चंद्रपूरच्या इरईबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
#चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या #इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ आणि झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीच्या पुनरुज्जीवन आणि खोलीकरणाचे काम यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या पावसाळ्यापूर्वी 50% काम होईल. उर्वरित काम पुढच्या वर्षी करणार अशी घोषणा केली.
#गोसीखुर्द प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यक निधीची तरतूद करुन कालबद्ध पद्धतीने कालवे व वितरण प्रणालीची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री @Dev_Fadnavis यांनी विधानपरिषदेत दिली.
चंद्रपूर: गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत घोडाझरी कालवा: 2006 मध्ये कामे दिली, तेव्हा मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे सर्व निविदा रद्द केल्या, आता नव्याने निविदा दिल्या आहेत. 2024 पर्यंत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
चंद्रपूर शहरातील लालपेठ भागात अस्वली दिसून आली. मागील 2 ते 3 दिवसापासून शहरातील लालपेठ भागात असलेले वेकोलीच्या सबस्टेशनमध्ये रात्रीच्या सुमारास अस्वल मुक्त संचार करीत आहे. विद्युत सब स्टेशन परिसर हा जंगलव्याप्त असल्याने या भागात वन्यप्राणी येत असतात. त्याजागी टिनाचे शेड लावण्यात आले आहेत. मात्र ही अस्वल टिनाचे शेड पाडून मागील 2 दिवसापासून सब स्टेशनच्या आत येत असल्याने भीतीचे वातावरण बसरले आहे.
होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांनी दारू विक्री व मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने देशी व विदेशी दारूच्या 80 पेट्या जप्त केल्यात. एका टेंपोतुन दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. वाहनाची झडती घेतली असता देशी दारूच्या 75 पेटी व विदेशी दारूच्या 45 पेट्या अश्या एकूण 80 पेटी दारू जप्त करण्यात आल्या.