Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पत्रकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पत्रकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑक्टोबर २०, २०१८

चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

Inauguration of reference library at Chandrapur Press Club | चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटनचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर प्रेस क्लबच्या संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन गुरूवारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी समिती सदस्य तथा लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर वानखेडे, भाजपाचे जिल्हा महासचिव रामपाल सिंग, शहर कॉंग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर प्रेस क्लब अध्यक्ष संजय तायडे मंचावर उपस्थित होते.
पत्रकारिता प्रगल्भ व्हावी यासाठी ग्रंथालयाचे मोठे योगदान असते. पत्रकारांना विविध संदर्भासाठी ग्रंथाची गरज असते आणि म्हणून आणि म्हणून चंद्रपूर प्रेस क्लबमध्येही संदर्भ ग्रंथालय तयार व्हावे अशी इच्छा व्यक्त करीत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रंथालयासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. शिवाय लवकरात लवकर हे ग्रंथालय सुरू करा, असे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि अवघ्या तीन- चार दिवसात या गं्रथालयाचे उदघाटनसुध्दा झाले, हा शुभसंकेत आहे. पुढेही शासन निधीतून या ग्रंथालयासाठी मोठी मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यानी दिली. याप्रसंगी नंदू नागरकर यांनी ग्रंथालयाला नगरसेवक निधीतून एक लाखांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी रामपालसिंग यांचेही येथोचित भाषण झाले. या प्रसंगी वर्तमानपत्राचे वितरक बंटी चोरडिया यांचा देवराव भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पुस्तक हे वैचारिक भुकेचे पोषण करणारे तत्व आहे. सोशल मिडियावर बातम्या पाहता येतात. पण दुसºया दिवशीच्या वर्तमानपत्राची आतुरतेने वाट बघतोच. पुस्तकही अशीच अनुभूती देते. ग्रंथालयाच्या माध्यमातून विचारांचे आंदान प्रदानही होते, असे विचार डॉ. पद्मरेखा धनकर- वानखेडे यांनी व्यक्त केले.

शुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक सोहळ्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे चंद्रपूरात

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक सोहळ्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे चंद्रपूरात

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. सुधीर मुनगंटीवार 
 कर्मवीर पुरस्कार व वार्षिक स्पर्धा पुरस्काराचे वितरण 

चंद्रपूर/प्रतिनिधी :- 

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या कर्मवीर पुरस्कार व विविध स्पर्धा पुरस्काराचे वितरण राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ज्येष्ठ पत्रकार , विश्व साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष संजय आवटे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा कर्मवीर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यंदा ज्येष्ठ पत्रकार अरुण दिवाण आणि विजय बनपुरकर याना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा सोहळा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या मुख्य शाखेतील पहिल्या माळ्यावर असलेल्या सुसज्ज 'कर्मवीर सभागृहात' ७ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात पत्रकार संघाच्या स्व. छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कार, लोकसेवा व विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार, ग्रामीण वार्ता पुरस्कार, इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांच्यातर्फे प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठीचा वृत्तछायाचित्र स्पर्धा पुरस्कार तसेच स्व. श्रीमती सुशीला राजेंद्र दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट वृत्तांकन (टीव्ही) पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

शनिवार, ऑगस्ट १८, २०१८

भाजपा सरकारकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा व्यर्थ : जयंत पाटील

भाजपा सरकारकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा व्यर्थ : जयंत पाटील


चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोेजित 'मीट द प्रेस ' 
चंद्रपूर/प्रतिनिधी :


मंडल आयोगाला विरोध करून भाजपाने तत्कालीन व्हि. पी. सिंग सरकारचा पाठींबा काढून घेतला होता, असा दाखल देत भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी चंद्रपुरात व्यक्त केले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोेजित 'मीट द प्रेस ' कार्यक्रमात त्यांनी पक्षाची भूमिका मांडताना अनेक प्रश्नांना सळेतोड उत्तरे दिली.
यावेळी 'मीट द प्रेस ' ला आमदार प्रकाश गजभिये, राकॉंचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विग्नेश्वर आदी उपस्थित होते. तत्पुर्वी श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोेजित 'मीट द प्रेस ' च्या अगोदर माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
देशात भाजपाच्या सोयीचे राजकारण सुरू आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर सविधानाची प्रत जाळली जाते, आंबेडकरांविषयी अवमानजनक विधान केले जाते. मात्र, त्या समाजकंटकांवर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, जेएनयू विद्यापीठात काही विद्यार्थी घोषणाबाजी करतात आणि पोलीस त्यांना विद्यापीठातून अटक करते, यावरून या देशाचे राजकारण कोणाच्या हिताचे आहे, हे स्पष्ट होत असा टोलाही  त्यांनी लावला..
७० वर्षांत रुपयाचे अवमूल्यन झाले नाही. तेवढे रुपयाचे अवमूल्यन मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यावरूनच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. आजपर्यंत रुपयाचे अवमूल्यन कधीच एवढ्या निच्चांकी पातळीवर आले नाही. जीएसटी, नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली असून, नोकऱ्यांची स्थिती गंभीर आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. गेल्या चार वर्षांत देशातील जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही या सरकारने दिली होती. मात्र, अद्याप ते सरकारला जमले नाही असे सांगत देशात शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. मात्र, दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांनी सत्तेच मोह कधीच बाळगला नाही. वाजपेयी यांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते असे सांगत त्यांनी वाजपेयी यांची भाजपाला उणीव जाणवेल असे ते म्हणाले. अर्थमंत्र्यांच्या गावात येऊन महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी सांगणे उचित नाही. मात्र, राज्यावरील कर्जाचा डोंगर पाच लाख कोटींच्या वर गेल्याचे मात्र, त्यांनी आवर्जून सांगितले. . संचालन व आभार सचिव प्रशांत विग्नेश्वर यांनी मानले.



गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१८

  श्रमिक पत्रकार संघ-जिल्हा माहिती कार्यालय -पोलीस विभागाने आयोजित केली जनजागृती कार्यशाळा

श्रमिक पत्रकार संघ-जिल्हा माहिती कार्यालय -पोलीस विभागाने आयोजित केली जनजागृती कार्यशाळा

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात लोकमान्य टिळक
अण्णाभाऊ साठे आदरांजली कार्यक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनाचे औचित्य साधत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात एका आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या मंचावर चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम , चंद्रपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके , जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके , चंद्रपूर पोलिसांच्या सायबर सेलचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाला. मान्यवरांचे पुस्तक भेट देत स्वागत करण्यात आले. पत्रकार संघाचे सचिव प्रशांत विघ्नेश्वर यानी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने घेतल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. आपल्या संबोधनातून चंद्रपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने आजच्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरातील पत्रकारांसाठी 'फेक न्यूज ' आणि 'सायबर क्राईम ' विषयावर आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी पत्रकार संघाच्या एकीच्या बळाचे विशेष कौतुक केले. 
आपल्या संवादातून चंद्रपूर पोलिसांच्या सायबर सेलचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यानी 'सायबर क्राईम ' विषयावर विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले. एटीएम सुरक्षा, सोशल मीडियावर सजगता , आपल्या वैयक्तिक माहिती संदर्भातील काळजी याबाबत त्यांनी खास टिप्स दिल्या. सावधानता बाळगूनही काही विपरीत घडल्यास करावयाच्या उपायांची माहिती पो. उ. नि. मुंडे यांनी दिली.
आपल्या प्रमुख संबोधनातून जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी राज्य सध्या 'फेक न्यूज' च्या विळख्यात असून पत्रकार म्हणून माध्यम प्रतिनिधींनी पार पाडावयाच्या जबाबदारीची विशेष गरज असल्याचे सांगितले. मुद्रित असो वा इलेकट्रोनिक अथवा पोर्टल सर्वांनी बातमीची खातरजमा केल्याशिवाय ती लोकांपर्यंत जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्याने केले. व्हॉटसप , फेसबुक, युट्युब , ट्विटर , इंस्टाग्राम यांचा वापर सुशिक्षित होण्यासाठी करा. सध्या समाज माध्यमांवर दुर्जन अधिक सक्रिय असून सज्जन हतबल असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. खोट्या बातम्या टाळा आणि समाजातील शांतता कायम ठेवण्यासाठी योगदान द्या असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 'फेक न्यूज ' संदर्भात केलेल्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी आदरांजली कार्यक्रम आणि कार्यशाळा उपक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार संघटना सदस्यांचे अभिनंदन केले. सज्जनशक्ती सक्रिय झाल्यानेच समाजातील वैरत्व-दुही नष्ट होईल अशी भूमिका तुमराम यांनी मांडली. आज पत्रकारितेवर मोठी जबाबदारी आहे आपण सर्व मिळून ती पार पडण्याची गरज असल्याचे त्यांनी अध्यक्षीय भाषणातून नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. या कार्यक्रमाला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ , चंद्रपूर मराठी पत्रकार संघ , महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ आदी पत्रकार संघटनाच्या सभासदांची भरगच्च उपस्थिती होती.

सोमवार, जुलै १६, २०१८

श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारांच्या प्रवेशिकासाठी मुदतवाढ

श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारांच्या प्रवेशिकासाठी मुदतवाढ

चंद्रपूर दि. (प्रतिनिधी):
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरूची वृत्तकथा, वृत्तछायाचित्र, दुरचित्रवाणीसाठी उत्कृष्ठ वृत्ताकंन पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून २० जुलै २०१८ पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येतील. तसेच पुरस्कार मिळालेल्या स्पर्धकांनाही स्पर्धेत सहभाग घेत येणार आहे. 
ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी परिणामकारक वृत्त, वार्तापत्र, वृत्तमालिका ग्राह्य धरण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रथम, द्बितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. रोख पुरस्कार, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच स्व. छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कार हा केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल. 
लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठानतर्फे प्रायोजित मानवी स्वारस्याच्या बातमीसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार असून, रोख पुरस्कारसह स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांससाठी खुली राहील.
इतिहास अभ्यासक अशोकqसह ठाकुर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून, ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेवू शकतात. रोख पुरस्कारासह स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
स्व. सुशिला राजेंद्र दीक्षित स्मृतिप्रित्यार्थ उत्कृष्ठ वृत्तांकन (टि.व्ही.) पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी दुरचित्रवाणी वृत्तवाहिनीवर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसारित बातमी ग्राह्य धरण्यात येईल. स्पर्धेसाठी आपल्या बातमीच्या चार सिडी आपल्या अर्जासह सादर कराव्यात स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिकासोबत उत्कृष्ट वृत्ताकंन पुरस्कार (टी.व्ही.) असा ठळक उल्लेख करावा. 
पुरस्कारासाठी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरीत नसावे. स्पर्धा मराठी, हिन्दी, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मूळ प्रतीसह चार छायांकित प्रतित असावे. मूळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका सोबत आपली बातमी कोणत्या स्पर्धेसाठी आहे याचा स्पष्ट उल्लेख तपशीलवार करावा. सर्व प्रवेशिका २० जुलै २०१८ पर्यंत स्पर्धा संयोजक, प्रेस क्लब, जुना वरोरा नाका, चंद्रपूर या पत्त्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक जितेंद्र मशारकर, एजाज अली, विनोद बदखल, राजेश निचकोल यांनी केले आहे.