Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आदिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आदिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

 आदिम समाजाचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

आदिम समाजाचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन शनिवारी आदिम समाजाचा मोर्चा चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़कला. राष्ट्रीय आदिम कृति समिति द्वारा मध्य नागपुरचे आमदार विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजताच्या सुमारास गिरनार चौकातुन निघालेला हा मोर्चा शासनाविरोधी नारेबाजी करत शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालवर जाऊन धड़कला.  

  शासन नियम व वेळोवेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र परिपत्रकानुसार कोष्टी हा व्यवसाय आहे. त्यामुळे कोष्टी या नावाखाली हलबा हलबीचे वैधता प्रमाणपत्र न नकारता ते देण्यात यावे,  गोवरी,हलबा,माना, व इतर अन्याग्रस्त जमतींना सुलभतेने प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे,  सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 च्या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहे. त्यामुळे या निर्णयाचा आधार घेऊन कोणत्याही कर्मच्याऱ्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये या मागण्यांसह ईतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.  या दरम्यान मोर्च्यात दाखल झालेल्या सहभाग्यानी  महानगर पालिका समोरिल महात्मा गांधी यांच्या पूतळयाला  पुष्पमार्लपन करून अभिवादन केले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचाच शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.या मोर्च्यात हजारो समाज बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या.