Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

घोडाझरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घोडाझरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जानेवारी ३१, २०१८

चंद्रपुरातील ‘घोडाझरी’ अभयारण्याच्या निर्मितीला शासनाची मंजुरी

चंद्रपुरातील ‘घोडाझरी’ अभयारण्याच्या निर्मितीला शासनाची मंजुरी

चंद्रपूर/प्रतिनिधी:                                     
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत या अभयारण्याच्या निर्मितीस परवानगी देण्यात आली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरही उपस्थित होते.
ब्रम्हपुरी वन विभागातील एकूण 159.5832 चौ.कि.मी क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ट होणार असून या क्षेत्रामध्ये वन विभागातील नागभीड, तळोधी व चिमूर वन परिक्षेत्रातील पहाडी जमीनीचे आणि घोडाझरी तलावालगतचे वनक्षेत्र आहे.

या क्षेत्रामध्ये सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान- धबधबा असून प्रस्तावित अभयारण्याच्या पूर्व भागास नागपूर ते चंद्रपूर रोड आहे. या वनक्षेत्रात पहाडी भाग मोठ्याप्रमाणात असून वन्यजीवांच्या अधिवासासाठी हा भाग अतिशय उपयुक्त आहे.या वनक्षेत्रात 10 ते 15 वाघ, 23 बिबटे यासह रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, कोल्हे, रानडुक्कर, माकड आणि ससे यासारखे वन्यजीव वास्तव्यास आहेत. या अभयारण्याच्या निर्मितीमुळे आजुबाजूच्या 59 गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल.

घोडाझरी हे राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या आज बुधवारी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तबकरण्यात आला.
पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा घोडाझरी हा महत्त्वाचा कॉरिडोर आहे. घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारे आहे. नागपूरपासून १०३ किमी अंतरावर घोडाझरी असून याबाबतचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून राज्य शासनाला केला होता .

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह ५४ अभयारण्य असून राज्यातील घोडाझरी हे ५५ वे अभयारण्य ठरणार आहे. १६० चौ. किमीचे ब्रह्मपुरी वनविभागातील नवे अभयारण्य अस्तित्वात येणार असल्याची शक्यता आहे. मागील वर्षी येथे जंगल सफारी सुरू करण्यात आली. मात्र, त्यास हवा तसा खास प्रतिसाद मिळालेला नाही. आता मात्र, या अभयारण्याच्या रूपाने इको टुरिझमला बुस्टर मिळणार आहे.एकाच दिवशी होणाऱ्या जंगलभ्रमंतीत जंगली पशुपक्ष्यांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येईल,अशी माहिती सूत्राने दिली.

दोन गावांचे पुनर्वसन
या अभयारण्यात कोरंबी व घोडाझरी ही दोन गावे येतात. या दोन्ही गावांचे पुनर्वसन होणार असल्याची शक्यता आहे. तशा मौखिक सूचना वन विभागाकडून तेथील सरपंचांना दिल्या असून ठराव मागितले आहे. पर्यटकांना या अभयारण्यात हिरापूर येथील महापाषाणयुगीन मांडव गोटा व डोंगरगाव येथील खडक चित्रे यांचा समावेश केला जाणार आहे.Image result for घोडाझरी
चंद्रपुरातील ‘घोडाझरी’ अभयारण्याच्या निर्मितीस मंजुरी

गुरुवार, जानेवारी २५, २०१८

आता चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरीचे जंगल होणार नवे अभयारण्य

आता चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरीचे जंगल होणार नवे अभयारण्य

ghodazari nagbhid साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी: 
ब्रह्मपुरी  वनविभागातील प्रस्तावित घोडाझरी जंगल हे आता नवे अभयारण्य म्हणून उदयास येणार आहे. राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा घोडाझरी हा महत्त्वाचा कॉरिडोर आहे. घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारे आहे. नागपूरपासून १०३ किमी अंतरावर घोडाझरी असून याबाबतचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून राज्य शासनाला गेला आहे. येत्या ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह ५४ अभयारण्य असून राज्यातील घोडाझरी हे ५५ वे अभयारण्य ठरणार आहे. १६० चौ. किमीचे ब्रह्मपुरी वनविभागातील नवे अभयारण्य अस्तित्वात येणार असल्याची शक्यता आहे. मागील वर्षी येथे जंगल सफारी सुरू करण्यात आली. मात्र, त्यास हवा तसा खास प्रतिसाद मिळालेला नाही. आता मात्र, या अभयारण्याच्या रूपाने इको टुरिझमला बुस्टर मिळणार आहे.एकाच दिवशी होणाऱ्या जंगलभ्रमंतीत जंगली पशुपक्ष्यांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येईल,अशी माहिती सूत्राने दिली.
दोन गावांचे पुनर्वसन
या अभयारण्यात कोरंबी व घोडाझरी ही दोन गावे येतात. या दोन्ही गावांचे पुनर्वसन होणार असल्याची शक्यता आहे. तशा मौखिक सूचना वन विभागाकडून तेथील सरपंचांना दिल्या असून ठराव मागितले आहे. पर्यटकांना या अभयारण्यात हिरापूर येथील महापाषाणयुगीन मांडव गोटा व डोंगरगाव येथील खडक चित्रे यांचा समावेश केला जाणार आहे. 

ghodazari साठी इमेज परिणाम