Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पाणीबाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाणीबाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी २३, २०१८

 शहरावर पाणीबाणीचे संकट;मिळणार एक दिवसाड पाणी

शहरावर पाणीबाणीचे संकट;मिळणार एक दिवसाड पाणी

चंद्रपूर(ललित लांजेवार):
      चंद्रपुर जिल्ह्यात  झालेल्या अत्यल्प पावसाने अखेर शहर मनपा हद्दीत "पाणीबाणी" जाहीर करण्यात आली आहे. येत्या १ मार्च पासून शहरात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापौर अंजली घोटेकर आणि आयुक्त संजय काकडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.यावरील  उपाययोजना जाहीर करण्यात आल्या असून नागरिकांना  पाणीवापरावर कसोशीने प्रतिबंध आणण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
चंद्रपुरात मागीलवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्याचे चटके आतापासून जाणवायला लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच प्रकल्प चिंताजनक स्थितीत आहेत. पाण्याची भूजल पातळी ही कमालीची खालावली आहे. अश्यातच चंद्रपूरकरांवर आता भीषण पाणी टंचाई उद्भवते कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात मागीलवर्षी पर्जन्यमान १६२१ मिमी झालेले होते ते सरासरी होणारया पर्जन्यमानाच्या १२५ टक्के इतके आहे.यंदा ७९७.१० मिमी पर्जन्यमान  झालेले असून  सरासरी होणारया पर्जन्यमानाच्या ७०.५६ टक्के आहे.
 २३ फेब्रुवारी २०१८ रोजी पाण्याची पातळी २०२.५२५ मी. ईतकी आहे, त्यानुसार उपलब्ध पाण्याचासाठा १३० MM3 ईतकेच आहे.चंद्रपूर शहराला एका महिन्याला ७.८०  MM3 ईतके पाणी लागेते तर त्याच्या  ५ पट पाणी वीजनिर्मितीसाठी लागेते. 

अत्यल्प पावसाने नदी, नाले, धरणे आता पासूनच आटणे सुरू झाले. शहराला पाणीपुरवठा करणा-या इरई धरणातही पाण्याचा कमीच साठा आहे. टंचाईची स्थिती बघता प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो.  या धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही पाणी दिले जाते. त्यामुळे या धरणातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसात यातील साठा आणखी कमी होऊन चंद्रपूरकरांवर पाण्याचे भिषण संकट ओढवू शकते.त्यावर मनपाने पाणी  बचतीसाठी बंद बोरवेल,बुजलेल्या विहिरी,सरकारी नळ,नवीन बोरिग तयार करणे,नवीन बोरवेल मारणे आदीची व्यवस्था पाणी वापरता येईल अश्या प्रकारे नियोजन सुरु आहे त्यासाठी १.८० कोटी रुपये लागणार असल्याचे सांगितले आहे असे पत्र देखील जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.