चंद्रपूर | जिल्ह्यातील सावली तालुक्यातील विरखल या गावी अंगणात खाटेवर झोपलेल्या एका 53 वर्षीय महिलेवर वन्यप्राण्याने (Tiger Leopard Attack Women ) हल्ला करून ठार केले. मंदा एकनाथ सिडाम (manda eknath Sidam) असे मृत्तक महिलेचे नाव आहे.
अंगणात झोपलेल्या महिलेला वाघाने उचललं अन्...
चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील सावली तालुक्यातील विरखल या गावातील 53 वर्षीय महिला मंदा एकनाथ सिडाम ही सोमवारी रात्री स्वतःचे घराच्या अंगणात झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास वाघ किंवा बिबट्याने (Tiger Leopard Attack Women ) गावात प्रवेश करून अंगणात झोपलेल्या वृद्ध महिलेवर हल्ला केला आणि जागीच ठार केले. हल्ला केल्यानंतर महिलेने प्रचंड आरडाओरड केली,त्यामुळे शेजारील नागरिक धावून आले. सदर घटनेची माहिती सावलीचे वन विभागाता माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंरत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. Manda Sidam