वैफल्यग्रस्त चंद्रकांत खैरे यांचे आरोप बिनबुडाचे
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा पलटवार
नाव आणि निशाण दोन्ही गमावलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केलेले आरोप वैफल्यग्रस्ततेतून केले असून ही राजकीय अपरिपक्वता आहे, असे आरोप भाजपा कार्यकर्ता अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला आहे. खैरे हे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर (Hansraj Ahir) यांना चंद्रपूर येथे भेटले त्यावेळी यासंदर्भात विचारणा का केली नाही असा सवालदेखील देवराव भोंगळे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रीत करतात असा अजब आरोप खैरे यांनी गडचिरोली येथे केला, तर चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या पराभवाला जबाबदार आहेत असा आरोप केला. हे दोन्ही अजब आरोप मानसिक अस्वस्थतेमुळे केले असून कुठलेही पुरावे न देता असे निराधार आरोप करणे म्हणजे राजकीय शुचिर्भूततेचे अवमुल्यन आह़े अशी टीकादेखील भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली आहे.
देवराव भोंगळे म्हणाले की, Chandrakant khaire खैरे यांच्या पक्षाची झालेली दयनीय अवस्था, त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व निवडणूक आयोगाने मान्य केले नाही त्यामुळे पक्षही गेला आणि चिन्हही गेलं यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे, असे देवराव भोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
आजपर्यंत हंसराज अहिर यांनी सुद्धा अश्या पद्धतीचा आरोप कधीच आपल्या पक्षातील नेत्यांवर केलेला नाही; अशा परिस्थितीत खैरे यांनी चंद्रपुरात येऊन आग लावण्याचे व संभ्रम पसरविण्याचे काम करू नये . सत्ता गेल्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे आणि त्यांच्या तथ्यहीन विधानातून ते स्पष्ट जाणवत आहे,’ अशी खोचक टीका देवराव भोंगळे यांनी केली.
देवराव भोंगळे म्हणाले, चंद्रपूरात खैरे यांची माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री यांची भेट झाली त्यावेळी त्यांनी याविषयी हंसराजजी अहिर यांना यासंदर्भात विचारायला हवे होते, तसे न करता बिनबुडाचे आरोप करणे हे खैरेच्या राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे.चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पक्षात लक्ष घालण्याची गरज असल्याचेही म्हटले. ‘खैरे यांच्या पक्षात सध्या अनागोंदी माजली आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. आधी स्वतः चे आमदार सोडून गेले, नंतर राज्यभरातले पदाधिकारी गेले आणि आता तर कार्यकर्तेही पक्ष सोडून जायला लागले आहेत. कुणीच थांबायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन इतर पक्षांवर पुराव्याविना आरोप करणे थांबवावे आणि स्वतःच्या पक्षात पहिले लक्ष घालावे,’ असेही भोंगळे म्हणाले
आपलं स्वतः चे घर सोडून दुसऱ्याच्या घरात आग लावण्याचे काम त्यांनी थांबवायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.
Chandrapur lok Sabha Maharashtra India member of parliament