Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १८, २०१८

भाजपा सरकारकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा व्यर्थ : जयंत पाटील


चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोेजित 'मीट द प्रेस ' 
चंद्रपूर/प्रतिनिधी :


मंडल आयोगाला विरोध करून भाजपाने तत्कालीन व्हि. पी. सिंग सरकारचा पाठींबा काढून घेतला होता, असा दाखल देत भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी चंद्रपुरात व्यक्त केले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोेजित 'मीट द प्रेस ' कार्यक्रमात त्यांनी पक्षाची भूमिका मांडताना अनेक प्रश्नांना सळेतोड उत्तरे दिली.
यावेळी 'मीट द प्रेस ' ला आमदार प्रकाश गजभिये, राकॉंचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विग्नेश्वर आदी उपस्थित होते. तत्पुर्वी श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोेजित 'मीट द प्रेस ' च्या अगोदर माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
देशात भाजपाच्या सोयीचे राजकारण सुरू आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर सविधानाची प्रत जाळली जाते, आंबेडकरांविषयी अवमानजनक विधान केले जाते. मात्र, त्या समाजकंटकांवर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, जेएनयू विद्यापीठात काही विद्यार्थी घोषणाबाजी करतात आणि पोलीस त्यांना विद्यापीठातून अटक करते, यावरून या देशाचे राजकारण कोणाच्या हिताचे आहे, हे स्पष्ट होत असा टोलाही  त्यांनी लावला..
७० वर्षांत रुपयाचे अवमूल्यन झाले नाही. तेवढे रुपयाचे अवमूल्यन मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यावरूनच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. आजपर्यंत रुपयाचे अवमूल्यन कधीच एवढ्या निच्चांकी पातळीवर आले नाही. जीएसटी, नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली असून, नोकऱ्यांची स्थिती गंभीर आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. गेल्या चार वर्षांत देशातील जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही या सरकारने दिली होती. मात्र, अद्याप ते सरकारला जमले नाही असे सांगत देशात शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. मात्र, दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांनी सत्तेच मोह कधीच बाळगला नाही. वाजपेयी यांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते असे सांगत त्यांनी वाजपेयी यांची भाजपाला उणीव जाणवेल असे ते म्हणाले. अर्थमंत्र्यांच्या गावात येऊन महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी सांगणे उचित नाही. मात्र, राज्यावरील कर्जाचा डोंगर पाच लाख कोटींच्या वर गेल्याचे मात्र, त्यांनी आवर्जून सांगितले. . संचालन व आभार सचिव प्रशांत विग्नेश्वर यांनी मानले.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.