Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जलसंपदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जलसंपदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, मार्च १७, २०१८

जलसंपदा विभागाने केलेली पाण्याचे वाटप जलसंपत्ती प्राधिकरणाला अमान्य

जलसंपदा विभागाने केलेली पाण्याचे वाटप जलसंपत्ती प्राधिकरणाला अमान्य

आशिष जयस्वाल यांनीही घेतले आक्षेप 
नागपूर/प्रतिनिधी:
पेंच प्रकल्पाचे पाण्याचे घरघुती, औद्योगिक व सिंचन प्रवर्गात वाटप सूत्रानुसार करावे असे आदेश जलसंपदा विभागाला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार अधीक्षक अभियंता श्री इंगळे यांनी धरणाची साठवणूक क्षमता ९६५ द.ल.घ.मी. ग्राह्य धरून नागपूर शहरासाठी घरघुती वापरासाठी १३० द.ल.घ.मी. औद्योगिक प्रयोजनासाठी ८७ द.ल.घ.मी.व सिंचनासाठी ६५२ द.ल.घ.मी. पाण्याचा कोटा निश्चित केला व यावर्षी पाण्याची तूट असल्याने नागपूर शहराला ११४ द.ल.घ.मी., कोरडी व खापरखेडा ५५ द.ल.घ.मी.व सिंचनाला २८३ द.ल.घ.मी. पाणी असा पाणी वाटपाचा कोटा निश्चित केला. त्यानुसार नागपूर शहराच्या १९० द.ल.घ.मी.मागणीच्या तुलनेत ११४ द.ल.घ.मी. पाणी अनुज्ञेय केले. या आदेशात वापरलेले शब्द हे योग्य नसल्याचे सांगून प्राधिकरणाने स्थगित केले. ११४ द.ल.घ.मी. पाणी देखील निकषापेक्षा जास्त असल्याचे सांगून श्री.आशिष जयस्वाल यांनी या वाटपा वर हरकत घेतली व धरणाची साठवणूक क्षमता जरी ९६५ द.ल.घ.मी. असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राचा पाण्याचा हक्क हा फक्त २५ TMC (700द.ल.घ.मी.) आहे. त्यामुळे १३० द.ल.घ.मी.घरघुती वापरासाठी ठेवता येत नाही तर १५ टक्के म्हणजे १०५ द.ल.घ.मी. हे हक्क महाराष्ट्राला २५ TMC पाणी मिळाल्यास देता येईल. मात्र जर तुटीचे वर्ष असेल तर ७०-८० द.ल.घ.मी. पेक्षा जास्त पाणी देता येत नाही, असा आक्षेप घेतला. 
तसेच नागपूर शहराला ३०० वर्ष झाली व १९८१ पासून पेंच प्रकल्पातून शहराला पाणी जात आहे. याचा अर्थ १९८१ पूर्वी असलेल्या सर्व स्रोतातून मिळणाऱ्या पाण्याचा विचार करावा व इतर सर्व नवीन स्रोत विचारात घेऊन फक्त वाढीव लोकसंख्येलाच पेंच प्रकल्पातून पाणी देता येईल, असा युक्तिवाद आशिष जयस्वाल यांनी केला. तसेच पेंच प्रकल्पातून महसूल पम्पिंग स्टेशन पर्यंत पाईप लाईन टाकल्याने वाचलेले ८१ द.ल.घ.मी. पाणी तसेच कोराडी खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाला मनपाचे प्रक्रिया केलेले ४० द.ल.घ.मी. पाणी दिले जात असल्याने ठरल्याप्रमाणे ८१+४०=१२१ द.ल.घ.मी. पाणी सिंचनाला न देता नागपूर व कोराडी खापरखेडा जास्तीचे पाणी घेऊन शेतकऱ्यांचा हक्क डावलत असल्याचा मुद्दा आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केला. त्यावर प्राधिकरणाने हे मुद्दे मान्य केले व यानुसार परत प्रत्येकाला त्याच्या हक्कानुसार पाणी वाटप करावे, अश्या सूचना दिल्या. त्याशिवाय शहराच्या लोकसंख्येमध्ये वेगवेगळे कॉलोनी च्या नावाने जास्तीचे पाणी साठवून ठेवल्याचे निदर्शनास आणून ही कॉलोनी शहराच्या अधिकृत लोकसंख्येचाच भाग असल्याचे स्पष्ट केले. 
प्राधिकरणाच्या आदेशापेक्षा जास्तीचे पाणी जर वापरले गेले असेल व शहरामध्ये पिण्याच्या नावाखाली घेतलेले पाणी लघु उद्योग व व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याने याचा हिशोब करून दंडात्मक दराने वसुली करावी असे देखील प्राधिकरणाने निर्देश दिले. कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाला देखील दिले जात असलेले पाणी प्राधिकरणाच्या सुत्रानुसारच देऊन कमी करावे व पुढील १० एप्रिल पर्यंत पुन्हा नव्याने सूत्रानुसार प्रत्येकाचे पाण्यावरील हक्क जाहीर करावे, असे प्राधिकरणाने सांगितले. त्यामुळे सूत्रानुसार पाणी वाटप झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा अधिकचा पाणी मिळेल व त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, असा विश्वास आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.

मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाच्या अवमानना प्रकरणी जलसंपदा विभागाला कारणे दाखवा नोटीस

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाच्या अवमानना प्रकरणी जलसंपदा विभागाला कारणे दाखवा नोटीस

  निकषानुसार पाणी वाटप झाले नसल्याने 
अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांची जलसंपत्ती प्राधिकरणाकडे तक्रार
रामटेक ( ललित कनोजे ): 
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी पेंच प्रकल्पातून पाण्याचे वाटप त्यांनी २२ सप्टेंबर २०१७  ला निर्धारित केलेल्या निकषानुसार न करता क्षेत्रीय वाटपानुसार व निकषानुसार शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना न देता नागपूर शहराला जास्तीचे पाणी दिल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे याचिकाकर्ता अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांच्या तक्रारींवर प्राधिकरणाने ही बाब सत्य असल्याचे निदर्शनास आल्याने मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांना त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली व कलम २६ नुसार त्यांना तुरुंगात का पाठविण्यात येऊ नये, असे खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी मुंबईला सुनावणी झाली व त्यात हे वाटप नेमके कुणी करावे याबाबत राज्य शासनाने स्पष्ट आदेश काढावे, असे निर्देश दिले. प्राधिकरणासमोर जलसंपदा विभागाचे सचिव श्री बिराजदार हे उपस्थित होते व त्यांनी यापुढे अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र नागपूर श्री इंगळे यांनी प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व निकषानुसार पाण्याचे वाटप करणारे सक्षम अधिकारी राहतील, असे स्पष्ट केले. तेव्हा मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग यांनी याचिकाकर्ता अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यांवर परिच्छेद निहाय उत्तर सादर करण्याबाबत निर्देश दिले.

जिल्हाधिकारी नागपूर यांनी नागपूर शहरासाठी १९० द.ल.घ.मी.पाणी आरक्षित केले व प्राधिकरणाच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने फक्त १३० द.ल.घ.मी.पाणी अनुज्ञेय असल्याचे शपथपत्र दाखल केले होते. मात्र शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यातून रब्बी पिकाला दुसरी पाळी न दिल्याने शेतकऱ्यांचा हक्क डावलला गेला आहे, हा त्यांच्यावर अन्याय असल्याने जिल्हाधिकारी यांच्यावर कार्यवाही करा, असा युक्तिवाद अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी केला तसेच धरणात निकषानुसार व क्षेत्रीय वाटपानुसार शेतकऱ्यांचा हक्काचा कोटा अधिकारी निश्चित करत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे लक्षात आणून दिले. कार्यकारी अभियंता श्री तुरखेडे यांनी दुसऱ्या पाळीला ४५ द.ल.घ.मी.पाण्याची गरज होती, त्यामुळे ३० द.ल.घ.मी.पाणी सोडणे शक्य नव्हते, असे सांगितले. सर्व पक्षाची बाजू ऐकून प्राधिकरणाने दि.०८/०२/२०१८ ला या प्रकरणी आपले चौथे आदेश पारित केले.

१. प्रत्येक धरणात प्राधिकरणाच्या सप्टेंबर २०१७ च्या निकषानुसार पाण्याचे वितरण कुणी करावे याबाबत व १७ नोव्हेंबर २०१६ च्या शासन निर्णयात स्पष्टता करावी.
२.अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र नागपूर यांनी यापुढे पेंच प्रकल्पातून घरघुती, औद्योगिक व सिंचन क्षेत्रासाठी प्राधिकरणाने दिलेल्या निकषानुसार कोटा निश्चित करून पाणी वितरित करावे.पुढील सुनावणी १५ मार्च २०१८ ला ठेवण्यात आलेली आहे. 
एकदा हा कोटा निश्चित झाला तेव्हा इतर उपलब्ध स्रोत सांगून मनपा पुन्हा जास्तीचे पाणी कसे घेत आहे व १०० द.ल.घ.मी.पाणी सुद्धा पेंच प्रकल्पातून घेऊ शकत नाही, हे मी पुराव्यानिशी पुढे सिद्ध करेल व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवेल, असे अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट सांगितले.

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणार

राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणार

मूल/ प्रतिनिधी -गिरीश महाजन यांनी शहादा येथे महिला विरोधी भाष्य केले आणि दारू ला महिलांची नावे दया असे विधान केल्यानंतर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अड.पारोमिता गोस्वामी यांनी मूल पोलिसात महाजन विरुद्ध तक्रार दाखल केली होती.  दाखल केलेल्या  तक्रारींवर मूल पोलिसांनी कोणतीही कारवाही न केल्याची गंभिर दखल राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा विजया रहाटकर याबाबत  मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहेत शिवाय मूल पोलिसांना विचारणा करणार आहेत.काल एका दुरचित्रवाहिनी वरील चर्चेत संस्थेच्या अध्यक्षा अड. पारोमिता गोस्वामी यांनी महिलांचा एवढा धडधडीत अपमान झाल्याची तक्रार मूल पोलिसांना दिल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल केला नाही किंवा  अदखलपात्राची नोंद घेतली नाही. ही बाब पुढे आणताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत मुखमंत्राशी यावर बोलू व मूल पोलीसांना जाब विचारू असे जाहिर केले.यासोबतच ज्या दारूचे नाव महिलांच्या नावाने आहे अशी नावे देखील बद्दलवणास भाग पाडू असे यावेळी बोलत असताना सांगितले.
 सविस्तर वृत्त 
दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो

दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो


नागपूर/प्रतिनिधी :  दारूला महिलांचे नाव दिले तर दारूची अधिक विक्री होईल असं म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचा नागपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दारूच्या बाटलीवर कमळ चिन्ह लावून कलेक्टर ला दारूच्या बाटल्या दिल्या.

केंद्रात आणि राज्यात भाजप ची सरकार आहे, त्यामुळे भाजप चे फॉलोवर अधिक आहे त्यामुळे बाटली वर मोदी किंवा कमळ लावले तर अधिक विक्री होऊ शकते अस राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांनी सांगितले. तसेच हा महिलांचा अपमान असून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यानी त्यांना राजीनामा मांगवावा असे अलका कांबळे यावेळी म्हणाल्या.  

दारूची विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांची नावे द्यावीत असा अजब सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे वृत्त सर्वत्र गाजले होते. बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते, ही वस्तुस्थिती आहे. तंबाखूजन्य पदार्थांनाही विमल, सुमन अशी बहुतांशी महिलांचीच नावे दिल्या गेली आहे. त्यामुळं सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी दारूचं नाव 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे असे गिरीश महाजन म्हणाले होते.  

रविवार, नोव्हेंबर ०५, २०१७

भाजपा मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध

भाजपा मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध

पालघर/प्रतिनिधी -
शहादा जि.नंदुरबार येथे एका समारंभात मंत्री  महोदयांनी वरील विधान करुन महीलांचा आपमान केला व आपली बुरसटलेली मनुवादी वृत्ती जगासमोर आणली अशी प्रतीक्रिया पालघर जिल्हा कॉग्रेस  चे  अध्यक्ष केदार काळे ह्यानी दिली .
दारूची विक्री वाढविण्यासाठी त्याला महिलांचे नाव दिल्यास त्या उत्पादनाची विक्री हमखास होते. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून 'महाराजा' ऐवजी 'महाराणी'ठेवावे असा अजब सल्ला राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर सभेत कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास शनिवारी, 4 नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. त्यास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती सभेत दिली. त्यात त्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिलरी प्रकल्प आहे मात्र मद्याची विक्री कमी होते, असे सांगितले.
तो धागा धरुन मंत्री महाजन यांनी सल्ला दिला. ते म्हणाले, "राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव 'भिंगरी' आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव 'ज्यूली' आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते. ही वस्तुस्थिती आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर गुटखा हे माव्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे."अशा विधना मुळे बिजेपीचे महीलान विषई असलेले मत बाहेर आले आहे सत्तेची  गुर्मी भाजपा सरकारला  आली आहे पण जनता एकदा केलीली चुक परत करणार नाही व ह्या सरकारला सत्तेतून घालवतील असे केदार काळे म्हणाले .महीलांचा आपमान करणाऱ्या मत्र्याना  मुख्यमंत्र्यानी मंत्रीमंडलातुन काढून टाकावे अशी मागणी पालघर जिल्हा कॉग्रेस कमीटी करीत आहे