Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नगरपंचायत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नगरपंचायत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

शुक्रवारी वाडीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा

शुक्रवारी वाडीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती

नागपूर - वाडी नगर परिषदचे नवनियुक्त नगराध्यक्ष भाजपाचे जिल्हा महामंत्री  प्रेमभाऊ झाडे व उपनगराध्यक्ष राजेश थोराने यांचा पदग्रहण सोहळा जुने ग्रामपंचायत कार्यालयामागे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० .३० वाजता आयोजीत करण्यात आला आहे . अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे राहतील . प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने,आमदार अनिल सोले,आमदार समीर मेघे, आमदार गिरीश व्यास ,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ .राजीव पोतदार ,जिल्हा महामंत्री श्रीकांत देशपांडे, अरविंद गजभिये, संजय टेकाडे, किशोर रेवतकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे . कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती प्रेम झाडे  यानी  केली आहे .

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

बल्लारपूर नगरपरिषदेत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

बल्लारपूर नगरपरिषदेत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

बल्लारपुर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र शासनाचे धोरनानुसार व केंद्र सरकारच्या अथक सहकार्यातुंन दिव्यांग बांधवासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात व यातूनच दिव्यांग बांधवासाठी कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली जाते त्याच अनुशंगाने महाराष्ट्र शासनाच्या धोरनानुसार नगर परिषद  बल्लारपुर च्या माध्यमातून बल्लारपुर शहरातील व आसपास च्या दिव्यांग बांधवासाठी नगर परिषद बल्लारपुर येथे स्वतंत्र नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे तरी नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवानी दिव्यांग असल्याबाबतची नोंदणी करून घ्यावी तसेच यासंबधी मिळणाऱ्या सर्व सेवा सवलतिचा प्राप्त करुण घ्यावा असे जाहिर आव्हान मा. हरीश शर्मा अध्यक्ष नगर परिषद बल्लारपुर व मा. विपिन मुद्दा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांनी केली आहे.

बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

कोंढाळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार.. रूपांतर होणार

कोंढाळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार.. रूपांतर होणार

नागपूर - आज दि 8 नोव्हेंबर ला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,फडणवीस यांचेशी वर्षा येथे कोंढाळी ग्रामपंचायत चा दर्जावाढ करणेबाबत बैठक झाली.
या चर्चेत मा.आमदार देशमुख साहेब, सरपंच लालीतमोहन कालबांडे, संजयजी राऊत, स्वप्नीलजी व्यास, प्यारुजी पठाण, गोपालजी माकडे, विजयजी डहाट, प्रमोद चाफले, राठोड साहेब, नागेश गौरखेडे उपस्थित होते.
मा.मुख्यमंत्री साहेबांनी मंत्री समितीचे अध्यक्ष मा. सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांचे मार्फत कोंढाळी (ता. काटोल) नगरपंचायत करण्यासंदर्भात प्राथमिक उद्घोषणा करण्यात येईल असे सांगितले, तसेच शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता लवकरच करून घेऊन हि उद्घोषणा करण्यात येईल असे ठरले.