*चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करून विकास करा*
*खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी*
*दिल्ली येथे घेतली भेट, लोकसभा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर केली चर्चा*
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य मार्ग म्हणून देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विकासात अनेक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने तातडीने हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात पूर्णता रुपांतरित करून विकास करण्यात यावा, अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी nitin gadkari यांच्याकडे केली आहे.
खासदार बाळू धानोरकर Balu Dhanorkar हे नेहमीच आपल्या लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी धडपड करीत असतात. आजपर्यत लोकसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न पोटतिडकीने लोकसभेत उपस्थित करून मार्गीसुद्धा लावले आहेत.
चंद्रपूर-नागपूर हा राज्य मार्ग होता. परंतु, मागील काही वर्षांत या महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यादृष्टीने या राज्यमार्गाचा विकास झालेला नाही. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तीत झाल्यास अनेक समस्या सुटतील आणि विकाससुद्धा साधला जाईल, यासाठी खासदार धानोरकर यांनी केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर, त्यांच्या पाठपुराव्याला यश येत या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले.
परंतु, चंद्रपूर-नागपूर हा राज्यमार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच देखभालीचे काम आहे. राष्ट्रीय महामार्गाचा पूर्णता दर्जा मिळण्यात यापूर्वी टोल वसुली करणारी कंपनी अडसर ठरत आहे. त्यामुळे करारानुसार या कंपनीला उर्वरित रकम अदा करून राष्ट्रीय महामार्गत रुपांतरित करावे आणि या मार्गाचा विकास करावा, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी चर्चेदरम्यान केली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा ही मागणी तातडीने मंजूर केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.
--
*विविध प्रश्नांवर केली चर्चा*
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर पूल प्रस्तावित आहेत. परंतु, त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी यासह भद्रावती येथील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपूल, रत्नमाला चौक, आनंदवन चौक, चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील उड्डाणपूल, चंद्रपूर शहरातील नवीन बायपास, इरई नदी ते बंगाली कॅम्प उड्डाणपूल तयार करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी चर्चेदरम्यान आली.