Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चंद्रपुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रपुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ऑगस्ट ०१, २०२१

वरोरा शहरात दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात मनसेनी दिले आमदार धानोरकर यांना निवेदन

वरोरा शहरात दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात मनसेनी दिले आमदार धानोरकर यांना निवेदन




शिरीष उगे /भद्रावती प्रतिनिधी
: वरोरा शहरात दूषित पाण्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.  यासंदर्भात वरोरा – भद्रावती विधानसभेच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर याना निवेदन देण्यात आले. गेल्या कित्तेक वर्षापासून वरोरा शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या जास्तच प्रमाणात जोर धरून आहे. नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊन एकच उत्तर मिळत ते म्हणजे या कामाकरिता आम्ही वारंवार सरकारला विनंती केली पण यामधे आम्हाला यश आले नाही. हा विषय कैबिनेट मधे ठेऊन त्यावर चर्चा करून त्याला स्वीकृती मिळेल तेव्हाच शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. ६५ कोटी रूपयाच्या या पानी प्रश्नाला आपन मंत्रालयात कैबिनेट मधे ठेऊन त्यास स्वीकृती मिळऊन शहराच्या या पाणी प्रश्नाला नवजीवन द्यावी असे मनसे च्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
मनविसे तालुका गौरव मेले , मनसैनिक आकाश काकडे , हर्षल डोंगरे , पृथ्वी पुरी, मनीष वासुरकर , शिवम पेंदोर, रोहित मोलगुरी, अमोल गेडाम व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.

शनिवार, ऑक्टोबर २७, २०१८

चंद्रपूर के नागरीकोंनो राष्ट्रीय एकता दौड़ में हिस्सा लेने की अपील

चंद्रपूर के नागरीकोंनो राष्ट्रीय एकता दौड़ में हिस्सा लेने की अपील

संबंधित इमेजचंद्रपुर/संवाददाता:
 भारत के लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल ने भारत के स्वतंत्रता आंदोलन में पश्चात अखंड भारत के निर्माण के लिए दिए महत्वपूर्ण योगदान दिया. उनके कार्य से जनता को प्रेरणा मिलने के उद्देश्य से राष्ट्रीय एकता सप्ताह के तहत 31 अक्टूबर की सुबह 6.30 बजे एकता दौड़ का आयोजन किया गया है. स्पर्धा पुरुष खुला गट व महिला खुला गट में होगी. दौड़ जिला खेल संकुल से शुरू होगी. जनता महाविद्यालय, वरोरा नाका, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह से वापस वरोरा नाका से जिला क्रीड़ा संकुल पहुंचेगी. जिले के नागरिक, विद्यार्थी, युवक व खिलाड़ियों को बड़ी संख्या में शामिल होने की अपील जिला खेल अधिकारी अनंत बोबडे ने की है

बुधवार, सप्टेंबर २६, २०१८

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक


१०८० पीओपी मुर्त्यांचे विसर्जन
Image may contain: one or more people, people standing and outdoorचंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही रामाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने विविध भागातून विविध पर्यावरण, सामाजिक संघटनां निर्माल्य गोळा करण्यासाठी सरसावल्या होत्या. गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. या तलावांत ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़
गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते.. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ वाजता शिरविण्यात आली. मनपा स्वच्छता विभागाने रात्री १२ वाजता नंतर स्वच्छतेचे कार्य सुरु केले, अथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले. 
तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता ते कृत्रिम टँकमध्ये करावे, यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत १७ कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले . प्रत्येक तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले कलश निर्माल्याने भरले की लगेच महापालिकेतर्फे खाली केले जात होते.शहरातील मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी रामाळा तलाव येथे परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपुरात मागील वर्षीच्या तुलनेत प्रदूषणमुक्त विसर्जन पार पडल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 
Image may contain: night and outdoor
महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत ७७८५ मातीच्या मूर्ती व १०८० पीओपी अशा एकूण ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सगळ्या लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा कर्मचारी प्रयत्नशील होते, या कामात एस.पी. महाविद्यालय चंद्रपूरच्या ग्रीन थिंकर्स सोसायटी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावातच गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा तसेच निर्माल्य कलशातच टाकण्याचा आग्रह स्वयंसेवक करीत होते. नागरिकांनाही त्यास प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव विसर्जनास हातभार लावला. याद्वारे बहुतांश मूर्तींचे विसर्जन रामाळा तलाव , गांधी चौक , शिवाजी चौक , दाताळा रोड इरई नदी , पं. दीनदयाळ उपाध्याय तुकूम प्रा. शाळा, झोन क्र. ३ कार्यालय, नेताजी चौक बाबुपेठ, बंगाली कॅम्प झोन ऑफिस, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड , शिवाजी चौक, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड, नटराज टॉकीज ताडोबा रोड, इत्यादी ठिकाणच्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या भाविकांना व गणेश मंडळांना प्रमाणपत्रे देऊन महानगरपालिकेने त्यांचा गौरव केला
याप्रसंगी आयुक्त श्री. संजय काकडे तसेच पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराज राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नायक सीसीटीव्ही च्या माध्यमातून मोबाईलद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे. उपायुक्त श्री. गजानन बोकडे. श्री. गोस्वामी, सहायक आयुक्त श्री. विजय देवळीकर, धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता श्री. नितीन कापसे विसर्जन सुरळीतपणे पार पडण्यास प्रयत्नशील होते. 
Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor




शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८

 चंद्रपूर पोलिसांकडून १४ दारू तस्करांना हद्दपार करण्याचे आदेश

चंद्रपूर पोलिसांकडून १४ दारू तस्करांना हद्दपार करण्याचे आदेश

Image result for हद्दपार आरोपीचंद्रपूर/प्रतिनिधी:
गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ जणांना आरोपींना जिल्ह्यातून  हद्दपार करण्याचे आदेश   दिले आहे. 
चंद्रपूर पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी चंद्रपूर यांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 
  कलम 56, ५७ मुंबई पोलीस कायदा अन्वये हे आदेश पारीत करण्यात आले आहे. 
गणेशोत्सव कालावधीत अवैध दारूची विक्री होऊ नये, याकरीता गणेश विसर्जनापासून पुढील सहा महिने व तीन महिने कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 
यात दिपक उर्फ रिंकु कोमल चव्हाण वय 19 वर्ष रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारशाह यास दि. 07/12/17 अन्वये 01 वर्षकरीता हददपार,
 पोलीस स्टेषन गोंडपिंपरी येथील काशीनाथ सदाशीव पोटे वय 32 वर्ष रा.मक्ता ता गोंडपिंपरी जि. चंद्रपुर यास दि. 12/04/18 अन्वये 06 महिने करीता,
गोंडपिंपरी लगतचे 06 तालुक्यातुन हद्दपार,पोलीस स्टेशन चिमुर होमराज मारोती गोसवाडे वय 27 वर्ष रा. मालेवाडा ता. चिमुर जि. चंद्रपुर यास दि. 16/05/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
 पोलीस स्टेशन सावली येथील श्रीनिवास रामदास पुल्लुरवार वय 42 वर्ष रा. लोंढोली ता. सावली जि. चंद्रपुर यास दि. 14/08/18 अन्वये ०३ महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील गौतम तुळशीराम लोणारे वय 32 वर्ष रा. नलेस्वर मोहाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर यास दि. 23/08/18 अन्वये 04 महिने करीता हददपार, 
 पोलीस स्टेशन चिमुर प्रशांत जनार्दन शामकुळे वय 34  वर्ष रा. खडसंगी ता. चिमुर जि. चंद्रपुर यास दि. 06/09/18 अन्वये 04 महिने करीता हददपार, 
 पोलीस स्टेशन बल्लारशाह अब्दुल रशीद अब्दुल गफ्फार कुरेशी वय ४३ वर्ष रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारशाह यास दि. 06/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील आवेश शब्बीर कुरेशी वय 32 वर्ष रा. भंगाराम भिवापुर वार्ड चंद्रपुर यास दि. 15/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अनिल रामचंद्र जाफराबादी वय 35 वर्ष रा. गोपालपुरी वार्ड चंद्रपूर यास दि. 15/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार, 
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर कुणाल यशवंत गर्गेलवार वय रा. विट्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर यास दि. 14/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर छोटु उर्फ नितीन शंकर गोवर्धन वय 35 वर्ष रा. महात्मा फुले चौक बाबुपेठ वार्ड चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोस्टे चंद्रपुर शहर लव नरसिंग रेड्डी रा. अश्टभुजा वार्ड वय 25 वर्ष चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 03 महिने  करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर शुभम अमर समुद रा. पंचशील चौक घुटकाला वार्ड चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार, 
पोलीस स्टेशन रामनगर येथील यावर अली शेरू अली वय 26 वर्ष रा. जलनगर वार्ड चंद्रपूर दि. 17/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांचे मार्ग मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री. सुधाकर अंभोरे,पोनि श्री. गोपाल भारती यांनी केली.
 



रविवार, ऑगस्ट ०५, २०१८

चंद्रपुरात उड्डाण पुलाच्या खड्ड्यात पडला १२ वर्षीय मुलगा

चंद्रपुरात उड्डाण पुलाच्या खड्ड्यात पडला १२ वर्षीय मुलगा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. कंत्राटदाराने पिल्लरसाठी खड्डे खोदले़ मात्र या खड्ड्यांभोवती सुरक्षेकरिता कठडे लावले नाही. दिशादर्शक फलक व पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था देखील न केल्याने याच परिसरातील श्रुक्र्वारी एका १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला असता,
शुक्रवारी रात्री ९ वाजता आपल्याच आनंदात रस्त्याने जात असलेल्या  प्रित पाटील नामक मुलगा अचानक खड्ड्यात पडल्याने त्यातील चिखलात फसला़ याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना हे दृश्य दिप्रित सताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बालकाला सुरक्षित बाहेर काढून माणुसकीचा प्रत्यय दिला़.हा खड्डा प्रित यांच्या उंची पेक्षा मोठा हों व त्यात मोठ्या प्रमाणत चिखल साचले होते.या चिखलात तो मानेपरीयंत फसला,त्याला खड्ड्याचा अंदाज न आल्याने पिल्लरच्या तो खड्ड्यात पडला. ही घटना नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रसंगावधान दाखवून बालकाला सुखरूप बाहेर काढले़ कंत्राटदाराच्या चुकीमुळेच ही घटना घडली़ सात दिवसांच्या आत फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी दिला आहे.