कारंजात पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती
आठवड्यात एकदाच येते नळाला पाणी
पाणीप्रश्न कधी सुटणार तरी कधी?
विकासाच्या नावावर करोडो निधी, मात्र पाणी प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी गप्प का?सत्ताधारी आणि विरोधी पक्ष याला जबाबदार नागरिकांचा आरोप
कारंजा घाडगे :-
चार वर्षाच्या अथक प्रयत्नाने शहरातील पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळविण्यात यश आले असे नगरपंचायतने मोठा वाजा गाजा केला. मागील पाच वर्षात प्रथमच 2015 नगरपंचायत मध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती 2015 पासून कार्यरत असलेले सर्व नगरसेवकांनी विकासाचे ध्येय स्वीकारून बरीच विकासात्मक कामे शहरात केली.
असे म्हटले जाते तसेच शहरात असलेली मुख्य समस्या म्हणजे पाणी टंचाई, पाण्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे पाणी प्रश्न सोडविणे हे एक ध्येय.. म्हणून 2017- 18 मध्ये कारंजा शहरातील पाणीपुरवठा डीपीआर तयार करण्याकरिता एडीसी नागपूर या कंपनीला दिला होता. पण दोन वर्षात कारंजा शहरात आवश्यक पाणीपुरवठा डीपीआर तयार करून दिला परंतु मागील दोन वर्षात वैश्विक महामारी कोरोना सारख्या रोग असल्यामुळे व एक वर्ष प्रशासक असल्यामुळे त्याचा पाठपुरावा होऊ शकला नाही.
फाईल फोटो,गुगल |
परंतु जनतेने पुन्हा विश्वास ठेवून नगरपंचायत मधे काँग्रेसला संधी दिल्यास नगरसेवक हे माननीय सुनील बाबू केदार पालकमंत्री व अमरभाऊ काळे यांच्याशी सतत संपर्क साधत व नगरपंचायत चे काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवक तसेच कर्मचारी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर येथे वारंवार पाठपुरावा करीत होते पाणी पुरवठा योजनेच्या सतत पाठपुराव्यानंतर अंतिम टप्प्यात असलेल्या 20 करोड दोन लक्ष पाणीपुरवठा विभागाला तांत्रिक तांत्रिक मंजुरी हा पहिला टप्पा मंजूर झाला असे त्यावेळी सांगितले होते पाणीपुरवठ्याची फाईल ही शासन दरबारी मुंबई येथे गेली असून लवकरच या पाणीपुरवठा योजनेला निधी उपलब्ध केला जाईल असे आश्वासित केले होते.
या नळ योजनेचा 14 कोटीचा प्रस्ताव 22 कोटी वर गेल्यानंतर आता पुन्हा सुधारित तोच प्रस्ताव शासनाने अमृत पेजल दोन या योजनेअंतर्गत मागितला या प्रस्तावाची किंमत 33 कोटी 86 लाख इतकी आहे या प्रस्तावाला 9 डिसेंबर 2022 रोजी तांत्रिक मंजुरी मिळाली असे म्हटले जाते सदर प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असूनही कारंजाच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष
कारंजा शहराचा पाणी प्रश्न हा गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे कारंजा ग्रामपंचायत यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आली एकमुखी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली पुन्हा नगरपंचायत वर काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले परंतु काँग्रेसचे वर्धा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार होते त्यानी सुद्धा कारंजा चा पाणी प्रश्न हा सोडण्यास त्यावेळी नगरपंचायत ला अपयश आले यावेळी तर कारंजाची पाणी समस्या अत्यंत गंभीर बनलेली आहे याकडे कोणत्याच राजकीय पक्षाचे लक्ष दिसून येत नाही
भाजप शिवसेना सरकार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार ला पायउतार व्हावे लागले त्याचप्रमाणे कारंजा नगरपंचायत मध्ये भाजपा विरोधी पक्षामध्ये असून गेल्या नऊ महिन्यापासून महाराष्ट्रात सुद्धा भाजप. शिवसेना ची सत्ता अस्तित्वात असून कारंजाच्या पाणी समस्येकडे विद्यमान आमदार दादाराव केचे तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारंजा शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी पुढाकार घेऊन ही योजना लवकरात लवकर मंजूर करून समस्या सोडवावी अशी मागणी जोर धरत आहे.
कारंजा शहरात विकासाचा फार मोठा गाजावाजा होत आहे परंतु शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या झळा पोहोचत आहेे. याकडे मात्र सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष यांना काही देणे घेणे नसल्याचे बोलले जात आहे ग्रामीण भागामध्ये दररोज नारा 22 नळ योजनेचे तालुक्यात चांगल्या प्रमाणे नळ योजनेचे पाणी मिळते.
मात्र कारंजा शहराला सात दिवसात पाणी मिळतं ही शहरासाठी शोकांतिका आहे. याची राजकीय नेत्यांना काहीच देणेघेणे नाही असे बोलले जात आहे.