जर आपल्याकडे सॅमसंगचा मोबाईल असेल आणि यूजर एक्सपिरीयन्स चांगला असावा अशी आपली इच्छा आहे तर खालील काही ॲप डाऊनलोड करा ही ॲप्स सॅमसंगने स्वतः गॅलेक्सी मोबाईल साठी तयार केलेली आहेत. यात मी सॅमसंग नोट्स, क्लाऊड, इंटरनेट, व्हाईस रेकॉर्डर इत्यादी प्रिइंस्टॉल्ड ॲप्स बद्दल काही सांगणार नाही. (saimasang mobail ke lie upayogee app kaun se hain?)
1. One Hand Operation
सॅमसंगचे One UI आहे हे एका हाताने मोबाईलचा वापर करावा यासाठी उपयोगी आहे पण जर आपल्याला याचा वापर जास्त चांगला असावा अशी इच्छा असेल तर हे ॲप खूप चांगले आहे तर हे ॲप आपण वापरू शकता. यामुळे आपण मोबाईलमधील बेसिक कामे एका हाताने करू शकता. ही कामे करण्यासाठी छोटी (आपल्याला मोठी पाहिजे असतील तर करू शकता) हॅन्डल असतात. खालील चित्रात लाल रेषेत हॅन्डल दाखवलेले आहे. यात आपण वेगवेगळे सहा हँडल वापरू शकतो (दोन — तीनच वापरा) व खालीलपैकी प्रत्येकी सहा टूल्स वापरू शकतो. यातील Quick Tools खूप उपयोगी पडते.
हे ॲप आपल्याला जास्त पाहिजे तसे कस्टमाइझ करता येते.
2 Samsung Music
Samsung Smart Switch Mobileगुगलने त्यांचे प्ले म्युझिक ॲप जे माझ्या मते सर्वात चांगले म्युझिक प्लेअर ॲप होते ते काढून भंगार युट्युब म्युझिक आणले. जर आपल्याला देखील गुगलचा हा निर्णय आवडला नसेल तर हे खूप चांगले पर्याय आहे.
हे ॲप तसे प्ले म्युझिक सारखेच आहे. फक्त यात स्मार्ट वोल्युम, डार्क मोड इत्यादी जास्त फिचर मिळतात पण प्ले म्युझिक सारखी ऑनलाईन गाणी ऐका मिळत नाहीत. (Spotify सपोर्ट आहे पण Spotify डाउनलोड करावे लागते.)
3 Samsung Video Library
सॅमसंग गॅलरी मध्ये सर्व फोटो व व्हिडीओ एकत्र दाखवले जातात पण जर आपल्याला सर्व व्हिडिओ वेगळे पाहिजे असतील हे आपल्यासाठी चांगले आहे. यामध्ये इन्स्टंट प्लेयर पर्याय आहे त्यामुळे आपण खालीलप्रमाणे छोट्या भागात तसेच पूर्ण स्क्रीन वर व्हिडीओ प्ले करू शकता.
4 Samsung Health
हे ॲप आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी आहे जर आपल्याकडे स्मार्टवॉच नसेल तर हे ॲप उपयोगी पडते यात पेडोमीटर, स्लिप ट्रॅकर, 95 वेगवेगळे व्यायाम प्रकार, Menstrual Cycle इत्यादी प्रकार वापरायला मिळतात. त्यासोबतच याचा डेटा सॅमसंग अकाउंट सोबत सिंकही करता येतो. यातील टुगेदर पेजमुळे आपण आपल्या मित्रांसोबत आव्हाने लावून व्यायाम करू शकतो खालील व्हिडिओमध्ये याची जास्त माहिती आहे.
जर आपल्या मोबाईल मध्ये Knox Security असेल तर ही माहिती आपल्या मोबाईल मधील हार्डवेअर मध्ये सुरक्षित राहते.
5 Good Lock
हे आपल्या मोबाईलच्या कस्टमाइझेशन साठी उपयोगी पडते. हे ॲप घेतल्यानंतर आपल्याला यातील काही छोटी ॲप्स डाऊनलोड करावी लागतील. आपण आपल्या गरजेनुसार कोणते ॲप पाहिजे ते करा
- Task Changer
- Lockstar
- Theme Park
- Quick Star
- Navstar
- Home up
- Multistar
- Notistar
- One Hand Operation+
- Sound Assistant
- Keys Café
- Wonderland
- Edge Lighting plus
- Edge Touch
- Clock Face
- Pentastic
- Nice Catch
यातील प्रत्येक ॲप बद्दल माहिती मी येथे देऊ शकत नाही त्यामुळे खालील व्हिडीओ पहा.
हे ॲप फक्त One UI वर चालणार्या मोबाईल मध्ये चालते त्यामुळे जर आपला मोबाईल M, F आणि J सिरीजचा किंवा A20s च्या खालचा असेल जे One UI Core वर चालतात तर हे ॲप त्यात चालणार नाही.
saimasang mobail ke lie upayogee app kaun se hain?
यासोबत Game Plugin, Samsung Email, Smart Swich, Secure Folder इत्यादी ॲप देखील चांगली आहेत.