Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, सप्टेंबर १३, २०२०

इराणचा पैलवान नाविदला फाशी,तर दोन भावानां तुरुंगवासाची शिक्षा

इराणचा पैलवान नाविदला फाशी,तर दोन भावानां तुरुंगवासाची शिक्षा

📢. इराणचा पैलवान नाविदला फाशी,तर दोन भावानां तुरुंगवासाची शिक्षा
◈ ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━ ◈
  जागतिक स्तरावर जोरदार निषेध
◈ ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━ ◈
इराण :: इराणचा प्रसिध्द पैलवान नाविदला इराण सरकारने फाशीची शिक्षा दिली.
२७ वर्षीय कुस्तीपटू नाविदला सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्याला ही शिक्षा दिली.इराण मधल्या शिराज येथे त्याला फासावर लटकवले गेले, तर त्यांचे भाऊ वाहिद आणि हबीब यांना ५४ आणि २७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गुन्हा कबूल करण्या साठी नाविद यांच्यावर तुरुंगात अमानुष अत्याचार करण्यात आले होते.
इराणी सरकारच्या या कृत्याचा जागतिक स्तरावर जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे.

कुस्तीपटू नाविद अफकारी शिराज येथे दोन वर्षांपूर्वी सरकारविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता. शिराजमध्ये झालेल्या आंदोलनात सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्याखाली नाविद यांना शिक्षा ठोठावण्यात आली. गुन्हा कबूल करण्यासाठी नाविद यांच्यावर तुरुंगात अमानुष अत्याचार करण्यात आले. नाविदची सुटका करावी असे आवाहन खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. नाविदची सुटका केल्यास मी इराण सरकारचा कृतज्ञ राहीन असे ट्रम्प म्हणाले होते. त्यांच्या या आवाहनाकडेही इराणने दुर्लक्ष केले.

दरम्यान, जगभरातील क्रीडापटूंनी नाविदला फाशी न देण्याची विनंती करुनही इराण सरकारने याकडे दुर्लक्ष केले. फ्री-स्टाईल, ग्रिको-रोमन कुस्तीत नाविदने अनेक पदके जिंकली होती.
फ्रीस्टाइल आणि ग्रोको-रोमन कुस्तीपटू असलेल्या २७ वर्षीय नाविदने देशात आणि विदेशातील स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली होती.व इराणला अनेक पदके मिऌवुन दिली होती.


◈ ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━ ◈