपयांचे पारीतोशीक देण्यात आले असून सोलापुरजवळील त्यांच्या दुश्काळग्रस्त गावांतील गरीब विद्याथ्र्यांच्या षिक्षणासाठी ही रक्कम देण्याचा मनोदय देवकर यांनी व्कत केला आहे.दिल्ली येथे संपन्न झालेल्या विषेश समारंभात त्यांना हा पुरस्कार लोकसभाध्यक्षा सुमीत्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आला.यावेळी वनखात्यातील अधिकारी,कर्मचारी व अषासकीय संस्थांचे पादाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.