Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

घरफोड्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घरफोड्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जानेवारी २५, २०१८

चंद्रपुरात ऐशो आरामासाठी घरफोडी करणारी बंटी-बबली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपुरात ऐशो आरामासाठी घरफोडी करणारी बंटी-बबली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
ऐशो आराम व महागड्या वस्तू विकत घेण्यासाठी तसेच आपली हौस भागविण्यासाठी रात्रीच्या वेळेस घरफोड्या करणाऱ्या बंटी-बबली टोळी चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. गुरुवारी पोलिसांनी या टोळीतील २ आरोपींना अटक केली आहे. चंद्रपूर  गुन्हेशाखेच्या पथकाला रात्रीच्यावेळी हि टोळी संशयित रित्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.  त्या आधारे आरोपी आरिफ कलंदर शेख वय १९ वर्षे राहणार घूटकाळा तलाव . आरोपी चेतन भोजराज पोटदुखे वय १९ वर्षे राहणार बालाजी मंदिर बाबुपेठ सवारी बंगला  चंद्रपूर तसेच नेहा उर्फ भारती राबर्ट खैरे राहणार भिवापूर वार्ड नूरानी मज्जित असे या आरोपींचे नाव आहे यातील महिला आरोपी हि सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

बुधवारी रात्री आरोपी आरिफ कलंदर शेख वय १९ वर्षे राहणार घूटकाळा तलाव .चेतन भोजराज पोटदुखे वय १९ वर्षे राहणार बालाजी मंदिर बाबुपेठ सवारी बंगला चंद्रपूर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते कोणताही कामधंदा न करता ऐशो आराम व महागड्या वस्तू विकत घेण्यासाठी तसेच आपली हौस भागविण्यासाठी रात्रीच्या वेळेस घरफोड्या करतात यात यांच्या कडून या आधी देखील १०.०१.२०१८ ते ११.०१.२०१८ च्या मध्यरात्री का ठिकाणी झालेल्या घरफोडीत सोन्याचांदीचे दागिने चोरीला गेले आहेत यात या टोळीचा देखील सहभाग होता असल्याचे तपासात पुढे आले आहे, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी आरिफ कलंदर शेख  याच्या कडून २५००० नगदी तर आरोपी चेतन भोजराज पोटदुखे यांच्या कडून ५००० रुपये नगदी पोलिसांनी अश्या प्रकारे एकूण ३०००० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे . हे आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटका होताच आणखी अश्याच प्रकारच्या चोऱ्या करत असल्याचे सांगण्यात येत आहे, 
सदरची कारवाई नियती ठाकर  पोलीस अधिक्षक चंद्रपूर, हेमराजसिंग राजपुत अप्पर पोलीस अधिक्षण यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके ,पोलीस कर्मचारी दौलत चालखुरे, पद्माकर भोयर ,महेंद्र भुजाडे,कुंदन बावरी,प्रांजळ झिलपे आदीनी पार पाडली.