Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आत्महत्या.सिरोंचा.गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्महत्या.सिरोंचा.गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, एप्रिल ०५, २०२०

गडचिरोलीच्या समिधा राऊतचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

गडचिरोलीच्या समिधा राऊतचा पुण्यात संशयास्पद मृत्यू



■ समिधा राऊत पुणे येथे मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत होती.

■समिधाच्या मृत्यू बद्दल शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

Gadchiroli Frist News | तिरुपती चिटयाला




 
गडचिरोली, ता..२ : पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेली विद्याथिनी समिधा कालीदास राऊत (२०) ही  काल(ता.१) च्या रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
समिधा ही गडचिरोली येथील मूळ रहिवासी असून, हिवताप विभागात कार्यरत कालीदास राऊत यांची कन्या, तर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांची पुतणी आहे. ती पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत होती. सिम्बॉयसिस गर्ल्स होस्टेल, विमाननगर, पुणे येथील रोहिल मिथील इमारतीच्या खोलीत ती राहत होती. १ एप्रिलच्या रात्री दैनंदिन हजेरीच्या वेळी समिधा उपस्थित न झाल्याने व तिच्या खोलीचे दार बंद असल्याने वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने बालकनीच्या बाजूला असलेल्या पॅनलमधून खोलीत प्रवेश केला. तेव्हा समिधा खोलीतील पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिला खाली उतरविले. त्यानंतर  डॉक्टर व पोलिसांना पाचारण केले; तेव्हा तिचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी समिधाचा मृतदेह  ताब्यात घेऊन पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. समिधा राऊत ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिचा मृत्युबद्दल शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असून, मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेणे अपरिहार्य झाले आहे. आज पहाटे समिधाचे कुटुंबीय पुण्याला रवाना झाले. उद्या(ता.३) संध्याकाळपर्यंत ते समिधाचा मृतदेह घेऊन गडचिरोलीत पोहचतील,असे त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले.