Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २४, २०२३

फोनपे स्मार्ट स्पीकरवर आता मराठी भाषेत मिळेल पेमेंटची सूचना



मुंबई : फोनपे स्मार्ट स्पीकर लवकरच पेमेंटची आवाजातील सूचना मराठी भाषेत लाँच करणार आहे. पेमेंटच्या आवाजातील सूचनेसाठी मराठी भाषा जोडण्याशिवाय, राज्यातील व्यापारी आता त्यांच्या पसंतीच्या भाषेत फोनपे फॉर बिझनेस ॲपमध्ये फोनपे स्मार्ट स्पीकर ॲक्सेस करू शकतात.
Payment notification will now be available in Marathi language on PhonePay smart speakers 

व्यापारी लगेच मराठी भाषेत ग्राहकाचे पेमेंट प्रमाणित करू शकतात, तसेच त्यांना गर्दीच्या वेळी ग्राहकांनी केलेले पेमेंट तपासण्यासाठी ग्राहकांच्या फोनचे स्क्रीन पाहाण्याची गरज नाही तसेच बँकेकडून पेमेंटच्या पुष्टीकरणाचा एसएमएस ची प्रतीक्षा करायला लागणार नाही.

सध्या 19,000 पिनकोडवर (जे देशाचा 90% पेक्षा जास्त प्रदेश कव्हर करते) व्यापारी भागीदारांद्वारे फोनपे स्मार्ट स्पीकरचा वापर केला जातो आहे. कंपनीने गेल्या वर्षी दुकानात ग्राहकांनी केलेल्या पेमेंटला ट्रॅक करण्यासाठी विश्वसनीय आणि सुलभ उपाय म्हणून स्मार्ट स्पीकर लाँच केले होते. काही वैशिष्ट्ये जे फोनपे स्मार्ट स्पीकरला बाजारात इतर उत्पादनांपेक्षा वेगळे ठरवते त्यात समावेश आहे, त्याची पोर्टेबिलिटी, श्रेणीतील सर्वोत्तम बॅटरी, सर्वात जास्त गोंगाटाच्या ठिकाणीसुद्धा आवाजातील उत्तम स्पष्टता, आणि त्याचे कॉम्पॅक्ट आणि सुटसुटीत स्वरूप ज्यामुळे व्यापारी स्पीकरला दाटीवाटीच्या ठिकाणी कुठेही अगदी छोट्याशा जागी सुद्धा ठेवून वापरू शकतात. याआधी फिचर फोन वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना पेमेंटच्या पुष्टीसाठी मोबाइलवर येणाऱ्या एसएमएसवर अवलंबून राहवे लागे, पण आता फोनपे स्मार्ट स्पीकरसह, त्यांचा पेमेंट प्रमाणीकरणाचा अनुभव लक्षणीयरित्या सोपा झाला आहे. फोनपे स्मार्ट स्पीकर 4 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी लाइफ, डेटा कनेक्टिव्हिटी, वापरण्यातील सुलभतेकरिता बॅटरी लेव्हलसाठी वेगळ्याने एलइडी इंटिकेटर, बॅटरीची लेव्हल कमी झाल्यास आवाजात सूचना आणि अंतिम व्यवहार पुन्हा ऐकण्यासाठी रिप्ले बटन यासह येते.    


अल्पावधीतच, डिव्हाइसच्या कार्यप्रदर्शनाबाबत व्यापाऱ्यांकडून फोनपेला अभूतपूर्व अभिप्राय प्राप्त झालेत. त्याचा परिणाम म्हणून, शहरी आणि ग्रामीण बाजारात नवीन व्यापारी भागीदारांमध्ये स्मार्ट स्पीकरसाठीच्या मागणीत वाढ झाली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.