Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

थकबाकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
थकबाकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

महावितरणची धडक मोहीम;वीज बिल न भरल्यास केल्या जाणार पुरवठा खंडित

महावितरणची धडक मोहीम;वीज बिल न भरल्यास केल्या जाणार पुरवठा खंडित

चंद्रपूर / प्रतिनिधी :
महावितरणची ग्राहकांकडील थकबाकी दिवसेंदिवस चांगलीच वाढत आहे. त्यामुळे महावितरण सध्या अडचणीत सापडले आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे तब्बल आठ कोटी ६५ लाखांच्या घरात थकबाकी आहे. वाणिज्यिक गाहकांकडे तीन कोटी २३ लाख तर औद्योगिक ग्राहकांकडे ५७ लाख ९५ हजार रुपये थकित आहेत. या थकबाकीदारांविरुध्द महावितरणच्या चंद्रपूर कार्यालयाने आक्रमक पाऊल उचलत धडक मोहीम सुरू केली आहे.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाची चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील पाणीपुरवठा योजनांकडे एक कोटी ३५ लाख तर सरकारी कार्यालयाकडे ९४ लाख थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा ख्ांडीत ग्राहकांकडे ४० कोटी ९१ लाख तसेच कृषीपंपधारकांकडे ७१ कोटी ५३ लाख रुपये थकीत आहे. शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीज बिलाची थकबाकी चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांकडे व ग्रामपंचायती मिळून तब्बल १२९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये थकित आहे. त्यामुळे या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणी पुरवठा योजना, पथदिवे आदी सर्व थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या महावितरण बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरे जात असून थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याने महावितरण थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सर्वत्र करीत आहे.
कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाई
थकबाकी वसुलीबाबत महावितरण आक्रमक झाली आहे. थकबाकीदार ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यालयातून देण्यात आले आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीत हयगय दाखविणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांवर वसुली न झाल्यास कारवाई केली जाईल, असेही महावितरणच्या मुख्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असल्याने महावितरणने ही भूमिका घेतली आहे.

बुधवार, जानेवारी १७, २०१८

व्यापाऱ्याच्या दुकानाला मनपाने ठोकले सील

व्यापाऱ्याच्या दुकानाला मनपाने ठोकले सील

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहर महानगर पालिकेअंतर्गत थकबाकीदारांविरोधात जप्ती ची मोहीम  हाती घेतली आहे.  या मोहिमेअंतर्गत झोन क्रमांक १ मित्रनगर वार्डात मनपाने शंकरराव मेदीलाल मोरे यांच्याकडे ४  वर्षांपासून थकबाकी असून वारंवार थकबाकीची मागणी मनपाने केली असता थकबाकी न भरल्याने त्यांच्या दुकानाला सील ठोकून जप्तीची कारवाई केली आहे.  मित्र नगरात शंकरराव मेदीलाल मोरे यांचे दुकान आहे. मनपाच्या अधिकाऱ्याने वारंवार थकबाकीची मागणी केली असता तुम्ही इकडे या आणि उपायुक्तांना इकडे घेऊन या तेवाच मी कराचा भरणा करेन व अरेरावीची भाषा सुद्धा वापरली. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी येथे पोहोचून धडक कारवाई करत शंकरराव मेदीलाल मोरे यांचा दुकानाला सील ठोकले आहे. ४ वर्षांपासून त्यांच्याकडे ३७ हजार चारशे ९६ रुपये इतकी थकबाकी बाकी होती. महानगर पालिकेतर्फे अनेकदा कराचा भरणा लवकरात लवकर करावा असे आवाहन करण्यात येत असताना सुद्धा कराचा भरणा लवकरात लवकर न केल्याने हि कारवाई केल्याचे सांगितले आहे. हि कारवाई बंडू वासेकर, भाऊराव सोनटक्के व इतर अधिकाऱ्यांनी केली आहे.