Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०३, २०२३

दिवसभरातील ठळक बातम्या | Marathi News 3 May 2023


महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
राज्यातील रस्त्यांच्या गुणवत्ता पूर्ण वेगवान देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या महामंडळाचा भाग भांडवल 100 कोटी रुपये राहणार असून, 51 टक्क्यांचा शासन हिस्सा टप्प्याटप्प्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.  राज्यातील तीन लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी एक लाख किलोमीटरचे प्रमुख राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. या रस्त्यांची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करावी लागते. त्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात येत आहे. 

तांदळवाडी आणि सागरी जैवविविधतेच्या प्रदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 
 कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशातील विद्यापीठांमध्ये जाऊन संशोधन करण्यासाठी 75 मुलांना तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय ही काल मंत्री मंडळांना घेतला. या अंतर्गत दरवर्षी 25 मुला मुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल वनविभागाच्या कांदळवन सागरी जैव विविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यात येईल त्यामध्ये 30 टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल.  

 आयसीटीवर आधारित प्रकल्प राबवण्याचा निर्णय
राज्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानावर म्हणजेच आयसीटीवर आधारित प्रकल्प राबवण्याचा निर्णय ही राज्य मंत्रिमंडळांना घेतला या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाविद्यानातून 100% अर्थसाह्य देण्यात येईल शहरांमधील घनकचऱ्याचा संकलन वर्गीकरण आणि वाहतुकीवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे या सर्व प्रक्रियेच्या प्रभावी नियंत्रणासाठी आयसीटीवर आधारित प्रणालीचा वापर आवश्यक आहे.  त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आणि घनकचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस आधारित निगराणी ठेवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतला आहे.   कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर उदगाव 350 खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय ही काल झालेल्या मंत्रिमंडळ पैसे घेण्यात आला. 

ॲनिमेशनचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होणार असल्याची केंद्रीय माहिती प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांची माहिती 

ॲनिमेशन व ग्राफिक्स या क्षेत्रात भारताकडे मोठी क्षमता आहे. या संदर्भात राष्ट्रीय धोरण तयार केल्यामुळे भारत या उद्योगात जागतिक नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी काल मुंबईत सांगितलं. 

मुंबईत आयोजित 23 उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ओळख व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात ॲनिमेशन आणि ग्राफिक्स समावेश करण्यात येणार आहे.  या संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अपूर्व चंद्र यांनी दिली.  त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा राज्याचे कौतुक केलं केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमे अंतर्गत एक महत्त्वाचं उपक्रम राबवणार आहे. या चित्रपट रसिक आणि सर्वसामान्य नागरिक त्यांच्या आवडीच्या चित्रपटांचं करण्यासाठी निधी देऊ शकतात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी कालही घोषणा केली. 

मुंबईत आयोजित फीकी फ्रेंड्स कार्यक्रमाचे बोलत होते.  सरकार लवकरच अशा प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  मनोरंजन क्षेत्राच्या बाजारपेठेत प्रदर्शनासाठी संधी न मिळणाऱ्या चित्रपटांना प्रदर्शित करण्यासाठी एनएफटीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचं स्वतःचं ओटीपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही मानस आहे त्यामुळे तरुण प्रतिभावंतांना त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळेल असेही चंद्रा यांनी सांगितलं. 


मनोरंजनाच्या बाजारपेठेत दर्जेदार आशियाला महत्त्वपूर्ण स्थान : प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव दिवेदी यांचा प्रतिपादन 
 चांगले आणि दर्जेदार कार्यक्रम हे मनोरंजनाच्या बाजारपेठेत महत्त्वाचे ठरतात त्यामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात अवघड राहण्यासाठी चांगल्या आश्रयघन कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रसारण गरजेच असल्याचे प्रतिपादन प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी केलं. मुंबईत आयोजित यांच्या कार्यक्रमाचे काल बोलत होते. 

आगामी काळात दूरदर्शन देखील नव्या संकल्पना घेऊन येत आहे याचे दृश्य परिणाम येत्या काही महिन्यात पाहायला मिळतील असेही ते म्हणाले प्रसारणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माध्यमांना बळकटी देणारा ठरेल निर्मिती संस्थांनी दूरचित्रवाणी मर्यादित प्रसाराचा विचार न करता चांगली आशय निर्मिती करून विविध उपलब्ध माध्यमांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यावर द्यावा असेही ते म्हणाले.  

 पौष्टिक तृणधान्यांचा समावेश 
गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या कर्मचाऱ्यांच्या घोषणांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानुसार संबंधित दलांशी केलेल्या सखोल चर्चेनंतर या कर्मचाऱ्यांच्या जीवनात 30 टक्के तृणधान्य वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या दृष्टीने केंद्रीय पोलीस कल्याण भांडाराच्या परिसरातल्या किराणा दुकानांसह शिधावाटप केंद्रांमध्येही तृणधान्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं गृहमंत्रालयाने म्हटला आहे  


राजीनामा आपण दिलेला नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आपण दिलेला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामाची घोषणा केली.  जयंत पाटील यांनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या. पण जयंत पाटील यांनी आपल्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं त्यांच्या कार्यालयाने कळवलाय.  शरद पवार यांच्या धक्कादायक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत असल्यास राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं.


पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

राज्यातील रस्त्यांच्या गुणवत्ता पूर्ण वेगवान देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र (maharashtra) राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राज्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबवण्याचा निर्णय देखील घेतला आहे. 


 मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी पडताळून पाहण्याची परवानगी

भारतीय ओळखपत्र प्राधिकरणाने (Aadhar UID )नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांक बरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला आहे हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आला आहे त्यामुळे हा निर्णय घेतला. 



अशी आहे योजना;  शेतक-यांना आता दिवसाही मिळणार वीज |  mukhyamantri saur krishi vahini yojana

प्रचारादरम्यान काळजी घेण्याची सूचना
निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना आणि पक्षांच्या प्रचार करणाऱ्यांना प्रचारादरम्यान काळजी घेण्याची आपल्या वक्तव्यांमध्ये संयम बाळगण्याची आणि निवडणुकीचे वातावरण न बिघडण्याची सूचना केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने नियमावली जारी केली आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यात ही सूचना करण्यात आली. 

इथेनॉल क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ 
भारताच्या इथेनॉल क्षेत्रामध्ये झालेली प्रचंड वाढ असून जगासाठी ते एक उदाहरण ठरलं असल्याचे केंद्रीय वाणीच्या आणि उद्योगमंत्री पियुष यांनी म्हटलं या विषयावरील राष्ट्रीय परिसरात काल नवी दिल्ली हंगामासाठी शेतकऱ्यांना त्यांचे 99.9% पर्यंत पैसे देण्यात आले आहे. 

जुगार खेळांमुळे लहान मुलांना धोका 
Juggar खेळांच्या सार्वजनिक जाहिरातींना आळा घालण्यासाठी योग्य कारवाई करण्याचा आवाहन केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केला आहे.  माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिलेले आहे.  जुगार आणि पैज विषय खेळांमुळे विशेषतः तरुण आणि लहान मुलांना आर्थिक आणि सामाजिक धोका असल्यामुळे देशाच्या बहुतांश भागात जुगार अवैध आहे.  

राष्ट्रीय संरक्षण दलाला म्हणजे एम एन डी एफ ला एक जलदग्रस्त जहाज आणि एक विमान वाहून लढाऊ देखरेख करू शकणाऱ्या जलदग्रस्त जहाजाला दाखल करून घेतलं असून त्याला पुरावी असं नाव देण्यात आले.  

ऑस्ट्रेलियाला मागत टाकून पहिला क्रमांक 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजे आयसीसीच्या मानांकरात भारताच्या कसोटी क्रिकेट संघांना ऑस्ट्रेलियाला मागत टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे पुढच्या महिन्यात आयसीसी विश्वकर्मा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने केलेली कामगिरी महत्त्वाची मानली जाते आहे. 

ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुनिधी देव (suniti deo) यांचे काल रात्री आजारपणामुळे नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं.  त्या 71 वर्षांच्या होत्या.  डॉक्टर देव यांच्या नागपूरच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय वावर होता. नागपूर शहरातील वाहतूक नियंत्रणा बाबत काम करणाऱ्या जनआक्रोश संघटनेच्या त्या सदस्य होत्या. याशिवाय आजच्या सुधारक या नियतकालिकाच्या संपादक मंडळातही त्या होत्या. 

 विजांच्या कडकडाटसह वादळाची शक्यता
आगामी काही तसाच चंद्रपूर वर्धा नागपूर आणि यवतमाळ मध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह वादळाची शक्यता आहे.  दरम्यान विदर्भातील नागपूर भंडारा वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो . 

विदर्भात (Vidarbha) अनेक ठिकाणी वादळी वारे सोसायट्याचा वारा गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यांना व्यक्त केली आहे. आगामी काही तासात विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यांना व्यक्त केला. 


 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.