चंद्रपूर जिल्ह्यातील छोटा नागपूर ते पडोली चौक राज्य मार्गावरील उपाययोजनाकरीता ५२१.६२ लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
*चंद्रपूर दि.४* : वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यातील छोटा नागपूर ते पडोली चौक राज्य महामार्ग ९३० येथे रस्ता वाहतूक सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना करण्याकरिता ५२१.६२ लक्ष रक्कमेच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. Sudhir Mungantiwar Maharashtra India
या महामार्गाला जवळपासचे अनेक गाव जोडल्या गेलेले आहे त्यामुळे हा अत्यंत वर्दळीचा राज्य महामार्ग असून या महामार्गावर अनेक अपघात झालेले आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वाहतूक सुरक्षा विषयी चिंता व्यक्त केली होती.
यासंदर्भात पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी वाहतूक सुरक्षा उपाययोजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी महाराष्ट्र शासन परिवहन विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. उप परिवहन आयुक्त रस्ता सुरक्षा कक्ष परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र यांनी या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
५२१.६२ लक्ष रक्कमेच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाल्याबद्दल छोटा नागपूर व पडोली चौक या मार्गावरील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
Sudhir Mungantiwar Maharashtra India